CIBIL Score: सीबील स्कोर काय आहे? का गरजेच आहे?

CIBIL Score: आजकालच्या युगात चांगली Reputation बनविणे खूप गरजेचं आहे. आणि फायनान्सच्या दुनियेत तर हे अजून जास्त गरजेचं आहे. जेव्हा पण फायनान्सच्या दुनियेत Reputation बनविण्याची चर्चा होते तेव्हा सगळ्यात पहिलं पॉइंट येतो तो म्हणजे तुमचा सिबील स्कोअर (CIBIL Score).

CIBIL या शब्दाचा अर्थ काय आहे? 

CIBIL म्हणजे Credit Information Bureau India Limited. CIBIL ही एक सरकारी कंपनी आहे जी तुम्ही किती कर्ज घेतलत, किती फेडलत, किती वेळात फेडलत, हफ्ते चुकवले तर नाही ना? इ. गोष्टींचा हिशोब ठेवते.

या माहितीचा वापर नंतर तुमचा सिबिल स्कोअर (Cibil Score) किती आहे हे बघण्यासाठी केला जातो. सिबिल स्कोअर हा 300 ते 900 यामधील 3 नंबरचा आकडा असतो. तुमचा सिबिल स्कोअर जितका चांगला असेल तितकं तुम्हाला लोन आरामात मिळू शकेल.

ही पोस्ट वाचा :- SIP काय आहे? फायदे आणि तोटे | SIP in Marathi (marathifinance.net)

तुम्हाला सिबिल स्कोअरची गरज का आहे? (Why do you need a CIBIL score?
लोन हवय? सिबिल स्कोअर दाखवा

एक चांगला सिबिल स्कोअर (Cibil Score) तुम्हाला कोणत्याही प्रकारच लोन घेताना मोठ्या प्रमाणात हेल्प करते. जर तुमचा सिबिल स्कोअर (Cibil Score) 700 च्या वर असले तर त्याला एक चांगला सिबिल स्कोअर (Cibil Score) म्हणून बोलले जाईल.

जेव्हा तुमचा सिबिल स्कोअर (Cibil Score) चांगला असतो तेव्हा बँका किंवा कोणतीही फायनॅन्स कंपनी तुम्हाला पैशाच्या बाबतीत एक जबाबदार व्यक्ती म्हणून ओळखते. जेवढा सिबिल स्कोअर (Cibil Score) चांगला तेवढा तुमच्यावर जास्त विश्वास दाखवला जातो आणि तुम्हाला लोन सहज दिल जाते. 

कमी इंट्रेस्ट रेट हवय? सिबिल स्कोअर दाखवा

सिबिल स्कोअर (Cibil Score) उत्तम असला म्हणजे तुम्हाला विविध प्रकारचे लोन सहज मिळतात. त्याचसोबत त्या लोनवर लावलेले इंट्रेस्ट रेटवर तुमच्या सिबिल स्कोअर (Cibil Score) चा मोठा परिणाम होतो. 

एक चांगला सिबिल स्कोअर (Cibil Score) असल्याने तुम्हाला कमी इंटरेस्ट रेटवर लोन मिळू शकते. याचा फायदा असा होतो की लॉन्ग टर्ममध्ये तुमचे खूप सारे पैसे वाचतात.

क्रेडिट कार्ड हवंय? सिबिल स्कोअर दाखवा

जस लोन घेताना सिबिल स्कोअर (Cibil Score) चेक केला जातो अगदी तसंच क्रेडिट कार्ड देताना तुमचा सिबिल स्कोअर (Cibil Score) चेक केला जातो.  सिबिल स्कोअर (Cibil Score) वरुन तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट ठरवली जाते.

जर सिबिल स्कोअर (Cibil Score) चांगला असेल तर तुम्हाला क्रेडिट कार्ड सहज मिळते त्यासोबत चांगली क्रेडिट लिमिट मिळते. जर क्रेडिट लिमिट चांगली मिळाली तर त्यावर भविष्यात रिवॉर्ड पॉईंट्स मिळतात, ज्याचा वापर तुम्ही शॉपिंग करण्यासाठी करू शकता. 

ही पोस्ट वाचा :- स्टेप अप एसआयपी काय आहे? का केली पाहिजे? | Step Up SIP in Marathi

Conclusion 

तुमच सिबिल स्कोअर (Cibil Score)  चांगल ठेवणे हे तुमच्या आर्थिक भविष्यासाठी गरजेच आहे. तुम्ही आजच काही पाऊले उचलू शकता आणि तुमचा सिबिल स्कोअर (Cibil Score)  सुधारू शकता जर तो खराब झाला आहे. 

लोन असो की क्रेडिट कार्डच बिल हे नेहमी वेळेवर भरा. नको तिथे क्रेडिट कार्डचा अंधाधुंद वापर करू नका. तसेच सतत एकडे लोनसाठी अप्लाय करणे, तिकडे लोनसाठी अप्लाय करणे बंद करा. इ. कारणांनी तुमचा सिबिल स्कोअर (Cibil Score) कमी होत असतो.

नेहमी लक्षात घ्या की एक चांगला सिबिल स्कोअर (Cibil Score) ही आर्थिक भविष्यामध्ये केलेली इन्वेस्टमेंट असते. 

पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. काही Feedback असेल तर कमेन्टमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या पोस्टमध्ये!

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

1 thought on “CIBIL Score: सीबील स्कोर काय आहे? का गरजेच आहे?”

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?