99% लोकांचा 20s ते 40s पर्यन्त आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास असाच असतो (तुमचा प्रवास कसा आहे?) | Financial Freedom Journey from 20s to 40s in Marathi

कल्पना करा. तुम्ही तुमच्या 20s मध्ये आहात. आयुष्य अगदी मस्त चालल आहे. नुकतंच नवीन जॉब करताय, त्यामुळे बऱ्यापैकी इन्कम व्हायला लागली आहे. रिटायरमेंचा विचार तुम्ही आता करत नाही कारण त्यासाठी अजून खूप वेळ आहे.

पण बघता बघा 20s जाईल आणि 30s येईल. अचानकपणे तुमच्या डोक्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या येतील. मग तुम्हाला जाणीव होईल की रिटायरमेंट (Retirement) हा शब्द बोलायला सोपा आहे पण पूर्ण करायला तेवढाच कठीण.

20s ते 40s मध्ये सहसा लोकांचा प्रवास कसा असतो हे जाणुन घ्या.

20s:- कसली चिंता नाही, मस्त लाईफ

२०s मध्ये सहसा लोक त्यांच्या कॉलेजमध्ये असतात किँवा नुकतंच शिक्षण पूर्ण केलेलं असत. रिटायरमेंट (Retirement) हे एक अस ध्येय आहे ज्याला अजून खूप वेळ आहे अशी मानसिकता असते.

पहिला जॉब, पहिली कमाई आणि या कमाईने सगळ्यात आधी आपले शौक पुरे करावे अस प्रत्येकाला वाटत. नवीन फोन घेतला,  बाईक आली, मित्रांसोबत बाहेर फिरायला जाणे आणि नाही खाणे पिणे इ.

२०s हे अस वय असत जिथे सगळयात जास्त खर्च करावासा वाटतो पण सगळ्यात जास्त Saving आणि Investing याच वयात केली पाहिजे. कदाचित रक्कम छोटी असेल पण तुमच्याकडे वेळ खूप असतो त्यामुळे Power of Compounding मुळे पैसा वाढविता येतो.

जॉइन टेलीग्राम चॅनल👉 (@marathifinance)

३०s: अचानक सगळ्या जबाबदाऱ्या येतात

जसं आपण ३०s मध्ये प्रवेश करतो सत्य परिस्थिती आपल्याला समजायला लागते. जो जॉब तुम्हाला आवडत असतो त्याचा कंटाळा यायला लागतो. कारण इतके वर्ष सतत तेच तेच करून तुम्ही बोर झाला आहात.

तुम्ही कधी एकदा या सगळ्यातून बाहेर पडतोय याचा विचार करत असता. त्यासाठी रिटायरमेंटची तयारी करायला तुम्ही सुरुवात करता.

पण रिटायरमेंटचा विचार करताच इतर जबाबदऱ्या जस मी मुलाच्या शाळेची फी, होम लोन EMI, Insurance Premium आणि इतर खर्च थांबतच नाहीत. लवकर रिटायर व्हायचं स्वप्न हे फक्त स्वप्न वाटू लागत.

४०s:- काही चांगल, काही वाईट याची जाणीव

जेव्हा तुम्ही ४०s मध्ये येता तेव्हा एक प्रकारचं आनंद आणि त्यासोबत एक Regret मनात येतो. आनंद यासाठी की मेहनत करून करून तुम्ही स्वतःच घर घेतल, मुलांचं शिक्षण केलत, लाईफ एंजॉय केलीत.

पण Regret या गोष्टीचं होत की, काश मी आधीच रिटायरमेटसाठी पैसै Save अनी Invest करायला सुरूवात केली असती. छोटी रक्कम का होईना २०s ते ४०s म्हणजे २० वर्ष. या २० वर्षात एक SIP करून पण मोठी रक्कम जमा करता येऊ शकते.

इतर पोस्ट वाचा 👉खर्चाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोण | TIME Vs MONEY

Conclusion (आपण काय शिकलो) 

आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास हा प्रत्येकाचा खूप वेगळा असेल. त्यामध्ये खूप उतार चढाव तुम्हाला बघायला मिळतील. पण तुमच्या फायनान्सवर कंट्रोल करण्यासाठी योग्य वेळेची वाट बघू नका.

जर तुम्ही २०s मध्ये आहात तर सुरुवात करा आणि वेळेचा सदुपयोग जरा, जर तुम्ही ३०s मध्ये आहात तर अजून उशीर झालेला नाहीये, आणि जर तुम्ही ४०s मध्ये आहात तर अजून टाळाटाळ करून त्रास तुम्हालाच होणार आहे.

एक ध्येय ठरवा, बजेट बनवा आणि सगळयात महत्वाचं तुमच्या रिटायरमेंटसाठी पैसे Invest करा. तुम्ही ६०s मध्ये स्वतःचे आभार मानाल की तुम्ही हा निर्णय घेतलात.

Start NOW, Keep INVESTING!

1 thought on “99% लोकांचा 20s ते 40s पर्यन्त आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास असाच असतो (तुमचा प्रवास कसा आहे?) | Financial Freedom Journey from 20s to 40s in Marathi”

Leave a Comment