R K SWAMY IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? आयपीओ प्रॉफिट देणार की लॉस?

R K SWAMY IPO GMP: आर के स्वामी आयपीओ 4 मार्च 2024 रोजी  सुरू झाला होता आणि हा आयपीओ 6 मार्च 2024 रोजी बंद झाला आहे. आर के स्वामी आयपीओची इश्यू साइज ₹424 करोड एवढी होती.

आर के स्वामी आयपीओची अलॉटमेंट तारीख 7 मार्च 2024 ही ठरविण्यात आली आहे. ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 11 मार्च 2024 रोजी शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये क्रेडिट होतील. 

पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही झाले, त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 11 मार्च 2024 रोजी सुरू केली जाईल. 

R K SWAMY IPO GMP काय आहे? 

बाजार निरीक्षकांनी सांगितले की आर के स्वामी आयपीओची GMP किंवा Grey Market Premium 21 रुपये चालू आहे. ग्रे मार्केटमध्ये आर के स्वामी आयपीओचे शेअर्स प्रीमियमवर ट्रेड करत आहेत. 

जर या आयपीओची इश्यू प्राइस (Upper Band) 288 रुपये घेतली तर लिस्टिंगच्या दिवशी 288 + 21 असे टोटल 309 रुपयाने या आयपीओची लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ इन्वेस्टरना पहिल्या दिवशी जवळजवळ 7.29% रिटर्न मिळण्याची अपेक्षा आहे. 

 Grey Market Premium काय आहे? 

कोणताही आयपीओ BSE आणि NSE सारख्या मोठ्या स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होण्याआधी Unofficial मार्केटमध्ये त्या आयपीओच्या शेअर्सची खरेदी विक्री होते यालाच ग्रे मार्केट अस म्हणतात.  इथे शेअर्सची खरेदी विक्री ही over-the-counter market स्वरूपात केली जाते याचा अर्थ असा की इथे स्टॉक एक्स्चेंजचा काही संबंध येत नाही. 

ग्रे मार्केटमधील आयपीओची किंमत ही आयपीओच्या किंमतीपेक्षा वेगळी असू शकते. ग्रे मार्केट प्रीमियमवरुन एखादा आयपीओ लिस्ट झाला की प्रॉफिट देईल की लॉस याचा अंदाज लावला जातो.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉How to Make Money: तुमच्या पैशापासून पैसा कसा बनवाल? (marathifinance.net)

1 thought on “R K SWAMY IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? आयपीओ प्रॉफिट देणार की लॉस?”

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?