DOMS Industries IPO Day 3: आयपीओ कोणी आणि किती सबस्क्राईब केला?

DOMS Industries IPO Day 3

DOMS इंडस्ट्रीज IPO (Initial Public Offering) द्वारे ₹1200 कोटी उभारणार आहे. DOMS IPO 13 डिसेंबर रोजी सुरू झाला आणि 15 डिसेंबर रोजी बंद होईल. डॉम्स आयपीओची  किंमत बँड ₹750 ते ₹790 प्रति शेअर निश्चित केला आहे. डॉम्स आयपीओ घेताना तुम्हाला एका लॉटमध्ये कमीत काकी ₹14,220 रुपये देऊन टोटल 18 शेअर्स घ्यावे लागणार आहेत.

DOMS Industries IPO Day 3 Subscription Status

डॉम्स इंडस्ट्रीज आयपीओ सगळ्या कॅटेगरीना एकत्रित करून तिसऱ्या दिवशी 93.52 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

रिटेल कॅटेगरीमध्ये हा आयपीओ मोठ्या प्रमाणात सबस्क्राईब झाला असून आयपीओने जवळ जवळ 69.67 टाइम्सचा आकडा पार केला आहे.

त्यानंतर NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये आयपीओ 66.51  टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक, NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे २ लाखापेक्षा जास्त शेअर्ससाठी Apply करतात.

आणि आता उरलेली कॅटेगरी म्हणजे QIB (Qualified Institutional Buyers) या कॅटेगरीमध्ये हा 115.97 टाइम्स बुक झाला आहे.  QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या Mutual Funds कंपन्या, पेन्शन फंड, Insurance कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

डॉम्स इंडस्ट्रीज आयपीओला इन्वेस्टरकडून पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी तसेच आता तिसऱ्या दिवशी मिळणारा जबरदस्त प्रतिसाद पाहून हा आयपीओ किती रिटर्न देणार याकडे इनवेस्टर कम्यूनिटीच लक्ष लागल आहे.

DOMS Industries Company Details

DOMS Industries Limited ही वलसाड, गुजरात येथे स्थित एक भारतीय स्टेशनरी आणि कला साहित्य निर्मिती कंपनी आहे. कंपनीची स्थापना 1976 मध्ये एक पार्टनरशिप फर्म ,  आर.आर. इंडस्ट्रीज या नावाने झाली.  रसिकलाल अमृतलाल रवेशिया आणि मनसुखलाल जमनादास रजानीयांनी 2005 मध्ये त्यांचा प्रमुख ब्रँड “DOMS” लाँच केला.

ही कंपनी भारतातील ‘स्टेशनरी आणि आर्ट’ प्रॉडक्टच्या मार्केटमधील आघाडीची खेळाडू आणि ब्रँड असलेली एक समग्र प्रॉडक्ट कंपनी आहे. DOMS कंपनीचे 31 मार्च 2023 पर्यंत देशांतर्गत मार्केटमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर 40 पेक्षा जास्त देशांमध्ये आमच्या प्रमुख ब्रँड ‘DOMS’ अंतर्गत या प्रॉडक्टच डिझाइन, निर्मिती आणि विक्री करतात. त्यांची मुख्य प्रॉडक्ट जसे की ‘पेन्सिल’ आणि ‘मॅथेमॅटिकल इन्स्ट्रुमेंट बॉक्स’ यांचा मार्केटमध्ये चांगला हिस्सा घेतात.  2023 मध्ये आकड्यानुसार पेन्सिल मार्केटमध्ये 29% आणि मॅथेमॅटिकल इन्स्ट्रुमेंट बॉक्समध्ये 30% मार्केट शेअर आहे.

Details Values
IPO Opening Date 13th December 2023
IPO Closing Date 15th December 2023
IPO Price Range ₹750 to ₹790 per share
Lot Size 18 shares
Retail Investor Lots 14 lots (252 shares)
Total Amount for Retail ₹199,080
Total IPO Size ₹1,200 crores
Fresh Issue ₹250 crores
Offer for Sale ₹850 crores.
Retail Investor Quota 10%
QIB Quota 75%
HNI Quota 15%
GMP (Grey Market Premium) ₹400
Company Location Valsad, Gujarat
Establishment Year 1976 (as R.R. Industries)
Brand Launch Year 2005 (as DOMS)
Main Products Pencils, Mathematical Instrument Boxes
Market Share (2023) 29% (Pencils), 30% (Mathematical Instrument Boxes)
Categories Educational Stationery, Art Materials, Paper Stationery, Kit and Combo, Office Supplies, Chant and Handicraft, Fine Art Products
Global Presence Strong Multi-Channel Distribution Network in America, Africa, Asia-Pacific, Europe, and the Middle East

 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Inox India IPO Day 1: आयपीओ कोणी आणि किती सबस्क्राईब केला?

DOMS Industries IPO Day 2: आयपीओ कोणी आणि किती सबस्क्राईब केला?

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi