Rich Dad Poor Dad या बूकचे लेखक रॉबर्ट कियोसाकी आजकाल सोशल मीडियावर जरा जास्तच चर्चेत आहेत.
मोठे मोठे Influencers त्यांना fraud चा टाइटल देत आहेत. माझ्या यूट्यूब फीडवर गेले 2 दिवस याबद्दल विडियो येत आहेत म्हणून वाटल की यावर पोस्ट बनवावी.
चला तर सुरुवात करुयात.
सगळ्यात आधी त्यांच बूक Rich Dad Poor Dad
मी आता सुद्धा हेच बोलेन की Rich Dad Poor Dad हे पर्सनल फायनॅन्सवर लिहिलेल एक सुंदर बूक आहे.
या बूकमध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी Asset काय आणि Liability काय यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने फरक समजवला आहे. आता ते कर्जात आहेत म्हणून ते बूक वाईट होत नाही. त्यामध्ये असलेल नॉलेज चुकीच ठरत नाही हे आपण लक्षात घेतल पाहिजे.
तुम्ही हे बूक नक्की वाचू शकता आणि बूक वाचायच नसेल तर ही पोस्ट वाचा.–> Rich Dad Poor Dad in Marathi (आर्थिक साक्षरतेचे 8 महत्वाचे धडे)
आता रॉबर्ट कियोसाकी यांच एवढ मोठ कर्ज, यावर बोलूत.
तुम्ही जर रॉबर्ट कियोसाकी यांचे पॉडकास्ट किंवा इंटरव्ह्यु पाहिले तर तुम्हाला समजेल की त्यांनी अगदी अनेकवेळा स्पष्टपणे सांगितल आहे की मी कर्ज काढून Assets घेतो.
आता इथे कन्सेप्ट येते चांगल कर्ज आणि वाईट कर्ज.
चांगल कर्ज ते असत ज्याच वापर करून तुम्ही अजून पैसे कमविता किंवा Asset खरेदी करता. जस रॉबर्ट कियोसाकी करतात. ते जास्त पैसे रीयल इस्टेटमध्ये इन्वेस्ट करतात.
वाईट कर्ज ते असत ज्याचा वापर करून लोक मौज मज्जा करतात. जस की गाडी घेणे, आयफोन घेणे, बाहेर फिरणे इ. अशा कर्जाच्या जाळ्यात अडकलात की मग यातून बाहेर पडणे फार कठीण.
दुसरी गोष्ट रॉबर्ट कियोसाकी यांनी त्या पॉडकास्टमध्ये सांगितल की “जर माझी वाट लागली तर बँकाची पण वाट लागेल” असच काहीस. पण जरा विचार करा रॉबर्ट कियोसाकी त्यांची जास्त इन्वेस्टमेंट रीयल इस्टेटमध्ये करतात. त्यांनी कर्ज परत केल नाही तर बँका बघत बसणार नाही त्यांची ही सगळी घरे, प्रॉपर्टीज जप्त करणार आणि विकून त्यातून त्यांचे पैसे वसूल करणार.
आजकाल तुम्ही जे सोशल मीडियावर एकता, बघता त्यावर डोळे बंद करून विश्वास ठेऊ नका. आजकाल प्रत्येक जण जे ट्रेडमध्ये आहे ते करून जास्त views कसे मिळवता येईल त्यामागे असतो.
मी पण जेव्हा काही सांगतो ते वाचून स्वता logically विचार करा. आणि मग त्यावर आपल मत मांडा.
Keep Learning & Stay Informed!