तुमच्याकडे अजून पण Rs 2000 ची नोट आहे? The Reserve Bank of India ने सांगितल इथे जावून एक्स्चेंज करा

Rate this post

1 जानेवारी 2024 ला The Reserve Bank of India (RBI) ने सांगितल की, Rs 2,000 च्या नोट्स ज्या 19 मे 2023 पर्यन्त Circulation मध्ये होत्या त्यातील 97.38% आता बॅंकिंग सिस्टममध्ये रिटर्न आल्या आहेत.

19 मे 2023 ला Circulation मध्ये असलेल्या Rs 2,000 च्या नोटांची टोटल वॅल्यू Rs 3.56 लाख करोड एवढी होती पण ती आता कमी होवून Rs 9,330 करोडवर आली आहे.

The Reserve Bank of India (RBI) ने क्लीन नोट पॉलिसी या धोरणा अंतर्गत मोठ्या नोटांना Circulation मधून कमी करण्याचा निर्णय घेतला होता. Rs 2000 ची नोट डिपॉजिट किंवा एक्स्चेंज करायची शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2023 होती.

पण तुमच्याकडे आता सुद्धा Rs 2000  नोट असेल तर तुम्ही RBI च्या Issue Offices मध्ये एक्स्चेंजची सुविधा अजून उपलब्ध आहे. तिथे जावून तुम्ही नोट एक्स्चेंज करू शकता आणि ते पैसे तुमच्या बँक अकाऊंटमध्ये घेऊ शकता. RBI चे टोटल 19 Issue Offices आहेत. त्यासोबत तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावून तिथे सुद्धा Rs 2000 ची नोट एक्स्चेंजसाठी RBI च्या Issue Offices मध्ये पाठवू शकता.

Reserve Bank of India (RBI) सांगितल की Rs 2000  ची नोट लीगल करंसी म्हणून अजून पण चालू आहे.

इतर पोस्ट वाचा👉Yes Bank चे शेअर्स 7% ने वाढले, मार्केट कॅप पोचल Rs 66,000 करोडवर शेअर मार्केट व्यवहारांसाठी UPI चा वापर होणार, NPCI ने सांगितलं

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi