Motisons Jewellers IPO GMP: इन्वेस्टरना 100% प्रॉफिट मिळणार? ग्रे मार्केटचे संकेत

Motisons Jewellers IPO: मोटीसन्स ज्वेलर्स 20 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेली एक ज्वेलरी बनवणारी कंपनी आहे. मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओ 18 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 20 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओची प्राईस बॅंड 52 रुपये ते 55 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. उद्या या आयपीओची लिस्टिंग बीएसई आणि एनएसई या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर केली जाईल. पण त्याआधी इन्वेस्टर नजर या आयपीओच्या GMP वर आहे. 

Motisons Jewellers IPO Grey Market Premium Today

बाजार निरीक्षकांनी सांगितले की मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओ GMP आज (25 डिसेंबर 2023) ₹55 रुपये आहे.  शुक्रवारी GMP ₹89 रुपये एवढा होती. म्हणजेच मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओचा Grey Market Premium ₹34 रुपयांनी कमी झाला आहे. आयपीओला इन्वेस्टरकडून जोरदार प्रतिसाद मिळाला असून हा आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर  173.03  टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. ग्रे मार्केट प्रीमियम कमी झाल्याच कारण सध्या शेअर मार्केटमध्ये झालेली घसरण असू शकते. त्यामुळे इन्वेस्टरचा कॉन्फिडंस कमी झालेला दिसत आहे.  (ग्रे मार्केट प्रीमियम कॅलक्युलेशन उदाहरण: मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओची जास्त प्राइस + चालू ग्रे मार्केट प्रीमियम = आयपीओची लिस्टिंग प्राइस 👉 55 रुपये + 55 रुपये = 110 रुपये (जवळ जवळ हा आयपीओ लिस्टिंगच्या दिवशी 100% चा प्रॉफिट देईल अशी अपेक्षा आहे)

Parameter Amount (in INR)
IPO Price 55
Grey Market Premium 55
Listing Price (IPO + Premium) 110

What is Grey Market Premium 

कोणताही आयपीओ BSE आणि NSE सारख्या मोठ्या स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होण्याआधी Unofficial मार्केटमध्ये त्या आयपीओच्या शेअर्सची खरेदी विक्री होते यालाच ग्रे मार्केट अस म्हणतात. इथे शेअर्सची खरेदी विक्री ही over-the-counter market स्वरूपात केली जाते याचा अर्थ असा की इथे स्टॉक एक्स्चेंजचा काही संबंध येत नाही. ग्रे मार्केटमधील आयपीओची किंमत ही आयपीओच्या किंमतीपेक्षा वेगळी असू शकते. ग्रे मार्केट प्रीमियमवरुन एखादा आयपीओ लिस्ट झाला की प्रॉफिट देईल की लॉस याचा अंदाज लावला जातो.

Motisons Jewellers IPO Allotment & Listing Dates

Anchor Investors Allotment: December 15, 2023
IPO Open Date: December 18, 2023
IPO Close Date: December 20, 2023
Basis of Allotment: December 21, 2023
Refunds: December 22, 2023
Credit to Demat Account: December 22, 2023
IPO Listing Date: December 26, 2023

Motisons Jewellers IPO FAQs (in Marathi) 

1) मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओची अलॉटमेंट तारीख 21 डिसेंबर 2023 आहे.

2) मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओची रिफंड तारीख 22 डिसेंबर 2023 आहे.

3) मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

मोटीसन्स ज्वेलर्स आयपीओ 26 डिसेंबर 2023 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Motisons Jewellers IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल? 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

2 thoughts on “Motisons Jewellers IPO GMP: इन्वेस्टरना 100% प्रॉफिट मिळणार? ग्रे मार्केटचे संकेत”

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi