1 एप्रिल 2024 पासून The Insurance Regulatory and Development Authority of India म्हणजेच IRDAI ने हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी घेताना जी वयाची लिमिट होती ती पूर्णपणे काढून टाकली आहे.
आधी ही लिमिट 65 वय अशी होती. याच नुकसान अस होत की 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांना हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी नाही काढता यायची. पण आता तुमच वय कितीही असो, तुम्ही हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी काढू शकता. हा निर्णय सामान्य लोकांसाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.
IRDAI नक्की काय म्हणाली?
“प्रत्येक इन्शुरेंस कंपनीने सीनियर सिटिजन, स्टुडेंट, लहान मूल, maternity तसेच इतर गटाच्या लोकांसाठी विशिष्ट हेल्थ इन्शुरेंस प्रॉडक्ट बनविले पाहिजेत.”
IRDAI म्हणाली की भारतामध्ये एक चांगली हेल्थ इन्शुरेंस Eco System बनवली पाहिजे. तसेच विविध इन्शुरन्स कंपन्यांनी त्यांचे प्रॉडक्ट Diversify केले पाहिजेत.
IRDAI ने सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांना सांगितला आहे की सीनियर सिटीजनसाठी खास फिचर्स असलेल्या इन्शुरन्स पॉलिसीज बनवल्या जाव्यात तसेच त्यांचे क्लेम आणि इतर पॉलिसी संबंधित प्रॉब्लेम्स सोडवण्यासाठी योग्य ती तयारी करावी.
जॉइन टेलीग्राम चॅनल👉 (@marathifinance)
IRDAI ने केलेले इतर चांगले बदल
IRDAI च्या नुकत्याच आलेल्या नोटिफिकेशननुसार कोणतीही हेल्थ इन्शुरन्स कंपनी सिरीयस हेल्थ प्रॉब्लेम असलेल्या लोकांचे पॉलिसी नाकारू शकत नाही. सिरीयस प्रॉब्लेम्स जसं की कॅन्सर, Heart Failure and AIDS.
IRDAI ने या नोटिफिकेशनमध्ये हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये असलेला वेटिंग पिरेड (Waiting Period) देखील ४८ महिन्यांपासून 36 महिने असा कमी केला आहे.
वेटिंग पिरेड म्हणजे जेव्हा एखाद्या व्यक्तीला आधीपासूनच एखादा आजार असतो जस की कॅन्सर, डायबिटीस किंवा Heart Failure. तर अशा वेळी त्या आजारासाठी लागणारा इन्शुरन्स कव्हर पॉलिसी घेऊन ४८ महिन्यानंतर पुरवला जातो. (म्हणेजच ४ वर्षांनी कव्हर मिळतो)
पण या नवीन बदलामुळे सामान्य कस्टमरला असा फायदा होईल की जर एखादा मोठा आजार आधीपासून असल्यास त्या कस्टमरला पॉलिसी घेऊन चार वर्ष वाट बघावी लागणार नाही तीन वर्षांनीच तो इन्शुरन्स कव्हर घेण्यासाठी पात्र ठरेल.
इतर पोस्ट वाचा 👉99% लोकांचा 20s ते 40s पर्यन्त आर्थिक स्वातंत्र्याचा प्रवास असाच असतो (तुमचा प्रवास कसा आहे?) | Financial Freedom Journey from 20s to 40s