नुकतंच RBI (Reserve Bank of India) ने Paytm Payments Bank ला 29 फेब्रुवारीपासून नवीन डिपॉजिट घेण्यासाठी बंदी घातली आहे. आणि या न्यूजनंतर लोकांना असा गैरसमज होत आहे की Paytm App बंद होणार आहे. नक्की काय होणार ते थोडक्यात समजून घ्या.
RBI ने Paytm Payments Bank वर बंदी का घातली?
RBI च्या मते Paytm Payments Bank मध्ये 1000 पेक्षा जास्त असे अकाऊंट आहेत जे कोणत्याही प्रकारची KYC शिवाय ओपन केले आहेत. तसेच अनेक अकाऊंट एकाच PAN कार्डने ओपन करण्यात आले आहेत. या अकाऊंटमध्ये दररोज करोडोचे व्यवहार होत होते. आणि म्हणून RBI ने Paytm Payments Bank बंद केली आहे.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
Paytm App बंद होणार का?
Paytm App मध्ये काही इश्यू नाहीये. जर तुमच बँक अकाऊंट इतर कोणत्या बँकमध्ये असेल जस की बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणतीही बँक तर तुम्ही ते अकाऊंट Paytm App ला लिंक केल असेल. त्यामुळे तुम्हाला कोणताही व्यवहार करताना काही प्रॉब्लेम होणार नाही हे लक्षात घ्या.
पण ज्या लोकांच अकाऊंट Paytm Payments Bank मध्ये आहे त्यांना मात्र पैशाचे व्यवहार करताना प्रॉब्लेम होईल कारण RBI ने Paytm Payments Bank वर बंदी घातली आहे.