इएलएसएस फंड काय आहे? इन्वेस्ट केल पाहिजे की नाही? | TOP 3 ELSS Mutual Funds in Marathi

ELSS Mutual Fund in Marathi:  ELSS चा अर्थ आहे equity-linked savings scheme. ELSS फंड हा एक प्रकारचा म्यूचुअल फंड आहे ज्याचा फायदा Income Tax Act, 1961 मधील सेक्शन 80C च्या अंतर्गत टॅक्सची बचत करण्यासाठी वापरला जातो. तुम्ही जर टॅक्स भरत असाल तर या फंडचा वापर करून तुम्ही 1,50,000 पर्यंत टॅक्स रिबेट (Tax Rebate) मिळवू शकता.

ELSS म्युच्युअल फंडमधील पैसे 65%  इक्विटी आणि इक्विटी-लिंक्ड सिक्युरिटीज जसे की शेअर मार्केटमध्ये लिस्ट  असलेले विविध कंपन्याच्या शेअर्समध्ये इन्वेस्ट केले जातात. तसेच उरलेले पैसे Fixed Income सिक्युरिटीमध्ये इन्वेस्ट केले जातात. ELSS Mutual Fund हे तीन वर्षांच्या लॉक-इन पीरियडसोबत येतात.

ELSS Mutual Fund मधील 3 वर्षाचा लॉक इन पीरियड नक्की काय आहे?

जेव्हा तुम्ही एखाद्या ELSS म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट कराल तेव्हा ते 3 वर्षाच्या आधी काढता येत नाही. कस ते समजून घ्या.

समजा तुम्ही 3 वर्ष एका ELSS फंडमध्ये पैसे इन्वेस्ट केलेत. 1 जानेवारी 2024 ते 1 जानेवारी 2027. दर महिन्याला तुम्ही 1000 रुपये इन्वेस्ट करत आहात. आता नीट समजून घ्या.

पहिली SIP Installment:

1 जानेवारी 2024 (ज्याला 3 वर्ष पूर्ण होणार) 1 जानेवारी 2027

मग तुम्ही या पहिल्या SIP चे 1000 रुपये काढू शकता. (त्यावेळी त्याची जी मार्केट किंमत असेल त्या हिशोबाने)

दुसरी SIP Installment: 

1 फेब्रुवारी 2024 (ज्याला 3 वर्ष पूर्ण होणार) 1 फेब्रुवारी 2027

मग तुम्ही या दुसऱ्या SIP चे 1000 रुपये काढू शकता. (त्यावेळी त्याची जी मार्केट किंमत असेल त्या हिशोबाने)

असंच करत जर तुम्ही या 3 वर्षात सगळ्या SIP Installments (म्हणजे टोटल 36 SIP Installments) अगदी नियमितपणे भरल्यात तर जी शेवटी SIP Installment असेल त्याला तुम्ही कधी काढू शकता ते समजून घ्या.

शेवटची SIP Installment: 

1 डिसेंबर 2026 ((ज्याला 3 वर्ष पूर्ण होणार) 1 डिसेंबर 2029

मग तुम्ही या शेवटच्या SIP चे 1000 रुपये काढू शकता. (त्यावेळी त्याची जी मार्केट किंमत असेल त्या हिशोबाने)

म्हणून मी आधी सांगितल की, फक्त 3 वर्ष लॉक पीरियड म्हटल की अस नाही की 3 वर्ष झाली आणि तुम्हाला सगळे पैसे काढता येतील. 3 वर्ष लॉक इन पीरियड म्हणजे प्रत्येक SIP Installment ला 3 वर्ष झाली की तुम्ही त्यामधील पैसे काढू शकता.

हे पण वाचा:-  SIP काय आहे? फायदे आणि तोटे | SIP in Marathi 

ELSS Mutual Fund मध्ये कोणी इन्वेस्ट कराव?

टॅक्सची बचत: जर तुम्ही टॅक्स रिटर्न भरता तर तुम्ही टॅक्स वाचवण्यासाठी ELSS फंडमध्ये नक्कीच इन्वेस्ट करू शकता. टॅक्स बचत तर होतेच पण रिटर्नसुद्धा चांगलेच मिळतात. कारण या फंडमधील 65% रक्कम ही इक्विटि मार्केट म्हणजे कंपन्याच्या शेअर्समध्ये इन्वेस्ट केले जातात.

शिस्तबद्ध SIP: तुम्ही SIP तर चालू करता पण काही वेळाने काही काम येत पैशाची गरज लागते आणि SIP मोडावी लागते. अस केल्याने तुम्ही लॉन्ग टर्म वेल्थ बनवू शकत नाही. जर तुम्ही ELSS फंडमध्ये SIP केलीत तर तुम्हाला ते पैसे लगेच काढता येत नाही. त्यामुळे लॉन्ग टर्म वेल्थ बनवता येईल.

TOP 3 ELSS Mutual Fund कोणते आहेत? 

फंड निवडताना फक्त चालू रिटर्न नाही बघायचा. पण एखादा फंड नियमितपणे चांगले रिटर्न देत आहे की नाही हे बघितल पाहिजे. तसेच रिटर्न आणि एक्जिट लोड किती आहे ते पाहिल पाहिजे.

1) Parag Parikh ELSS Tax Saver Fund

  • 3 वर्षाचा रिटर्न 23.06% आहे
  • एक्जिट लोड 0 आहे (म्हणजे पैसे काढताना काही फी लागणार नाही)
  • Expense Ratio 0.72% आहे

2) Mirae Asset ELSS Tax Saver Fund

  • 3 वर्षाचा रिटर्न 17.09% आहे
  • एक्जिट लोड 0 आहे (म्हणजे पैसे काढताना काही फी लागणार नाही)
  • Expense Ratio 0.58% आहे

3) Quant ELSS Tax Saver Fund ( हा फंड जास्त रिस्क घेणाऱ्या लोकांसाठी) 

  • 3 वर्षाचा रिटर्न 31.68% आहे
  • एक्जिट लोड 0 आहे (म्हणजे पैसे काढताना काही फी लागणार नाही)
  • Expense Ratio 0.76% आहे

पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. काही Feedback असेल तर कमेन्टमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या पोस्टमध्ये!

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?