आर्थिक स्वातंत्र्यासाठी तुम्ही PASSIVE INCOME कशी बनवाल?

अगदी अनेक वर्षापासून पैसे कमविण्यासाठी टाइम विकणे अशी प्रथा आहे.  टाइम विकणे म्हणजे जॉब करणे जिथे तुम्ही ठराविक टाइम देता आणि त्यानुसार तुम्हाला पैसे मिळतात. पण फक्त टाइम विकून तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा स्वप्न बघत असाल तर हे स्वप्न फक्त स्वप्न राहील. पण जर तुम्ही Passive Income ची कन्सेप्ट समजून घेतलित आणि अशा Assets मध्ये पैसे इनवेस्ट केलेत तर तुम्ही, मी अगदी आपण सगळेच या 9-5 जॉबच्या साखळीतून बाहेर पडू शकतो. जर आपल्याकडे Passive Income चे मार्ग नसतील तर कितीही मेहनत घेतली तरी आर्थिक स्वातंत्र्य खूप खूप कठीण असेल कारण ज्या दिवशी तुम्ही तुमच काम थांबवणार त्या दिवशी Income पूर्णंपणे बंद होते.

Passive Income आणि Active Income मधला फरक काय आहे? 

ॲक्टिव इन्कम – जिथे तुम्हाला पैसे कमविण्यासाठी सतत हजर रहाव लागत जस की तुमचा जॉब.

पॅसिव इन्कम- जिथे पैसे कमविण्यासाठी सतत हजर रहाव लागत नाही जस की इन्वेस्ट्मेंट्स, बिझनेस इत्यादि.

टाइम देऊन पैसे कमविणे लाइफ टाइमसाठी शक्य नाही कारण? 

आतापर्यन्त जग असच चालत आल आहे. जॉबवर अगदी 10-12 तास काम करा. जो काही थोडाफार पगार वाढतो त्यात खुश रहा. पण या मार्गाने आपण कधीच आर्थिकरित्या स्वतंत्र नाही होवू शकत. याच बेस्ट उदाहरण आहे आपले आई वडील. मी अस नाही बोलत की सगळेच लोक नोकरी करून स्वतंत्र नाही होत. काही लोक आहेत जे जॉब करून आता आर्थिकरित्या स्वतंत्र आहेत तेही कोणी सरकारी जॉब असेल तर किंवा अगदी काटकसर करून लाइफ काढली आहे.

आता अस का होत की फक्त जॉब करून 90% लोक अजूनपण श्रीमंत नाहीत? याच उत्तर अगदी सोप आहे कारण टाइम हे एक अस Asset आहे ना जे लिमिटेड आहे. तुमच्याकडे जसे 24 तास आहेत तसेच माझ्याकडे पण. मग कोणी गरीब असो की श्रीमंत टाइम हा संगळ्यांना सारखाच मिळतो.

Passive income ची पॉवर समजा

Passive Income म्हणजे अशी इन्कम जी तुम्ही तुमचा टाइम देऊन कमवत नाही. सुरुवातीला तुम्हाला थोडा टाइम द्यावा लागेल पण त्यानंतर यातून आपोआप कमाई करता आली पाहिजे तरच ती Passive Income झाली. आता Passive Income नक्की का हवी? जरा विचार करा की तुमच्याकडे पुरेसा पैसा आपोआप बनत आहे जिथे तुम्हाला सतत तुमचं लक्ष आणि वेळ द्यायची गरज नाही. अस झाल तर तुम्ही बाकीचा मोकळा वेळ तुमच्या आवडीची कामे करण्यात घालवाल. (फोटोग्राफी, Gyming, Travelling इत्यादि)

(हे वाचा :-Share Market Investment: हळूहळू श्रीमंत होण्याची संधी की झटपट गरीब होण्याचा मार्ग?)

