आता लहान मुलांसाठी डिमॅट अकाऊंट सुरू | Minor Trading & Demat on Zerodha in Marathi

Minor Trading & Demat on Zerodha in Marathi: सेबीने नुकतच लहान मुलांचे डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंट ओपन करण्याची परवानगी दिली आहे.

जस एखाद Minor बँक अकाऊंट त्या मुलाचे/मुलीचे आई किंवा बाबा चालवतात अगदी त्याच प्रमाणे हे डिमॅट अकाऊंट आई बाबा चालवू शकतात. (जर आई वडील नसतील तर एखादा पालक अपॉईंट केला जाईल आणि तो लहान मुलाच डिमॅट अकाऊंट वापरू शकेल)

स्टॉक ब्रोकिंग कंपनी Zerodha ने सगळ्यात आधी ही सुविधा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर लॉंच केली आहे.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

Minor Trading & Demat Account ओपन करण्यासाठी डॉक्युमेंट्स 

 • लहान मुलाच PAN कार्ड
 • लहान मुलाच आधार कार्ड
 • जन्म तारीखसाठी पुरावा म्हणून जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला किंवा मार्कशीट
 • लहान मुलाच्या बँक अकाऊंटच canceled cheque ची कॉपी  किंवा बँक स्टेटमेंट
 • पालकाचा PAN कार्ड
 • पालकाचा पत्ता (प्रूफ म्हणून पासपोर्ट किंवा ड्रायविंग लायसेंस किंवा वोटर ID
 • पालकाची सही

सेबीने त्यांच्या वेबसाइटवर अस सांगितल आहे की जो व्यक्ती एखाद्या मुलाचा आई बाबा किंवा पालक म्हणून त्याच डिमॅट अकाऊंट ओपन करत असेल तेव्हा तो स्वता स्टॉक मार्केटमध्ये ब्लॉक किंवा सस्पेंड नाही असला पाहिजे.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे शेअर लहान मुलाच्या अकाऊंटमध्ये घेतले आणि नंतर विकले जातील त्याचे पैसे डायरेक्ट त्या लहान मुलाच्या अकाऊंटमध्ये जाणार आहेत.

How to open a Minor trading account on Zerodha

 1. Zerodha.com वर लॉग इन करा आणि पालकाच्या Zerodha अकाऊंट डीटेलने कंटिन्यू करा.
 2. पालकाच्या अकाऊंटने लॉग इन केल्यानंतर मोबाइल नंबर टाकून कंटिन्यू करा.
 3. OTP येईल तो टाकून कंटिन्यू करा
 4. ईमेल ID टाका
 5. ईमेलवर OTP येईल तो टाकून कंटिन्यू करा.
 6. लहान मुलाच PAN नंबर आणि जन्म तारीख टाका. DigiLocker सोबत KYC पूर्ण करा
 7. कंटिन्यू करून लहान मुलाच आधार नंबर टाकून कंटिन्यू करा.
 8. मोबाइल एक OTP येऊल तो टाकून सबमिट करा.
 9. Digilocker  चा सेक्युर्टी पिन टाका.
 10. पुढे पालकाची डीटेल देऊन कंटिन्यू करा.
 11. पुढे लहान मुलाच्या बँक अकाऊंटची डिटेल्स द्या आणि IPV (in person verification) साठी कंटिन्यू करा.
 12. IPV करून झाल्यावर डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि कंटिन्यू करा
 13. e-sign using the Aadhaar वर क्लिक करा आणि पालकाची  e-sign ची प्रोसेस पूर्ण करा.
 14. पालकाचा आधार नंबर टाका. मोबाइल नंबरवर एक OTP येईल ते Verify करून e-sign प्रोसेस पूर्ण करा.
 15. शेवटी Application सबमिट करा. सबमिट केल्यानंतर पालकाच्या ईमेल ID वर मायनरच्या Demat अकाऊंट लॉग इन डिटेल्स पाठवले जातील.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Career in Share Market: शेअर मार्केटमध्ये कोणते करियर ऑप्शन आहेत? (marathifinance.net)

1 thought on “आता लहान मुलांसाठी डिमॅट अकाऊंट सुरू | Minor Trading & Demat on Zerodha in Marathi”

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi