Save Money: बजेटच्या बाहेर खर्च होतो? तुम्ही Anchoring Bias चे शिकार तर नाही होत?

How to Save Money: तुम्ही कधी एखाद्या स्टोरमध्ये काही वस्तु घ्यायला गेलात. तुमच्या माइंडमध्ये एक बजेट ठरलेल आहे. पण तरीही सुद्धा तुम्ही जास्त खर्च करून आलात? हे कस झाल?

तिथल्या सेल्स मॅनने तुम्हाला आधी एक महागडा ऑप्शन दाखवला आणि मग त्याहून कमी किंमतीचा ऑप्शन? अस करून तुमच्या बजेटच्या बाहेर जरी गेली ती वस्तु तरी तुम्ही घेऊन आलात. मग तुम्ही नक्कीच Anchoring Bias चे शिकार झाला आहात.

अँकरिंग बायस (Anchoring Bias) काय आहे ?

अँकरिंग बायस (Anchoring Bias) हा एक संज्ञानात्मक सापळा आहे जिथे निर्णय घेताना तुम्हाला मिळालेल्या पहिल्या माहितीवर तुम्ही खूप जास्त अवलंबून असता. माहितीचा हा पाहिला भाग, ज्याला “अँकर” देखील म्हटले जाते, हा एक संदर्भ बिंदू बनतो जो आपल्या निर्णयावर परिणाम करतो.

हे एका मेंटल शॉर्टकटसारखे आहे. आपला माइंड आपल्यासोबत खेळत असत. सर्व उपलब्ध ऑप्शनना काळजीपूर्वक मूल्यांकन करण्याऐवजी, आपण अँकरचा आधाररेखा म्हणून वापर करतो आणि तिथून आपले निर्णय घेतो जे अनेकदा चुकीचे असतात.

एक एक्झॅम्पल देतो मग नीट समजेल 

जेव्हा Apple कंपनीने सगळ्यात पहिलं iPad लॉंच केला तेव्हा प्रेझेंटेशन देताना आधी त्याची किंमत 999 डॉलर अशी सांगितली पण नंतर ती 499 डॉलर अशी सांगितली. आता यालाच Anchoring Bias असे म्हणतात. आधीची किंमत 999 डॉलर हा आता अँकर बनला आहे ज्याला पकडून 499 ही कमी किंमत वाटत आहे.

कोणतेही वस्तु घेताना आपल्यासोबत हेच होत किंवा केल जात. आधी महागडा ऑप्शन दाखवला जातो मग त्याहून कमी किंमत असलेला ऑप्शन दाखविला जातो. मग आधीच्या  किंमतीपेक्षा ही किंमत मस्त वाटते आणि आपण लगेच हवी असलेली वस्तू बजेटच्या बाहेर असली तरी खरेदी करतो.

काही कॉमन चुका ज्या आपण दररोजच्या लाइफमध्ये करत असतो. आपल्या कळत नकळत अँकरिंग बायस (Anchoring Bias) आपल्या माइंडसोबत खेळत असत. कस ते समजून घ्या.

नवीन फोन घेताना:

तुम्हाला नवीन फोन हवाय. बजेट आहे 25,000 रुपये.  तुम्ही यूट्यूब सगळ्या विडियो बघायला सुरुवात करता. आयफोनच्या विडियो बघता, मग Pixel Phone आणि त्याच्या किंमती असतात 70,000+ रुपये. यार एवढ महाग तर नको. तुम्ही मग 40,000 च्या खालचे फोन बघता. (आता इथे गडबड व्हायला सुरुवात होते) तुम्ही विचार करता 25,000 मी इन्वेस्ट करत आहेच ना, थोडे अजून पैसे टाकून 40,000 चा फोन घेतो.

इथे अँकरिंग बायस (Anchoring Bias) तुमच्या माइंडवर काम करत आहे. 70,000 चा फोन आता तुमचा “अँकर”  पॉइंट बनला आहे. त्याचाशी तुलना करून आता तुम्ही पुढचे निर्णय घेणार आहात. म्हणून तुम्हाला आता 40,000 फोन चांगला ऑप्शन वाटत आहे. भलेही हा फोन तुमच्या बजेटच्या बाहेर जात आहे. तरीही तुम्हाला चालेल.

नवीन घर घेताना:

तुम्ही नवीन घर घायचा विचार करत आहात. तुम्ही बजेट काढल आहे 60 लाखाच. पण एक दिवशी मित्र ऑफिसमध्ये पेढे वाटत आहे. तुमच्या हातावर पेढा ठेवला तुम्ही विचारलात. भावा कसला पेढा? मित्र बोलतो नवीन घर घेतल.

तुम्ही बोललात, अरे अभिनंदन! कितीला घेतल? मित्र बोलतो 80 लाख. (आता इथे अँकरिंग बायस (Anchoring Bias) तुमच्या माइंडवर काम करायला सुरुवात करत) तुम्हाला वाटत, अरे तो पण माझ्यासोबत काम करतो. तो मॅनेज करू शकतो तर मी पण करू शकतो. आता तुमच नवीन बजेट आहे 80 लाख.

तुमच खर बजेट 60 लाखाच असल तरीही तुम्ही आता 80 लाखाच घर घेणार. कारण 80 लाखाच मित्राच घर तुमच्यासाठी “अँकर”  पॉइंट बनला आहे. ज्याला केंद्रबिंदु ठेवून तुम्ही आता सगळे निर्णय घेणार आहात.

अँकरिंग बायस (Anchoring Bias) पासून स्वताला कस वाचवाल? 
बजेट बनवा (पण त्यासोबत अडून रहा):

कोणीही, कितीही बोलेल. तुम्ही तुमच्या बजेटमध्ये खर्च करा. मित्राने काय घेतल, मैत्रीणीने काय घेतल त्यानुसार तुम्हाला तुमचे निर्णय घ्यायचे नाहीत. जे काही आहे ते बजेटमध्ये करा.

स्वता रिसर्च करा:

कोणतीही खरेदी करताना त्याची किंमत आधी बघा. त्यामध्ये किंमतीमध्ये काही मार्केटिंग टॅकटिक्स तर वापरले गेले नाहीत ना? तुम्हाला येडा बनवण्यासाठी. जस की अँकरिंग बायस (Anchoring Bias). आधी किंमत कमी दाखवणार मग जास्त.

कोणत्याही प्रकारची खरेदी करताना अँकरिंग बायस (Anchoring Bias) ला समजून घ्या. आणि मग योग्य यो निर्णय घ्या. अस केल्याने खूप सारे पैसे वाचतील एवढ तर पक्का आहे. पोस्ट आवडली ना? काहीतरी नवीन शिकला असाल तर पोस्ट नक्की शेअर करा.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Power of Compounding: तुमच्या श्रीमंतीची गुरुकिल्ली? का आणि कस? (marathifinance.net)

1 thought on “Save Money: बजेटच्या बाहेर खर्च होतो? तुम्ही Anchoring Bias चे शिकार तर नाही होत?”

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?