Career in Share Market
एका इनस्टाग्राम फॉलोवरने मला विचारल की Share Market मध्ये कोणते करियर Career Options आहेत का? आजच्या पोस्टमध्ये आपण काही Career in Share Market यावरच चर्चा करणार आहोत. बघायला गेलो तर खूप सारे Options आहेत पण आपण काही नेमक्या Options वर बोलू जे संगळ्यांना शक्य होतील.
कधी NISM च्या वेबसाइटला भेट दिली आहे का? आता हे NISM काय हा प्रश्न पडला असेल तर सांगतो. NISM म्हणजे National Institute of Securities Markets ही एक शैक्षणिक संस्था आहे जिची सुरवात सेबीने (Securities and Exchange Board of India) 2006 मध्ये केली. NISM ची सुरुवात यासाठी केली की भारतामध्ये स्टॉक मार्केट किंवा सेक्यूरिटीज मार्केटबद्दल योग्य शिक्षण देता येईल. आणि यासाठी NISM चे 33 पेक्षा जास्त कोर्स उपलब्ध आहेत. त्यापैकी काही नेमके कोर्स खालीलप्रमाणे
NISM वेबसाइट Home – National Institute of Securities Markets (NISM) (आता लगेच तिथे जावू नका आधी खाली दिलेले Options वाचा)
Registrar and Transfer agents
यामध्ये सुद्धा दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे कॉर्पोरेट आणि दुसरं म्हणजे म्युच्युअल फंड. आपण म्युच्युअल फंडबद्दल चर्चा करू. हा एक चांगला Career in Share Market चा ऑप्शन बनू शकतो.
तुम्ही जेव्हा SIP करता, SIP ची तारीख बदलता, SIP बंद करता त्यामधून पैसे काढता,SIP ची स्टेटमेंट मागता अशा प्रकारची काम ट्रान्सफर एजंट आणि रजिस्टर एजंट करतात. ही सगळी काम म्यूचुअल फंड कंपनी करत बसत नाही. एखाद्या नवीन IPO अल की तुम्ही वाचला असेलच की या IPO साठी ही कंपनी Registrar आहे. कारण आयपीओचे फॉर्म्स मग अलॉटमेंट ही सगळी कामे Registrar and Transfer agents करतात.
उदाहरणार्थ: CAMS किंवा KFin Technologies (या Registrar and Transfer agents कंपन्या आहेत)
आता या कंपन्यांमध्ये माणसांची गरज असते आणि तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेशन असेल तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता पण ते करण्याआधी एकदा गूगल करा यासाठी जॉब्स अवेलेबल आहेत की नाही हे चेक करा.
कधी नोटिस केलत का? तुम्ही जी SIP करता त्याच स्टेटमेंट तुम्हाला कोण पाठवत. मी UTI Mutual Fund मध्ये SIP करतो पण त्याच स्टेटमेंट मला KFin Tech कडून येत. याच कारण अस की UTI म्यूचुअल फंडसाठी Transfer Agent च काम KFin Tech करते.
म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर
असा व्यक्ती जो लोकांना म्युच्युअल फंड विकतो. तुम्ही सुद्धा हे काम करू शकता जर तुमच्याकडे या एक्झॅमच सर्टिफिकेशन असेल. तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता. किंवा एखाद्या इन्व्हेस्टमेंट कंपनी किंवा म्यूचुअल फंड कंपनीमध्ये काम करू शकता. सहसा लोक Share Market मध्ये Career साठी हा ऑप्शन निवडतात.
तुम्ही अशी Ad इंस्टाग्राम वर नक्कीच बघितली असेल. अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर म्हणून रजिस्टर करून स्वतःचा बिजनेस स्टार्ट करू शकता.
पण एक गोष्ट लक्षात घ्या, यासाठी तुमच्याकडे क्लाइंट्स असले पाहिजे. उदाहरणार्थ मी हे काम करू शकतो कारण माझ्याकडे इंस्टाग्रामवर अठरा हजार फॉलोवर्स आहेत आणि मी त्यांना म्युच्युअल फंड सेल करू शकतो. (पण मी करत नाही ते वेगळी गोष्ट यावर आपण नंतर कधीतरी बोलू) तुम्हाला जर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर बनायचं असेल तर आधी Audience बनवा त्यांना फ्रीमध्ये नॉलेज द्या आणि त्यांना म्युच्युअल फंडच्या माध्यमातून कशी वेल्थ बनवता येईल हे सांगा त्यातून तुम्हाला बिजनेस मिळेल किंवा तुम्ही जिथे कुठे राहता तिथे लोकांना म्यूचुअल फंडबद्दल माहीत आहे का ते बघा. नसेल तर तुम्ही त्यांना ते कस देऊ शकता हे बघा. यातून तुम्ही बिझनेस करू शकता.
Research Analyst
जर तुम्हाला स्टॉक कसे निवडायचे हे शिकायचं असेल तर तुम्ही ही एक्झॅम देऊ शकता. जेव्हा तुम्ही एक्झाम देता आणि पास होता तेव्हा तुम्ही सेबीसोबत एक Research Analyst रजिस्टर होता. हे करून तुम्ही स्वतःचा बिजनेस स्टार्ट करू शकता किंवा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये Research Analyst म्हणून काम करू शकता. पण Share Market मधील या Career च्या ऑप्शनमध्ये जास्त मेहनत घ्यावी लागेल कारण तुम्हाला चांगले स्टॉक कसे निवडायचे हे बघायच आहे.
(आता असे जॉब शोधायसाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. एकदा गूगल करून बघा यामध्ये जॉब्स उपलब्ध आहेत की नाही ते)
इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर
यामध्ये सुद्धा दोन लेवल आहेत Level 1 आणि Level 2. नावावरून समजलं असेल की इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर म्हणजे असा व्यक्ती जो तुम्हाला इन्वेस्टमेंट कुठे आणि कशी करायची यासाठी Advice देतो. मी सुद्धा या एक्झामसाठी तयारी करत आहे जशी क्लियर होईल तुम्हाला सांगेन. आता ही एक्झॅम दिल्यावर जॉब कुठे मिळेल तर छोट्या मोठ्या इनवेस्टमेंट कंपन्या, म्यूचुअल फंड कंपन्या इ.
अजून खूप साऱ्या एक्झाम NISM च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सगळ्या एक्झाम नीट बघा त्यापैकी तुम्ही काय करू शकता हे बघा आणि मग तो करिअर ऑप्शन निवडा. आणि हो मार्केटमध्ये त्याला किती डिमांड आहे हे जरा चेक करा. आणि हो या एक्झॅमसाठी लागणारी सगळ स्टडी मटेरियल PDF फॉरमॅटमध्ये फ्रीमध्ये उपलब्ध आहे. अजून काय हवंय आणि डाउनलोड कस करायच ते सांगतो. -> तुम्हाला हवी ती एक्झॅम निवडा -> View Study Material असा एक ऑप्शन दिसेल -> ईमेल आणि नाव टाका -> स्टडी मटेरियल तुमच्यासमोर असेल. 2024 येत आहे एखादी एक्झॅम निवडून त्याच्या तयारीला लागा.
Share Market मध्ये Career बनविण्यासाठी All THE BEST भावांनो आणि बहिणींनो!👍
सपोर्ट मराठी फायनान्स ब्लॉग 🙏
जेव्हा तुम्ही या ब्लॉगवरील एड्सवर क्लिक करता त्यामुळे या ब्लॉगला हेल्प होते आणि त्यातूनच आम्ही या ब्लॉगवर माहितीपूर्ण पोस्ट तुमच्यासाठी घेऊन येत राहू तेही लाईफटाईम फ्री. मराठी फायनान्स ब्लॉगला सपोर्ट करण्यासाठी खूप खूप आभार! Keep Learning & Keep Supporting! 💡
8 thoughts on “Career in Share Market: शेअर मार्केटमध्ये कोणते करियर ऑप्शन आहेत?”