Parag Parikh Flexi Cap Fund: 48,000 करोडपेक्षा जास्त AUM असलेला फंड (काय आता रिटर्न कमी होणार?)

Parag Parikh Flexi Cap Fund: एका फॉलोवरने इंस्टाग्रामवर मला असा मेसेज केला की Parag Parikh Flexi Cap Fund ची AUM खूप जास्त आहे तर त्याचा लॉंग फॉर्म  रिटर्नवर काही फरक पडेल का? हा प्रश्न तुमच्या मनात पण कधी नक्कीच आला असेल। आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण हे यावर चर्चा करणार आहोत चला तर सुरुवात करूया। 

Parag Parikh Flexi Cap Fund Marathi

Parag Parikh Flexi Cap Fund Details

  • Parag Parikh Flexi Cap Fund ची  सुरुवात 2013 मध्ये झाली आहे.
  • 2013 पासून ते आत्तापर्यंत या फंडने 20% चा CAGR रिटर्न दिला आहे। 
  • सध्याची AUM ही ४८,२९३ करोड एवढी आहे (२३/१२/२०२३) 
  • AUM भारताचा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात मोठा एक्विटी फंड आहे. (AUM म्हणजे Asset Under Management थोडक्यात काय एखादया फंडमध्ये टोटल किती पैसा आहे) 

Parag Parikh Flexi Cap Fund Unitholders Meetings 

Parag Parikh Flexi Cap Fund Unit Holders Meeting

2 डिसेंबर 2023 रोजी पराग पारिख म्यूचुअल फंडची 10 वी यूनिटहोल्डर मीटिंग झाली. आता हे यूनिटहोल्डर मीटिंग काय? जर तुमच्याकडे या फंडचे यूनिट्स असतील किंवा तुम्ही या फंडमध्ये पैसे इनवेस्ट करत असाल तर तुम्हाला या मीटिंगसाठी बोलवल जात. जर तुमची या म्यूचुअल फंडच्या कोणत्याही एका फंडमध्ये SIP असेल तर तुम्ही या मीटिंगला जावू शकता. या मीटिंगमध्ये स्वता या फंडचे  CIO म्हणजेच Chief investment officer तुमच्या प्रश्नांची ऊतरे देतात. या म्यूचुअल फंड कंपनीचे CIO राजीव ठककर आहेत हे Parag Parikh Flexi Cap Fund चे एक फंड मॅनेजरसुद्धा आहेत. त्यांना हा सेम प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी काय सांगितल ते आपण बघू. 

सेबीचा रुल 

सेबीच्या रुलनुसार कोणतीही म्यूचुअल फंड कंपनी एखाद्या स्टॉकमध्ये 10% पेक्षा जास्त रक्कम इनवेस्ट नाही करू शकत. याचा अर्थ असा की, समजा म्यूचुअल फंड कंपनीला एखादा चांगला स्टॉक सापडला तरी ते त्यामध्ये 10% पेक्षा जास्त पैसे इनवेस्ट करूच शकत नाहीत. यावर राजीव ठककर म्हणाले की, 10% रक्कम इनवेस्ट करता नाही येत पण ते सगळ्या स्कीम मिळून आणि अस बघायला गेल तर SBI म्यूचुअल फंड किंवा HDFC म्यूचुअल फंडच्या तुलनेत पराग पारिख म्यूचुअल फंडची AUM खूप कमी आहे. त्यामुळे अजून तरी आम्ही यासोबत Comfortable आहोत.  (माहितीसाठी सांगतो SBI म्यूचुअल फंडची विविध इक्विटि फंड्सची टोटल AUM 3,30,083 करोड आहे आणि HDFC म्यूचुअल फंड 3,11,761 करोड एवढी आहे. आणि हे फक्त इक्विटि म्यूचुअल फंड घेतले आहेत यामध्ये Debt म्यूचुअल फंड ADD केले तर AUM अजून जास्त होईल.)

फंडची फ्युचर स्ट्रॅटजी 

यावर CIO राजीव ठककर म्हणाले की आम्ही लॉन्ग टर्ममध्ये मार्केट रिटर्नपेक्षा जास्त रिटर्न देण्यावर फोकस आहे. पण तुम्ही जर मागील काही वर्षाप्रमाणे 20% पेक्षा जास्त रिटर्नची अपेक्षा करत असाल तर कदाचित तुम्ही नाराज होवू शकता आणि त्यासाठी तयार रहा. आम्ही या फंडचे लॉस कमी कसे राहतील यावर लक्ष देतो त्यामुएल लॉन्ग टर्ममध्ये एक Reasonable रिटर्न तुम्हाला मिळेल.

यावर मराठी फायनॅन्सच मत 

मी खर बोलू तर ही म्यूचुअल फंड कंपनी माझी फेवरेट आहे कारण तुम्ही कोणतीही म्यूचुअल फंड कंपनी घ्या कमीत कमी त्यांचे 15 तरी वेगवेगळे म्यूचुअल फंड असतात. कारण जितके जास्त म्यूचुअल फंड तेवढी जास्त फी इन्वेस्टरकडून घेता येते. पण याबाबतीत पराग पारिख म्यूचुअल फंड खरंच कौतुक करण्यासारख काम करत आहेत.  त्यांचे फक्त 7 म्यूचुअल फंडस मार्केटमध्ये आहेत. आणि ते उगाचच नवीन फंड सुरू करायला तयार नाहीत.

त्यामुळे ज्यांना खूप साऱ्या रिटर्नची अपेक्षा असेल तर त्यांनी या फंडमध्ये पैसे इनवेस्ट करू नये अस मला स्पष्ट मत आहे. ज्यांची अपेक्षा लॉन्ग टर्ममध्ये 15% – 17% चा रिटर्न एवढी आहे त्यांनी या फंडकडे जाव. जस मी तुम्हाला सांगितल की माझ्या बहिणीचे आणि GF ची SIP या फंडमध्ये चालू आहे. पण त्यांना फारस शेअर मार्केटमध्ये रस नाहीये. आणि दुसर म्हणजे त्यांना Flexi Cap Fund यासाठी सांगितला आहे की एकाच फंडमध्ये मार्केटच्या सगळ्या कंपन्या येतात.

मी या फंडमध्ये इनवेस्ट करतो कारण या फंडची कंपनीची Investing Philosophy खरच चांगली आहे. तुम्ही तुमच्या रिटर्नच्या अपेक्षा ओळखा आणि त्यानुसार फंड निवडा. किंवा Flexi Cap कॅटेगरीमधील दुसरा एखादा फंड निवडा. Happy SIPing!

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

मला फक्त बेस्ट म्यूचुअल फंड हवाय! (Mutual Fund Investing Mistake)

How to Become RICH: श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला या 4 पैकी 1 गोष्ट हवीय! 

Investing Success Story: फक्त एका स्टॉकमधून 70 मिलियन डॉलर बनविले!

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

4 thoughts on “Parag Parikh Flexi Cap Fund: 48,000 करोडपेक्षा जास्त AUM असलेला फंड (काय आता रिटर्न कमी होणार?)”

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi