क्रेडिट कार्ड काय आहे? घेतल पाहिजे की नाही? | What is Credit Card in Marathi?

Rate this post

What is Credit Card in Marathi: आजकाल ऑनलाइन शॉपिंग करताना पेमेंटच्या वेळी क्रेडिट कार्ड हा ऑप्शन तुम्ही पाहिला असेलच. आणि जर नीट लक्ष दिलत तर जास्त  Discount आणि रिवॉर्ड पॉईंट्स तिथेच मिळतात. पण क्रेडिट कार्ड नक्की काय आहे? क्रेडिट कार्ड घेणे तुमच्यासाठी फायद्याच आहे का? की तुम्हाला क्रेडिट कार्डने नुकसान होईल?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया!

क्रेडिट कार्ड काय आहे? | What is a Credit Card?

Credit या शब्दाचा अर्थ काय होतो तर उधारी. क्रेडिट कार्ड म्हणजे बँकेकडून मिळणारे एक प्रकारच शॉर्ट टर्म लोन किंवा उधारी आहे.

तुम्ही या कार्डचा वापर कोणतीही वस्तु खरेदी करण्यासाठी करू शकता आणि बँकेला नंतर पैसे परत करू शकता. पैसे रिटर्न करण्याचा टाइम म्हणजेच Credit Period असतो आणि तो हा सहसा एक एक ते दीड महिन्याचा असतो.

जस एखादी वस्तू घेतल्यावर डेबिट कार्डने पैसे भरल्यावर पैसे तुमच्या बँक अकाऊंटमधून लगेच कट केले जातात. पण क्रेडिट कार्डचा वापर करून पैसे दिल्यावर ते तुमच्या क्रेडिट कार्डमधून (म्हणजेच ज्या बँकेकडून तुम्ही क्रेडिट कार्ड घेतल आहे, त्या बँकेचे पैसे कट होतात) आणि मग तुम्हाला हे पैसे काही दिवसांनी परत करायचे असतात.

एक सिम्पल एक्झॅम्पल घेऊन समजूयात 

मी सुद्धा क्रेडीट कार्ड वापरतो. बँकेने मला 50,000 ची लिमिट दिली आहे.

समजा मी या महिन्याच्या 10 तारखेला 1000 रुपयाची काही शॉपिंग केली आणि त्याच बिल मी माझ्या क्रेडिट कार्डने भरल आहे. आता हे 1000 रुपये माझ्या बँक अकाऊंटमधून गेले नाहीत तर बँकने दिलेल्या क्रेडिट कार्ड लिमिटमधून गेले आहेत. मग हे पैसे मला कधी भरावे लागतील?

त्यासाठी प्रत्येक क्रेडिट कार्ड कंपनी एक ठराविक दिवसांचा क्रेडिट पीरियड देते. जस की माझ्या क्रेडिट कार्डमध्ये प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला बिल येत जे महिन्याच्या 25 तारखेपर्यन्त भरायचा असत. म्हणजेच मला फुकटमद्धे बँकचे पैसे वापरण्यासाठी 45 दिवस मिळतात. कस से ते समजून घ्या.

10 फेब्रुवारी 2024 ते 10 मार्च 2024 (टोटल झाले 30 दिवस आणि 10 मार्चला क्रेडिट कार्डच बिल येत) आणि त्यानंतर ते बिल 25 मार्च 2024 पर्यन्त मला भरायच आहे म्हणजे अजून एक्स्ट्रा 15 दिवस पकडा. म्हणजे जवजवळ 45 दिवसाचा फ्री क्रेडिट पीरियड मिळतो.

जर क्रेडिट कार्ड कंपनी फ्री पैसे देते तर प्रॉफिट कशी कमविते?  

असा प्रश्न मनात येण साहजिक आहे. कोणतीही बँक असो की क्रेडिट कार्ड कंपनी जेव्हा एखादा कस्टमर क्रेडिट कार्डवर खर्च करतो आणि अगदी वेळेवर पैसे भरतो अशा कस्टमरपासून कोणत्याही क्रेडिट कार्ड कंपनीला काहीच फायदा होत नाही. थोडेफार AMC (Annual Maintenance Charges) द्यावे लागत असतील तेवढेच. पण जर तुम्ही ठराविक रुपयांची शॉपिंग केलीत तर ते पण माफ होतात (हे प्रत्येक कंपनीसाठी वेगळ असू शकत)

Credit Card in Marathi

खरे पैसे किंवा प्रॉफिट क्रेडिट कार्ड कंपनी अशा कस्टमरपासून कमविते जे क्रेडिट कार्डचा वापर अंधाधून करतात आणि वेळेवर क्रेडिट कार्डच बिल भरत नाही. क्रेडिट कार्डचा खरा बिझनेस इथेच होतो जेव्हा कस्टमर क्रेडिट कार्डच बिल भरत नाही किंवा पूर्ण बिल न भारत कमीत कमी रक्कम भरतात.

कारण जेव्हा कस्टमर बिल वेळेवर भरत नाही किंवा थोडे पैसे भरतो तेव्हा क्रेडिट कार्ड कंपनी त्या बिलच्या रककमेवर इंटरेस्ट घ्यायला सुरुवात करते ज्याचा इंटरेस्ट रेट खूप भयंकर असतो.  कमीत कमी  18% ते जास्तीत जास्त 44% पर्यंत सुद्धा (तुम्ही गूगलवर क्रेडिट कार्ड इंटरेस्ट रेट चेक करून बघा कारण हे प्रत्येक कंपनीसाठी वेगळे असतात.)

जेव्हा कस्टमर क्रेडिट कार्डच बिल पूर्ण भरत नाही 

तुम्ही जेव्हा क्रेडिट कार्डच बिल पूर्ण भरत नाही तेव्हा कंपनी त्या बिलावर इंटरेस्ट घ्यायला सुरुवात करते पण जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड बिलाची Minimum Amount Due असते ती भरता तेव्हा जे उरलेले बिल आहे त्यावर इंटरेस्ट घेतला जातो.

What is Credit Card in Marathi

मी अनेक लोकांना भेटलो आहे जे Minimum Amount Due असते तेवढी वेळेवर भरतात आणि नंतर बोलतात पुढच्या वेळी माझ बिल कमी नाही झाल. कारण क्रेडिट कार्ड कंपनी उरलेल्या बिलावर इंटरेस्ट घेते आणि पुढच्या महिन्यात बिल पाठवते. आणि तेव्हा पण ते बिल पूर्ण भरायला जमल नाही की मग पुन्हा Minimum Amount Due भरायची. आणि हे चक्र अस चालूच राहत.

लोक बोलतात ना क्रेडिट कार्डच जाळ काय असत ते काहीस असंच असत.

Conclusion हेच आहे की!

क्रेडिट कार्ड वाईट नाहीयेत पण तुम्ही त्याचा कसा वापर करता यावर सगळ अवलंबून आहे. जर तुम्ही वाटेल तिथे खर्च करत गेलात की झाल मग कल्याण. पण जर तुम्ही स्मार्टपणे आणि जबाबदरीने क्रेडिट कार्ड वापरालत तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल. (आणि क्रेडिट कार्ड कंपनीला नुकसान)

क्रेडिट कार्डचा योग्य वापर करून तुम्ही कॅशबॅक किंवा रिवॉर्ड पॉईंट्स जिंकू शकता. आणि सगळ्यात महत्वाच म्हणजे एक चांगली Credit History बनवू शकता ज्याने तुमचा Cibil Score नक्कीच वाढू शकतो.

कोणतेही क्रेडिट घ्या पण आधी त्याच्या नियम, अटी किंवा इंटरेस्ट रेट इ. समजून घ्या. आणि मगच वापरा.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Groww App मध्ये इतर Investing Apps वरील म्यूचुअल फंडस कसे बघायचे? | How to Track Your External Mutual Funds on Groww App (marathifinance.net)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi