Jyoti CNC Automation IPO: ज्योती सीएनसी ऑटोमेशन आयपीओची लिस्टिंग उद्या म्हणजेच 16 जानेवारी 2023 रोजी बीएसई आणि एनएसई या स्टॉक एक्स्चेंजवर होणार आहे. शेअर मार्केटमधील इन्वेस्टरनी या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद दिला होता. हा आयपीओ 38.53 टाइम्स subscribe झाला आहे.
या आयपीओच्या लिस्टिंगला घेऊन मार्केट एक्स्पर्ट खूप बुलीश दिसत आहेत. या IPO ची इश्यू प्राइज 331 रुपये होती. इश्यू प्राइजच्या तुलनेत हा आयपीओ 10% – 15% प्रीमियमने लिस्ट होईल अशी अपेक्षा मार्केट एक्स्पर्टना आहे.
जॉइन मराठी फायनॅन्स कम्यूनिटी👉 (@marathifinance)
Jyoti CNC Automation IPO Grey Market Premium चे संकेत काय आहेत?
15 जानेवारी 2023 ला ग्रे मार्केटमध्ये या आयपीओची किंमत 51 रुपये चालू होती जी आज 12 रुपयांनी घसरून 39 रुपयांवर आली आहे. जर आपण या आयपीओची इश्यू प्राइज 331 रुपये घेतली + ग्रे मार्केट प्रीमियम तर इन्वेटर्स 370 रुपयांची लिस्टिंग प्राइज मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे इन्वेटर्सना जवळजवळ 12% लिस्टिंग प्रॉफिट मिळण्याची शक्यता आहे.
Parameter | Amount (in INR) |
---|---|
IPO Price | 331 |
Grey Market Premium | 39 |
Listing Price (IPO + Premium) | 370 |
Jyoti CNC Automation कंपनीबद्दल माहिती
ज्योती सीएनसी ऑटोमेशन ही जगातील CNC (metal-cutting computer numerical control) मशीन बनवणारी एक प्रमुख कंपनी आहे. भारतीय मार्केटमध्ये या कंपनीकडे 10% मार्केट शेअर आहे.
ज्योती सीएनसी ऑटोमेशन या बिझनेसमध्ये 20 पेक्षा जास्त वर्षासाठी काम करत आहे. ज्योती सीएनसी ऑटोमेशन विविध क्षेत्रातील कंपन्याना customised सोल्यूशन्स देते.
कंपनीकडे 3000 पेक्षा जास्त क्लाईंट आहेत जे भारत, एशिया, यूरोप, नॉर्थ अमेरिका तसेच जगभरात पसरलेले आहेत. 1 एप्रिल 2004 पासून कंपनीने 30,000 एवढ्या CNC मशीन जगभरात विकल्या आहेत.
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Medi Assist Healthcare IPO: आज आयपीओ चालू होणार (अप्लाय करण्याआधी हे वाचा)