Mutual Fund SIP in Marathi: सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) प्रवाहाने फेब्रुवारी 2024 मध्ये सर्वकालीन उच्चांक गाठला आहे, ज्याने पहिल्यांदा ₹19,000 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
लेटेस्ट डेटावरून असे दिसून आले आहे की फेब्रुवारी महिन्यामध्ये SIP प्रवाह ₹19,187 कोटी एवढा आहे, जो मागील महिन्याच्या म्हणजेच जानेवारीच्या ₹18,838 कोटीच्या आकड्यापेक्षा लक्षणीय वाढ दर्शवितो. नवीन SIP नोंदणींची संख्या ४९.७९ लाख एवढी आहे.
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या मते, फेब्रुवारी 2024 साठी SIP ची एकूण AUM (Asset Under Management) ₹ 10.52 लाख कोटी आहे. जानेवारी 2024 मध्ये SIP अकाउंटची एकूण संख्या 7.91 कोटी होती जी फेब्रुवारी 2024 मध्ये 8.20 कोटी एवढी झाली आहे.
Mutual Fund SIP मध्ये वाढ होण्याची कारणे काय आहेत?
आता लोकांमध्ये लॉन्ग टर्ममध्ये वेल्थ बनविण्याची जागरूकता वाढली आहे. आणि यासाठी यूट्यूब, Instagram, फायनॅन्स ब्लॉग्स तसेच बुक्स कारणीभूत आहेत. लोक पैसे मॅनेज करण्यासाठी नवीन गोष्टी शिकत आहेत.
तसेच लोकांचा शेअर मार्केटवर विश्वास वाढत आहे. आता शेअर मार्केट हे फक्त सट्टा बाजार आहे असा समज नाहीसा होत आहे. म्यूचुअल फंड SIP द्वारे अगदी सोप्या पद्धतीने पैसे मार्केटमध्ये इन्वेस्ट करता येतात जे लोकांना सोयीच वाटत आहे.
आता आयपीओ घेणे असो की डायरेक्ट स्टॉक, म्यूचुअल फंड SIP करणे असो Zerodha, Groww सारख्या Investing Apps मुळे पैसे इन्वेस्ट करणे खूप सोप झाल आहे.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 SIP काय आहे? फायदे आणि तोटे | SIP in Marathi (marathifinance.net)