How to Become Rich: तुम्ही फॅमिलीचा पहिला करोडपती कस बनाल?

Rate this post

How to Become Rich in Marathi: तुमच्या फॅमिलीमध्ये जर तुम्ही पहिले करोडपती बनाल तर ती तुमच्यासाठी एक मोठी Achievement असेल. 

पण करोडपती बनण्याच्या या प्रवासामध्ये योग्य प्लॅनिंग सोबत योग्यरीत्या इन्व्हेस्टमेंट करणे गरजेचे आहे. या पोस्टमध्ये तुम्ही तुमचा करोडपती बनण्याचा,आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्ग कसा पूर्ण कराल हेच शिकणार आहोत. चला तर सुरुवात करूया. 

१) आर्थिक शिक्षण घ्या:

तुम्ही ऐकलं असेल नॉलेज म्हणजे पावर आणि फायनान्सच्या जगात ते अगदी १००% खर आहे.

फायनान्सचे बेसिक्स, शेअर मार्केटचे बेसिक्स,  इकॉनोमी इदयादीबद्दल शिकायला सुरुवात करा. हे शिकण्यासाठी तुम्ही बुक्स वाचू शकता, ऑनलाइन कोर्स करू शकता, पोडकास्ट, ब्लॉग वाचू शकता  किंवा सगळ्यात बेस्ट म्हणजे युट्युब इत्यादींची हेल्प घेऊ शकता.

पैसा कसा काम करतो हे समजून घेणे हा वेल्थ बनविण्याचा पाया आहे हे लक्षात घ्या.

२) हार्डवर्क करायला तयार रहा

हार्डवर्क केल्याशिवाय आजकाल सक्सेस मिळत नाही.

तुम्ही जॉब करताय तर तिथे एक्स्ट्रा टाईम आणि एफर्ट देण्यासाठी तयार रहा. कारण जॉब ही अशी गोष्ट आहे जिथून बहुतेक लोक इन्कम करत असतात त्यामुळे जॉबची इन्कम वाढवायचे असेल तर एक्स्ट्रा तास काम कराव लागेल.

त्यासोबत एखाद्या साईड प्रोजेक्टवर तुम्ही काम केलं तर तुम्ही तुमची कमाई वाढवू शकता. 

३) 2-3 इन्कम सोर्सेस बनवा 

आपण आजकाल खूप ऐकतो की कमाईचे अनेक सोर्स बनविले पाहिजेत आणि हे अगदी खर आहे.

कारण कमाईच्या एकाच मार्गावर अवलंबून राहणे खूप रिस्की आहे. त्यामुळे तुम्ही तुमची इन्कम कशी वाढवू शकता यावर फोकस करा. एखादा छोटा मोठा कमाईचा सोर्स कसा बनवू शकता यावर लक्ष द्या. यासाठी तुम्ही स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करू शकता, फ्रीलान्सिंग करू शकता किंवा तुमच्याकडे जे स्किल आहे त्याचा वापर करून इन्कम कमवू शकता.

गरजेचं नाहीये की एकदम मोठी इन्कम असली पाहिजे,  छोटी असली तरी चालेल पण इन्कम हवी. 

४) काटकसर करायला शिका

वेल्थ बनविणे याचा अर्थ असा नाही की खूप सारा पैसा कमविणे पण पैसा कमविल्यानंतर तुम्ही किती सेव करता आणि किती इन्वेस्ट करता हे जास्त महत्त्वाच आहे. उगाचच नको तिथे खर्च करणे शक्यतो टाळा. बजेट बनवा आणि त्यानुसार खर्च करा.

सुरुवातीला कठीण असतं पण एकदा सवय झाली की फायदा होतो. 

५) इन्व्हेस्टमेंट करा (लवकरात लवकर)

इन्वेस्टींगशिवाय तुम्ही वेल्थ बनवू शकत नाही. 

आणि इन्वेस्टिंग करण्यासाठी सगळ्यात बेस्ट मार्ग म्हणजे म्युच्युअल फंड. मी म्यूचुअल फंड यासाठी बोलतोय की सगळ्यांनाच स्टॉक सिलेक्ट करायला जमत नाही. त्यामुळे म्युच्युअल फंड हा एक चांगला मार्ग आहे जो सगळ्यांना शक्य आहे. तुम्ही जितक्या लवकर सुरुवात करणार तेवढं तुमच्यासाठी चांगल असेल.

तीन ते चार म्युच्युअल फंड किंवा जास्तीत जास्त पाच, त्यामध्ये एसआयपी चालू करा आणि लॉंग टर्मसाठी इन्वेस्ट करा. 

६) आर्थिक गोल स्पष्ट करा

मला जेव्हा कोणी मेसेज करतो की “मला एक चांगला फंड सांगा ना”. तर मी त्यांना विचारतो की म्यूचुअल फंड कशासाठी हवा आहे?

हे विचारल्यानंतर त्यांना त्याची कल्पना नसते आणि हे एकदम चुकीच आहे.  कोणताही म्युच्युअल फंड असो किंवा  स्टॉक असो किंवा कोणतीही इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही ती का करत आहात ते सगळ्यात आधी स्पष्ट करा.

गोल स्पष्ट असेल तर मार्ग सोपे होतात हे लक्षात घ्या. 

७) आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर टिकून रहा

 फॅमिलीमधील पहिला करोडपती बनण्याचा मार्ग आहे तो खूप कठीण असणार आहे.

खूप साऱ्या गोष्टी होतील. कधी इन्वेस्टमेंटची वॅल्यू  कमी होईल, कोणी मित्र बोलेल की बाहेर फिरायला जावूयात, नंतर इन्वेस्टमेंट करू आणि अशी बरीक्च कारणे समोर येतील. या सगळ्या गोष्टींपासून तुम्हाला बाजूला होऊन तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासावर फोकस करायचा आहे आणि टिकून राहायचं आहे. 

हा प्रवास खूप लांब असेल पण शेवटी Worth It असेल हे लक्षात घ्या.

८) स्वताला अपग्रेड करा 

अनेकांचा असा माईंडसेट असतो की कॉलेज झालं की एज्युकेशन अगदी बंद आणि  लाइफची ही सगळ्यात मोठी चूक असते.

फायनान्सच्या जगात सतत काही ना काही होत असतं त्याबद्दल up to date  राहायचा आहे आणि त्यानुसार तुमचे इन्वेस्टिंगचे निर्णय घ्यायचे आहेत आणि गरज असेल तर त्यामध्ये बदल करायचे आहेत. 

Conclusion 

तुमच्या फॅमिलीमधील पहिला करोडपती बनणे हे फक्त पैसा कमविण्यापेक्षा खूप जास्त आहे.

कारण ज्या गोष्टी तुम्हाला सुरुवात करताना मिळाल्या नाही त्या तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला देऊ शकता. त्यांना सुद्धा अगदी झिरोपासून सुरुवात करावी लागणार नाही हे लक्षात घ्या. पण हा जसा तुम्ही त्यांना पैसा देणार आहात त्यासोबतच तो पैसा कसा वाढवायचा आणि टिकवायचा याचं नॉलेज पण द्या आणि त्यासाठी तुम्हाला आधी शिकाव लागेल. 

It’s not how much money you make, but how much money you keep, how hard it works for you, and how many generations you keep it for. – Robert Kiyosaki (Rich Dad Poor Dad)

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला या 4 पैकी 1 गोष्ट हवीय! (How to Become RICH Part 1) 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi