Rich Dad Poor Dad in Marathi: आर्थिक साक्षरतेचे 8 महत्वाचे धडे (नक्की वाचा)

Rate this post

Rich Dad Poor Dad in Marathi: Rich Dad Poor Dad हे पर्सनल फायनॅन्सवर रॉबर्ट कियोसाकी यांनी लिहिलेल एक बेस्ट बुक आहे. रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांच्या दोन वडिलांकडून घेतलेले पैशाचे धडे या बुकमध्ये सोप्या शब्दात मांडले आहेत ज्यांचा वापर करुन तुम्ही आर्थिकरित्या साक्षर बनू शकता.

रॉबर्ट कियोसाकी यांनी त्यांचे दोन वडील म्हणजे एक त्यांचे खरे वडील ज्यांनी उत्तम शिक्षण घेतले होते आणि दुसरे वडील म्हणजे त्यांच्या मित्राचे वडील जे खूप शिकलेले न्हवते पण एक मोठे बिझनेसमॅन होते. 

तुमच्यापैकी खूप जणांना बुकस वाचायचा कंटाळा येत असेल किंवा टाइम मिळत नसेल. (तुमच जे काही कारण असेल.) आणि म्हणून आजच्या पोस्टमध्ये आपण Rich Dad Poor Dad या बुकमधील Lessons वर चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करू!

पैशासाठी काम करू नका! 

आता हे वाचून तुम्हाला वाटेल की मग काम काय फुकटमध्ये काम करायचं आणि मग खायचं काय? असा विचार येणे साहजिक आहे.

पण पैशासाठी काम करू नका याचा अर्थ असा होतो की फक्त पैशासाठी नाही तर त्यासोबत काहीतरी नवीन स्किल शिकण्यासाठी काम करा. हाच फरक असतो एका श्रीमंत आणि गरीब माणसामध्ये. जर तुम्ही आयुष्यभर फक्त पैशासाठी काम करत राहिलात तर एक employee बनून राहता. Rich Mindset वाले लोकं अस नाही करत ते पैसा तर कमवतात पण तो पैसा त्यांच्यासाठी कसा काम करेल याचा विचार पहिला करतात.

जर श्रीमंत व्हायचं आहे तर तुम्हाला तुमचा Mindset पहिला श्रीमंत बनवावा लागेल. तुम्ही कमावलेला प्रत्येक रूपया तुमच्यासाठी काम केला पाहिजे आणि ते कसं होणार? खूप सोप आहे पैशाला योग्य ठिकाणी Invest करून. 

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

सगळ्यात आधी स्वतःला पैसै द्या. 

स्वतःला पैसै देणे याचा अर्थ असा नाही की Salary आली की तुम्हाला हवे ते खर्च पहिले करा आणि मग बाकीचे खर्च.  तर अस अजिबात नाही.

स्वतःला पैसे देणे म्हणजे सगळ्यात आधी पैसे तुमच्या Investment साठी बाजूला काढणे. बाकीचे खर्च नंतर बघा पण थोडी का होईना मग एक ठरावीक रक्कम स्वतःसाठी बाजूला काढा कारण तेवढी मेहनत तुम्ही घेतली आहे. आता ही रक्कम तुम्ही विविध Assets मध्ये Invest करू शकता जे फ्युचरमध्ये तुम्हाला चांगला प्रॉफिट करून देतील. 

Assets जमा करा.

सगळ्यात आधी Assets काय आणि Liability काय हे थोडक्यात समजून घेऊ. 

Assets म्हणजे एखादी अशी गोष्ट जी तुमच्या खिशात पैसे आणून देते आणि Liability म्हणजे अशी गोष्ट जी तुमच्या खिशातून पैसै घेऊन जाते. (Asset आणि Liability ची या पेक्षा सोपी व्याख्या मी तर अजून वाचली नाही) आता तुम्ही स्वतः विचार करा की तुमच्याकडे किती Asset आहेत आणि किती Liabilities. गरीब आणि मिडल क्लास लोक Luxury वस्तू पहिल्या विकत घेतात आणि मग पैसे Invest करतात. पण श्रीमंत अगदी याच्या उलट आधी Investment आणि मग शॉपिंग आणि इतर खर्च. 