Passive Income कमविण्याचे काही चांगले मार्ग

1) स्टॉक्स 

शेअर्समध्ये पैसे इनवेस्ट करून तुम्ही कंपन्यांचे भागीदार (Shareholder) बनता आणि लाभांशाचा (Dividend) फायदा घेऊ शकता. Dividend म्हणजे कंपनीच्या प्रॉफिटचा एक हिस्सा आहे. जर कंपनीला प्रॉफिट झाला तर यातील काही हिस्सा Dividend च्या स्वरूपात Shareholders ना वाटला जातो.

जेव्हा तुम्ही स्टॉक्स किंवा म्यूचुअल फंड अशा प्रकारच्या Assets मध्ये इनवेस्ट करता, तेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीच्या बिझनेसमध्ये इनवेस्ट करता. जस जस या Assets च्या किंमती वाढतात तुमचा पैसादेखील वाढतो. काही कंपन्या Dividends च्या रूपाने तुम्हाला त्यांच्या प्रॉफिट मधील भाग देतात. आणि Dividends पॅसिव इन्कमचा एक उत्तम मार्ग आहे.

एक उदाहरण म्हणून सांगतो, मुकेश अंबानी आणि फॅमिली 2018 च्या डेटानुसार Rs 1,804 करोंड एवढी आहे. हे शक्य झाल कारण त्यांच्याकडे जवळजवळ 47% एवढी रिलायन्स कंपनीची मालकी आहे. पण खरा मुद्दा मुकेश अंबानी यांची Divident इन्कम किती आहे हा नाहीच आहे. विचार करा जर तुम्ही पूढील 15 -20 वर्षे काही चांगल्या कंपन्याचे स्टॉक्स विकत घेत राहिलात तर तुमच्याकडे किती स्टॉक्स जमा होतील आणि त्याची Dividend इन्कम काही वर्षानंतर तुम्हाला मिळेल.

जास्त नाही पण जरी 1-2 स्टॉक्स चांगले स्टॉक्स दर महिन्याला घेतले तर काय होवू शकत. मला माही आहे या कामात चांगल्या कंपन्या निवडण्यासाठी मेहनत तर लागेल पण शेवटी या मेहनतीच फळ पण नक्कीच गोड आणि बँक बॅलेन्स वाढवणार असेल.

Stocks मध्ये पैसे इनवेस्ट करुन Dividend Income मिळवणे हा एक मार्ग झाला पण त्यासोबत स्टॉक्सची किंमत वाढते त्यातून पण प्रॉफिट कमविता येतो. कारण 100 रुपयाला घेतलेला स्टॉक अगदी आयुष्यभर 100 वर राहत नाही तो थोडा का होईना वाढणार एवढ नक्की. पण अट हीच आहे की त्या स्टॉकच्या मागे असलेली कंपनी चांगली असावी.

2) म्यूचुअल फंड्स 

म्यूचुअल फंड्स किती फायदेशीर आहेत आपल्यासारख्या सामान्य इन्वेस्टरना हे सांगायची गरज नाही. ज्याला स्टॉक्स निवडता नाही येत किंवा त्या भानगडीत पडायच नाहीये अशा लोकांसाठी म्यूचुअल फंड्स तर एक बेस्ट ऑप्शन आहे.

आता म्यूचुअल फंडमध्ये 2 प्रकार आहेत

1) इंडेक्स फंड :- असे फंड जे ठराविक इंडेक्समध्ये पैसे इनवेस्ट करतात जस की Sensex किंवा Nifty 50

2) Active म्यूचुअल फंड:- असा फंड जिथे फंड मॅनेजर त्याच डोक वापरुन चांगल्या कंपन्या निवडतो त्यात पैसे इनवेस्ट करतो.

तुम्ही यापैकी तुम्हाला हवा त्या टाइपचा फंड घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला 10-15 वर्षासाठी म्यूचुअल फंडचे यूनिट्स (Units) एकत्र करायचे आहेत. जेव्हा तुम्ही म्यूचुअल फंडमध्ये पैसे इनवेस्ट करता तेव्हा तुम्हाला त्या फंडचे Units मिळतात. आणि लॉन्ग टर्ममध्ये या ऊनईतस ची किंमत वाढत राहते. पण तुम्ही फंड चांगला निवडला पाहिजे.

3) Passive Income च्या इतर आयडियाज 

1 – ब्लॉगिंग करू शकता.

2- यूट्यूब चॅनल चालू करू शकता.

3- तुम्ही एखाद इबूक विकू शकता.

4- इनस्टा पेज बनवून कमाई करू शकता.

5-  तुमच्याकडे एखाद स्किल असेल तर ते विकू शकता. जस की ग्राफिक डिजायनिंग.

असे अनेक मार्ग आहेत Passive Income कमविण्याचे पण या सगळ्यासाठी सुरुवातीला तुम्हाला थोडा  टाइम द्यावा लागेल.

एक गोष्ट लक्षात घ्या (एक नाही, खर तर 2-3 गोष्टी)

  • Passive Income देणाऱ्या Assets चा एक लॉन्ग टर्म पोर्टफोलिओ तयार करणे ही एका रात्रीत श्रीमंत होण्याची स्कीम नाही. त्यासाठी काळजीपूर्वक रिसर्च, पैशाच योग्य नियोजन आणि लॉन्ग टर्म Patience आवश्यक आहे.
  • प्रत्येकाला त्यांच्या Financial goals, रिस्क घेण्याची क्षमता तसेच इनवेस्टमेंटसाठी दिलेला टाइम इ गोष्टींच मूल्यांकन करुन मग स्वतसाठी Assets निवडायचे आहेत.
  • जेव्हा जेव्हा तुम्ही अशा Assets मध्ये पैसे इनवेस्ट करणार जिथून आता लगेच नाही पण फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचे चांगले रिटर्न मिळणार आहेत तेव्हा तेव्हा तुम्ही फ्युचरमधला तुमचा टाइम फ्री करत आहात. जिथे तुम्ही तो टाइम तुमच्या फॅमिलीसोबत, तुमच्या Hobbies साठी तसेच तुमच्या आवडीच्या इतर गोष्टींसाठी वापरणार आहात.
  • कालांतराने, या Assets मधून मिळणारी इन्कम वाढू शकते, ज्यामुळे संभाव्यत: आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वतःच्या अटींवर लाइफ जगण्याची क्षमता तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे अगदी या क्षणापासून Passive Income कशी बनवता येईल त्यामागे लागा. छोटी तर छोटी पण नुसत जॉबवर अवलंबून न राहत Passive Income असणे कधीही चांगल.

Passive Income बनविण्यासाठी 3 सिम्पल टिप्स 

  • छोटी सुरुवात करा. – सुरुवातीला सगळंच करायला जावू नका. Rs 500 इनवेस्ट केलेत तरी उत्तम तसेच एखाद्या स्किलवर दररोज 30 मिनिटे दिलीत तरी पुरे असतील. त्यानंतर हळूहळू जसा अनुभव येत जाईल, इनवेस्टमेंटचे पैसे किंवा एखाद्या स्किलवर द्यावा लागणारा वेळ वाढवा.
  • संयम ठेवा.  – पॅसिव इन्कमचा कोणताही मार्ग बनवताना वेळ तर लागेल. अगदी झटपट सगळ होईल याची अपेक्षा सोडा.
  • बस! लगे रहो.  – सुरुवातीला रिजल्ट्स नाही दिसले तर नाराज होवून हार मानू नका. सतत काम करत रहा कारण एक दीवशी तुम्ही तुमचे गोल्स नक्की पूर्ण करणार.

अजून खूप सारे मार्ग आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही पैसे कमवू शकता. पण हे सगळ करत असताना तुमचे स्किल्स, तुमची आवड किंवा तुम्ही किती रिस्क घेऊ शकता या सगळ्या गोष्टींवर लक्ष देणे खूप गरजेच आहे.

Happy Investing!

2 thoughts on “आर्थिक स्वातंत्र्यासाठी तुम्ही PASSIVE INCOME कशी बनवाल?”

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi