Innova Captab IPO GMP (Grey Market Premium): इनोव्हा कॅपटॅब आयपीओ 21 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 26 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. आइनोव्हा कॅपटॅब आयपीओची इश्यू प्राइस 570 करोड रुपये होती. आणि या आयपीओची प्राईस बॅंड 426 रुपये ते 448 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. इनोव्हा कॅपटॅब आईपीओची अलॉटमेंट तारीख 27 डिसेंबर 2023 ही ठरविण्यात आली होती.
ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 28 डिसेंबर 2023 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 28 डिसेंबर 2023 ला चालू होईल. या आयपीओची लिस्टिंग BSE आणि NSE वर 29 डिसेंबर 2023 ला होईल.
Innova Captab IPO GMP Today
स्टॉक मार्केट एक्स्पर्टच्या मते इनोव्हा कॅपटॅब आयपीओची लिस्टिंग इन्वेस्टरना चांगला रिटर्न देणारी असेल.आयपीओला इन्वेस्टरकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. इनोव्हा कॅपटॅब आयपीओची ग्रे मार्केटमध्ये चालू GMP (Grey Market Premium) ₹86 रुपये आहे. GMP च्या हिशोबाने पाहिल तर 448 रुपये + 86 रुपये म्हणजे टोटल 534 रुपये होतात. आणि म्हणून हा आयपीओ जवळजवळ 19% वर लिस्ट होईल असा मार्केट एक्स्पर्टचा अंदाज आहे.
Parameter | Amount (in INR) |
---|---|
IPO Price | 448 |
Grey Market Premium | 86 |
Listing Price (IPO + Premium) | 534 |
What is Grey Market Premium
कोणताही आयपीओ BSE आणि NSE सारख्या मोठ्या स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होण्याआधी Unofficial मार्केटमध्ये त्या आयपीओच्या शेअर्सची खरेदी विक्री होते यालाच ग्रे मार्केट अस म्हणतात. इथे शेअर्सची खरेदी विक्री ही over-the-counter market स्वरूपात केली जाते याचा अर्थ असा की इथे स्टॉक एक्स्चेंजचा काही संबंध येत नाही. ग्रे मार्केटमधील आयपीओची किंमत ही आयपीओच्या किंमतीपेक्षा वेगळी असू शकते. ग्रे मार्केट प्रीमियमवरुन एखादा आयपीओ लिस्ट झाला की प्रॉफिट देईल की लॉस याचा अंदाज लावला जातो.
इतर पोस्ट वाचा👉Innova Captab IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?
Innova Captab Company Details
इनोव्हा कॅपटॅब ही एक फार्मास्यूटिकल कंपनी आहे जिची सुरवात 2005 मध्ये झाली होती. इनोव्हा कॅपटॅब कंपनी फार्मा सेक्टरमध्ये रिसर्च, डेवलपमेंट, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट इ. मध्ये पारंगत आहे. कंपनीकडे 600 पेक्षा जास्त प्रॉडक्ट उपलब्ध आहेत ज्यांना 5000 Distributors च्या मदतीने पूर्ण भारतभर पुरविले जात.
इनोव्हा कॅपटॅब कंपनी सध्या बड्डी, हिमाचल प्रदेशमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उपलब्ध आहे. आणि कंपनी लवकरच जम्मूमध्ये एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उभे करायच्या तयारीत आहे. CRISIL च्या रीपोर्टनुसार इनोव्हा कॅपटॅब कंपनी टॅब्लेट आणि कॅप्सुल बनविण्याच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेनुसार भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.
Innova Captab IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: | December 20, 2023 |
IPO Open Date: | December 21, 2023 |
IPO Close Date: | December 26, 2023 |
Basis of Allotment: | December 27, 2023 |
Refunds: | December 28, 2023 |
Credit to Demat Account: | December 28, 2023 |
IPO Listing Date: | December 29, 2023 |
Innova Captab IPO FAQs (in Marathi)
Question 1) इनोव्हा कॅपटॅब आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?
Answer: इनोव्हा कॅपटॅब आयपीओची अलॉटमेंट तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
Question 2) इनोव्हा कॅपटॅब आयपीओची रिफंड तारीख काय आहे?
Answer: इनोव्हा कॅपटॅब आयपीओची रिफंड तारीख 28 डिसेंबर 2023 आहे.
Question 3) इनोव्हा कॅपटॅब आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
Answer: इनोव्हा कॅपटॅब आयपीओ 29 डिसेंबर 2023 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.
2 thoughts on “Innova Captab IPO GMP: 19% प्रीमियमवर होणार लिस्ट (ग्रे मार्केटचे संकेत)”