Asset च एक साधं उदाहरण म्हणजे एखाद इंस्टाग्राम पेज जे तुम्ही तुमचा मोबाईलचां वापर करून चालवत आहात ज्यातून तुम्ही महिन्याला छोटी का होईना एक रक्कम मिळवत आहात. या उलट तुम्ही तुमचा मोबाईल फक्तं reels बघणे, YouTube साठी वापरत आहात तर ती एक Liability झाली. विकायला गेलात तरी त्याची किंमत घेतलेल्या किंमतीपेक्षा कमीच मिळते. मुद्दा हा नाही की मोबाइल घेऊ नका, खरा मुद्दा हा आहे की Asset कसे बनवता येतील यावर जास्त भर द्या. 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 श्रीमंत व्हायच आहे तर लोक काय बोलतील याकडे दुर्लक्ष करा | How to Become Rich in Marathi

Wealthy बना Rich नाही. 

Wealthy आणि Rich यामध्ये खूप बारीक फरक आहे.

एखादा व्यक्ती किती  Rich आहे हे आपण त्याच्याकडे किती पैसा आहे यावरून समजू शकतो. पण एखादा व्यक्ती किती Wealthy आहे हे आपण त्याच्याकडे किती टाईम आणि त्यासोबत पैसा आहे यावरून समजू शकतो. एक साधं उदाहरण घेऊ. एखादा मोठा डॉक्टर ज्याकडे मोठा बँक बैलेंस आहे पण काय तो डॉक्टर Wealthy आहे? नाही कारण जर त्याने काम करणे बंद केले तर त्याची कमाई पण बंद होणार. आता त्याच्याकडे पैसा तर खूप आहे पण त्याचा टाईम मात्र फ्री नाहीये. याऊलट एखादा असा व्यक्ती घ्या जस की मुकेश अंबानी. खरी Wealth अशी असते. त्यांनी आज काम करणे जरी बंद केलं ना तरी फक्त Dividend इन्कमने त्याचं आयुष्य चालू शकतं.

(मुकेश अंबानीबद्दल एक Fact: – कित्येक वर्षे मुकेश अंबानी यांनी त्यांची Salary फक्त 15 करोड ठेवली आहे पण वर्षाला त्यांची Reliance या कंपनीकरून येणारी Dividend इन्कम जवळ जवळ 1800 करोड आहे.)

तुमच्या Mind ला कामी लावा.

दिवसातून किती टाईम तुम्ही काहीतरी नवीन शिकण्यासाठी देत आहात? किंवा कॉलेज पूर्ण झाल्यापासून तुम्ही किती बुक्स वाचली आहेत? किंवा एखाद नवीन स्किल शिकला आहात? हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा.

तुमचं उत्तर तुम्हाला सापडेल. कॉलेज झालं की आपण शिक्षण ही कॉन्सेप्ट सोडूनच देतो. पण नीट पाहिलत तर समजतंय की खर शिक्षण तर आता सुरू झालाय. कॉलेजच्या बाहेरच जग खूप वेगळ आहे. आता फायनान्सच उदाहरण घ्या, जर आपल्याला नीट शिकवलं गेलं असत तर आता आपण स्वतः शिकायची गरज नसती. त्यामूळे स्वतः शिका, बुक्स वाचा, यूट्यूब व्हिडिओज बघा, पॉडकास्ट एका.

जे हवं ते करा पण स्वतः ला नेहमी Update करत रहा.. जमाना Artificial Intelligence चा आला आहे. आता आपली स्पर्धा फक्त माणसांसोबत नसेल तर मशीनसोबत पण होणार आहे. आणि त्यासाठी स्वतःला तयार करा. 

आर्थिक साक्षर बना.

अनेक लोक खूप जास्त शिकलेले असतात पण जेव्हा वेळ पैसा Manage करायची वेळ येते त्यांना काहीच येत नाही.

शाळा कॉलेजमध्ये आपल्याला आर्थिक शिक्षण मिळालं नाही अस बोलून सतत शाळा कॉलेजला दोष देऊन काही होणार नाहीं. आपल्याला स्वतःला आर्थिक शिक्षण घ्यायला सुरूवात केली पाहिजे. (तुम्ही हा ब्लॉग वाचत आहात म्हणजे तुम्ही आधीच सुरुवात केली आहे) आणि आर्थिक शिक्षण घ्यायला आता खूप सारे मार्ग उपलब्ध आहेत जस की बुक्स, YouTube, ब्लॉग, Instagram इ.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 How to Become Rich: आर्थिक स्वातंत्र्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी (कृती, स्वभाव आणि नॉलेज) (marathifinance.net)

तुमचा Why सोधा.

तुम्हाला Wealth का बनवायची आहे हे अगदी स्पष्ट असल पाहिजे. प्रतेक्याची कारणे खूप वेगळी असु शकतात. पण हे काही कारण असेल ते शोधा. काही ठरावीक कारणे आहेत ज्यामुळे आपण पैसै Invest करून Wealth बनविण्यासाठी मेहनत घेत आहोत.

 • जोबमधून बाहेर पडायचं आहे 
 • मुलांचं शिक्षण
 • फॅमिली सोबत वेळ घालवायचा आहे 
 • स्वतःच्या हॉबिजवर काम करायचं आहे 
 • लवकर रिटायरमेंट हवी आहे 

Technical स्किल्स शिका.

Wealth बनवायची असेल तर काही स्किल्स आहेत जे तुम्हाला आलेच पाहिजेत.

 • Investing (पैसे कसे आणि कुठे Invest करायचे)
 • Accounting (Asset किती Liability किती यातला फरक) 
 • Law (पैसे तर कमवाल पण ते टॅक्समध्ये गमवयाचे नसतील तर  हे शिका ) 
 • मार्केटची समज (मार्केट कसं काम करत, Supply आणि Demand याची बेसिक माहिती असली पाहिजे)

अडथळ्यांवर मात करा.

अनेक लोक गरीब राहतात पुढील 5 कारणांमुळे

 • भीती (माझे पैसे जातील)
 • निरुत्साह (नेहमी नकारात्मक विचार करत राहायचं) 
 • कंटाळा (कोण Invest करेल, कोणाला वेळ आहे) 
 • वाईट सवयी (नको तिथे खर्च करून Invest करायला काहीच शिल्लक राहत नाही)
 • अति शहाणपणा (मला सगळ येत, मी करेन ते ठीक असा Attitude) 

एक गोष्ट लक्षात घ्या, पैसे गमवायला कोणालाच आवडत नाही. पण पैसे जातील म्हणून पैसे Invest करायचे नाहीत हा त्यावरचा मार्ग नाही. 

हे बुक तुम्ही तुम्ही वाचाव की नाही? 

“रिच डॅड पुअर डॅड” हे एक लोकप्रिय पुस्तक आहे ज्याने अनेक लोकांना पैसा आणि Investing बद्दल त्यांच्या दृष्टिकोनावर पुनर्विचार करण्यास प्रभावित केले आहे. माझ्यासारख्या अनेक लोकांना आर्थिक साक्षरता विकसित करण्यास, संपत्तीबद्दल वेगळा विचार करण्यास आणि आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने पावले उचलण्यास प्रोत्साहित केले आहे.

मी तर हे बुक वाचल आहे आणि जे काही शिकलो ते तुमच्यासोबत शेअर केल आहे. पण तरीही मी तुम्हाला आग्रह करेन की एकदा हे बुक नक्की वाचा. आणि हो तुम्हाला पोस्ट आवडली असेल तर प्लीज तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

Keep Learning! 

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

3 thoughts on “Rich Dad Poor Dad in Marathi: आर्थिक साक्षरतेचे 8 महत्वाचे धडे (नक्की वाचा)”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi