R K SWAMY IPO: आज आयपीओ सुरू होणार, अप्लाय करण्याआधी माहिती वाचा

Rate this post

R K SWAMY IPO Review in Marathi: आर के स्वामी आयपीओ आज 4 मार्च 2024 रोजी  सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 6 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. आर के स्वामी आयपीओची इश्यू साइज ₹424 करोड एवढी आहे.

या आयपीओची किंमत₹270 ते  ₹288 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 50 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,400 रुपये असेल.

R K SWAMY IPO Company Details

आर के स्वामी ही ५० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेली एक आघाडीची भारतीय मार्केटिंग सेवा कंपनी आहे. ते क्रिएटिव डिझाइन, मीडिया प्लॅनिंग, डेटा अनॅलिसिस आणि मार्केट रिसर्च यासह विस्तृत सेवा देतात. ते विविध उद्योगांमध्ये अनेक मोठ्या भारतीय कंपन्यांसोबत काम करतात.

काही मोट्या कंपन्या:- Aditya Birla Sun Life AMC Limited, Cera Sanitaryware Limited, Dr. Reddy’s Laboratories Limited, E.I.D. – Parry (India) Limited, Fujitsu General (India) Private Limited, Gemini Edibles and Fats India Limited, Havells India Limited, Hawkins Cookers Limited इ.

आर के स्वामी त्यांच्या सर्विसमध्ये मोठ्या प्रमाणावर डेटा आणि डिजिटल टूल्सचा वापर करतात. गेल्या वर्षात, त्यांनी असंख्य marketing campaigns  राबविले आहेत, मोठ्या प्रमाणात डेटाचे विश्लेषण केले आणि लाखो ग्राहक सर्वेक्षण केले. 12 शहरांमध्ये 2,300 हून अधिक कर्मचाऱ्यांसह, ते चांगली सर्विस देण्यासाठी आणि ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांची क्षमता सतत वाढवण्याचा प्रयत्न करतात.

R K SWAMY IPO Funds
  • कंपनीसाठी लागणारा वर्किंग कॅपिटलची गरज या आयपीओमधून आलेल्या पैशातून पूर्ण केली जाईल.
  • डिजिटल व्हिडीओ कंटेंट प्रोडक्शन स्टुडिओ (“DVCP Studio”) उभारण्यासाठी लागणारा खर्च या आयपीओमधील आलेल्या पैशातून केला जाईल.
  • इतर कॉर्पोरेट कामांसाठी हा पैसा वापरला जाईल.
R K SWAMY Company Financial Report
  ₹ in Crores
Year Revenue Expense PAT
2021 ₹183.22 ₹154.39 ₹3.07
2022 ₹244.97 ₹200.54 ₹19.25
2023 ₹299.91 ₹237.00 ₹31.25
2023 6M ₹142.55 ₹121.58 ₹7.93
R K SWAMY IPO Allotment & Listing Date

आर के स्वामी आयपीओची सुरवात 4 मार्च 2024 रोजी सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 6 मार्च 2024 रोजी बंद होणार आहे. आर के स्वामी आयपीओची अलॉटमेंट 7 मार्च 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग  12 मार्च 2024 रोजी केली जाईल.

Price Band Announcement: March 3, 2024
IPO Open Date: March 4, 2024
IPO Close Date: March 6, 2024
Basis of Allotment: March 7, 2024
Refunds: March 11, 2024
Credit to Demat Account: March 11, 2024
IPO Listing Date: March 12, 2024
R K SWAMY IPO FAQs (in Marathi)

Question 1) आर के स्वामी आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?

Answer: आर के स्वामी आयपीओची अलॉटमेंट तारीख 7 मार्च 2024 आहे.

Question 2) आर के स्वामी आयपीओची रिफंड तारीख काय आहे?

Answer: आर के स्वामी आयपीओची रिफंड तारीख  11 मार्च 2024 आहे.

Question 3) आर के स्वामी आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?

Answer: आर के स्वामी आयपीओ 12 मार्च 2024 ला BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉How to Make Money: तुमच्या पैशापासून पैसा कसा बनवाल? (marathifinance.net)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi