एमर्जन्सि फंड नेमकं आहे तरी काय? | Emergency Fund in Marathi

Rate this post

Emergency Fund in Marathi: आजकाल कधी काय होईल हे कोणालाच सांगता येत नाही. त्यामुळे आर्थिकरित्या तयार असणे हे अत्यंत गरजेच झाल आहे.

अशा अचानक येणाऱ्या छोट्या मोठ्या प्रॉब्लेम्ससोबत लढण्यासाठी एमर्जन्सि फंड तयार असणे काळाची गरज आहे. मग अचानक येणारी मेडिकल एमर्जन्सि असो की नोकरी गेल्याच टेंशन, गावी घराच काम असो आणि अशा अनेक प्रकारच्या कामांसाठी एमर्जन्सि फंड तयार असायला हवा.

कारण एमर्जन्सि फंड तयार असेल तर तुम्हाला इकडून तिकडून पैसे काढावे लागणार नाहीत.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

Emergency Fund ला समजून घ्या

एमर्जन्सि फंड म्हणजे असा अकाऊंट जिथे अचानक येणाऱ्या खर्चासाठी वेगळे पैसे जमा केले जातात. आणि एमर्जन्सि फंड एक प्रकारच आर्थिक आधार असतो जो तुमच्या लॉन्ग टर्म Financial goals मध्ये अडथळा येऊ देत नाही. 

Emergency Fund का गरजेच आहे?

1) कर्ज घेण्यापासून दुर ठेवत: एमर्जन्सि फंड एक आर्थिक बफर म्हणून काम करतो, ज्यामुळे तुम्ही क्रेडिट कार्ड किंवा कोणत्याही प्रकारच्या कर्जावर अवलंबून न राहता अचानक येणारा खर्च कव्हर करू शकता.  नाहीतर उगाच जास्त रिटर्न असलेले कर्ज घेऊन फ्युचरमध्ये ते फेडणे अवघड होवू शकते.  

2) डोक्याला शांती देत: तुमच्याकडे एक मजबूत  समर्पित एमर्जन्सि फंड आहे हे जाणून घेतल्यास अनिश्चित काळात  तुम्हाला सुरक्षिततेची भावना मिळते. अनेकदा अचानक येणारा खर्च आणि त्यासोवत फ्रीमध्ये येणारा तणाव आणि चिंता दूर करते कारण माझ्याकडे एमर्जन्सि फंड आहे असा विश्वास तुम्हाला असतो.

3) तुमच्या  लॉन्ग टर्म Financial goals ना जपत: समजा काही पैशाची अडचण आली आणि तुमच्याकडे एमर्जन्सि फंड नसेल तर तुम्ही काय करणार? जे आपण नेहमीच करतो,  चालू SIP मोडतो किंवा चांगले स्टॉक चालू किमतीत विकतो आणि कसे बसे पैसा जमा करतो. पण यामुळे ज्या कामासाठी SIP केली होती जस की रिटायरमेंट किंवा मुलांच शिक्षण इ. कामे मागे पडतात. 

तुमचा Emergency Fund कसा बनवाल? (Step by Step)

1) एक टार्गेट फिक्स करा:

सुरुवात करताना कमीत कमी 3 ते 6 महिन्याचा एमर्जन्सि फंड बनविण्यावर लक्ष द्या. आणि छोटे छोटे टार्गेट सेट करा जस की

1st टार्गेट – 10k

2nd टार्गेट – 25k

3rd टार्गेट – 50k

4th टार्गेट – 1 Lakh

अगदी असच चालू ठेवा आणि प्रत्येक वर्षी ही रक्कम वाढवत रहा.

अजून एक गोष्ट म्हणजे एमर्जन्सि फंडची रक्कम ठरवताना तुमच्या जॉबची Stability, तुमच्यावर किती व्यक्ति अवलंबून आहेत, आजार इ गोष्टींचा नीट विचार करा.

2) तुमचे खर्च ट्रॅक करा 

खर्च ट्रॅक करणे म्हणजे अनेकांना हेच वाटत की, आज चायला 10 रुपये गेले, बससाठी 15 रुपये गेले असे छोटे छोटे खर्च ट्रॅक करणे. जरा विचार करा हे खर्च ट्रॅक करून यांना कमी करता येणारे आहे का?

नाही कारण हे असे खर्च आहेत जे रोजच्या लाइफसाठी आपल्याला करावेच लागतात.

या पेक्षा तुम्ही एक बजेट बनवा जस की महिन्याचा 3000 रुपये फक्त बारीक खर्चासाठी तुम्ही वापरणार आहात. आता या 3000 च्या बाहेर जावून खर्च कसे टाळता येतील यावर तुम्ही नक्कीच लक्ष दिल पाहिजे

आणि अचानक मूडमध्ये येऊन केले जाणारे खर्च जस की शॉपिंग तेही गरज नसताना, यावर कंट्रोल ठेवा.

3) सेविंगसाठी वेगळ अकाऊंट 

आपल्या प्रत्येकाकडे कमीत कमी 2 बँक अकाऊंट नक्कीच असतात. ज्यामध्ये तुमची सॅलरी येते त्यामधून एक ठराविक रक्कम एक वेगळ्या अकाऊंटमध्ये दर महिन्याला ट्रान्सफर करा. हे अकाऊंट Google Pay किंवा PhonePe ला अजिबात लिंक करू नका.

हे अकाऊंट फक्त आणि फक्त एमर्जन्सि फंडचा पैसा जमा करण्यासाठी असेल.

म्यूचुअल फंडसाठी बेस्ट App 👉 Groww 

4) इन्कम वाढविण्यावर लक्ष द्या

सदया तुमच इन्कम सोर्स फक्त तुमचा जॉब आहे पण जॉबसोबत एखाद छोट मोठ इन्कम सोर्स कस बनवता येईल यावर  लक्ष द्या. त्यातून तुम्हाला महिन्याचे 500 – 1000 रुपये मिळाले तरी खूप झाले. हे पैसे तुम्ही एमर्जन्सि फंड मोठा करायला वापरू शकता.

Emergency Fund ला मेंटेन करण्यासाठी काही टिप्स

1) Temptation ला टाळा: Temptation म्हणजे सतत काहीतरी घेण्याची इच्छा. एखादा नवीन फोन येतो किंवा नवीन स्मार्टवॉच मग त्यावर सगळ्या यूट्यूब विडियोस बघून बघून आपल्याला ते घ्यावस वाटत राहत.  अशा वेळी नेहमी स्वताला आठवण करुन द्या की तुम्ही हा एमर्जन्सि फंड कशासाठी बनविला आहे. 

2) फंड रिकामा झाला की पुन्हा भरा: कधी ना कधी तुम्हाला अचानक पैशाची गरज पडेल आणि तेव्हा तुम्ही या फंडमधील रक्कम वापराल. पण त्या नंतर फंडची रक्कम पुन्हा कशी वाढवीता येईल यावर लक्ष द्या. कदाचित आता तुम्हाला थोडी जास्त रक्कम एमर्जन्सि फंड साठी बाजूला काढावी लागेल.

3) नियमितपणे Emergency Fund ला Reevaluate करा: Reevaluate करणे म्हणजे त्या फंडमधील रक्कम पुरेशी आहे की नाही याचा तपास घेणे.

कदाचित आता तुम्ही + आई बाबा एवढे जण असाल त्यामुळे जास्त फंड नाही लागणार. पण एकदा लग्न आणि मूल झाल की तुम्हाला फंडची रक्कम नक्कीच वाढवावी लागेल.  त्यामुळे लाइफमध्ये येणाऱ्या अनेक परिस्थितीनुसार तसेच नवीन गोल्सनुसार तुम्हाला नियमित एमर्जन्सि फंडची रक्कम कमी जास्त करायची आहे.

An emergency fund is not an investment. It’s insurance – Ramit Sethi 

Emergency fund तयार करणे हे आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता प्राप्त करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. अचानक येणारे खर्च कव्हर करण्यासाठी तयार असलेले स्पेशल सेविंग अकाऊंट तयार करून, तुम्ही स्वत: ला कर्जापासून वाचवू शकता, तणाव कमी करू शकता आणि लॉन्ग टर्ममधील Financial Goals वर नलक्ष केंद्रित करू शकता.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi (marathifinance.net)

1 thought on “एमर्जन्सि फंड नेमकं आहे तरी काय? | Emergency Fund in Marathi”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi