Ola Electric IPO: भारताचा पहिला इलेक्ट्रिक वेहिकल कंपनी आयपीओ

Rate this post

Ola Electric IPO: आजकाल जणू भारतीय शेअर मार्केटमध्ये आयपीओचा पाऊस पडतोय. दिवसेंदिवस नवीन आयपीओ येत आहेत आणि गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवत आहेत. आणि आता ओलाने देखील आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरसह आयपीओच्या शर्यतीत प्रवेश केला आहे.

ओला इलेक्ट्रिक ही भारतातील पहिली इलेक्ट्रिकवेहिकल कंपनी असणार आहे. आणि जर आपण ऑटो सेक्टरबद्दल बोललो तर 20 वर्षानंतर एखादी कंपनी आयपीओ घेऊन येत आहे. मारुती सुझुकीने शेवटचा आयपीओ 2003 मध्ये आणला होता. शेअर बाजारातील सर्व गुंतवणूकदार 2024 मध्ये येणाऱ्या ओला इलेक्ट्रिक आयपीओची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Ola Electric IPO Details

ओला इलेक्ट्रिक स्कूटर बनवणारी कंपनी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीने SEBI (भारतीय सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड) कडे आयपीओ कागदपत्रे सबमिट केली आहेत. ओला इलेक्ट्रिक या आयपीओच्या माध्यमातून 7250 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत आहे. त्यापैकी 5,500 कोटी रुपयांचा नवीन इश्यू असेल आणि उरलेले 1,750 कोटी रुपये ऑफर फॉर सेलच्या स्वरूपात विकले जातील. ऑफर फॉर सेल म्हणजे कंपनीचे फाऊंडर आणि प्रोमोटर्स त्यांची हिस्सेदारी विकणार आहेत.

Detail Amount (in Rs Crore)
Total IPO Size 7,250
Fresh Issue 5,500
Offer for Sale (OFS) 1,750

Ola Electric IPO Offer for Sale

कंपनीचे फाऊंडर भावीश अग्रवाल त्यांच्या स्टॉकचे ४.७३ कोटी शेअर बाजारात विकणार आहेत. त्यातोबत ओला इलेक्ट्रिक कंपनीचे इतर गुंतवणूकदार जसे की इंदुज ट्रस्ट 41.78 लाख शेअर्स विकतील. सॉफ्टबँक ग्रुपचे जास्तीत जास्त शेअर्स विकले जातील, ज्यांचे एकूण 2.38 कोटी शेअर्स असतील. आणि काही गुंतवणूकदार जसे की मॅट्रिक्स पार्टनर्स, टायगर ग्लोबल आणि अल्फा वेव्ह व्हेंचर्स II त्यांची हिस्सेदारी विकणार आहेत.

Ola Electric IPO Funds

आयपीओद्वारे उभारलेल्या 5,500 कोटींपैकी 1,200 कोटी रुपये ओलाच्या सुबसिडरी कंपनी (Ola Cell Private Technologies) सेल प्रॉडक्शन वाढवण्यासाठी वापरले जातील. आणि 1,600 कोटी रुपये रिसर्च  आणि डेवलपमेंटसाठी वापरले जातील. 5,500 कोटींपैकी 800 कोटी रुपये कंपनीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरण्यात येणार आहेत. 350 कोटी रुपये इतर कॉर्पोरेट खर्चासाठी असतील.

Purpose Amount (in Rs Crore)
Subsidiary Manufacturing Expansion 1,200
Research and Development 1,600
Repayment of Company’s Debt 800
Corporate Expenses 350

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Azad Engineering IPO Grey Market Premium: इन्वेस्टरना 71% प्रॉफिटची अपेक्षा? (marathifinance.net)

Azad Engineering IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल? (marathifinance.net)

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi