Azad Engineering Share: आज झाली लिस्टिंग, सचिन तेंडुलकर यांनी कमविला 531% एवढा रिटर्न

Rate this post

Azad Engineering Share Price: आझाद इंजिनिअरिंगच्या शेअर्सनी  स्टॉक मार्केटमध्ये मजबूत एन्ट्री घेतली आहे. आझाद इंजिनिअरिंग शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर  ₹720 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत.  याचा अर्थ असा की इन्वेस्टरना पहिल्याच दिवशी 37% चा प्रॉफिट झाला आहे.

आझाद इंजिनिअरिंग आयपीओ 20 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 22 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. आझाद इंजिनिअरिंग आयपीओची इश्यू प्राइस 740 करोड रुपये होती. आणि या आयपीओची प्राईस बॅंड 499 रुपये ते 524 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. आझाद इंजिनिअरिंग आईपीओची अलॉटमेंट तारीख 26 डिसेंबर 2023 होती. आज या आयपीओची लिस्टिंग NSE आणि BSE अशा दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर झाली.

Azad Engineering Share + Sachin Tendulkar 

आझाद इंजिनिअरिंगच्या शेअर्सनी सचिन तेंडुलकर यांना जबरदस्त रिटर्न कमवून दिला आहे. त्यांच्या इन्वेस्टमेंटची वॅल्यू जवळजवळ 6 पट झाली आहे. सचिन तेंडुलकर यांच्या आझाद इंजिनिअरिंग कंपनीचे 4.3 लाख शेअर्स आहेत जे त्यांनी Rs 114.10 प्रती शेअर या हिशोबाने मार्च 2023 मध्ये घेतले होते. आणि आज या शेअर्सची लिस्टिंग Rs 720 ने बीएसई आणि एनएसई या दोन्ही मुख्य स्टॉक एक्स्चेंजवर झाली.

सचिन तेंडुलकर यांनी टोटल 5 करोड रुपये आझाद इंजिनिअरिंगमध्ये हिस्सेदारी घेण्यासाठी दिले मार्च 2023 मध्ये दिले होते. आज त्या 5 करोडची किंमत Rs 31.5 करोड झाली आहे. म्हणजे जवळजवळ 531% एवढा रिटर्न.

सचिन तेंडुलकर याच्यासोबत इतर काही प्रसिद्ध खेळाडूनी शेअर मार्केटमध्ये आपल नशीब अजमवल आहे आणि नक्कीच  त्यांना चांगले रिटर्न मिळाले आहेत. सायना नेहवाल, पी वी सिंधु आणि वी वी एस लक्ष्मण यांनी इन्वेस्ट केलेले पैसे 3 पट झाले आहेत.

Investor Number of Shares Adjusted Avg. Cost Listing Price Gain per Share Total Gain
Sachin Tendulkar 430,000 Rs 114.10 Rs 720 Rs 605.90 Rs 260,807,000
Saina Nehwal 44,000 Rs 228.17 Rs 720 Rs 491.83 Rs 21,636,520
PV Sindhu 44,000 Rs 228.17 Rs 720 Rs 491.83 Rs 21,636,520
VVS Laxman 44,000 Rs 228.17 Rs 720 Rs 491.83 Rs 21,636,520

 

इतर पोस्ट वाचा👉Innova Captab IPO GMP: 19% प्रीमियमवर होणार लिस्ट (ग्रे मार्केटचे संकेत)

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi