Mutual Fund RE-KYC: 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार

Mutual Fund RE-KYC: जस जस आर्थिक वर्ष संपायला येत तस तस हे टॅक्स भरा, KYC करा इ. चर्चा चालू होतात. आणि तुम्ही जर म्यूचुअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करत असाल तर तुमच्यासाठी ही पोस्ट खूप महत्वाची आहे.

म्यूचुअल फंड केवायसी (Mutual Fund KYC) पुन्हा करा रे! 

तुम्ही जर कोणत्या ऑनलाइन App जस की Groww, Zerodha Coin App वरून म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करत असाल किंवा बँकमध्ये जावून SIP चालू केली असेल. एखाद्या एजेंट मार्फत म्यूचुअल फंडमध्य पैसे इन्वेस्ट केले असतील तर तुम्हाला पुन्हा केवायसी (RE-KYC) करावे लागणार आहेत.

म्यूचुअल फंड रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजेंट जस की CAMS आणि KFintech कडून तुम्हाला केवायसीसाठी एखादा ईमेल आला असेल. हे तुम्ही तुमच्या रजिस्टर ईमेल आयडीवर चेक करा.

31 मार्च 2024 पर्यन्त म्यूचुअल फंड केवायसी (Mutual Fund RE-KYC) नाही केली तर काय होईल? 

केवायसी प्रोसेस पूर्ण न केल्यास तुमच्या चालू असलेल्या SIPs, SWPs किंवा म्यूचुअल फंडमधून पैसे काढणे बंद होवू शकते.  RE-KYC करणे हे सेबीच्या KYC and the Prevention of Money-Laundering (Maintenance of Records) Rules, 2005 या Circular नुसार अनिवार्य आहे.

तुमचे केवायसी (KYC) सबमिट आहेत की नाही हे कस चेक कराल? 

जर तुम्ही आधीपासूनच म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करत आहात तर तुमचे मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी बरोबर आहे की नाही हे तुम्हाला चेक कराव लागेल. जर तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी अपडेट नसेल तर 1 एप्रिल 2024 पासून तुमची केवायसी “On Hold” ठेवली जाईल.

तुम्ही या लिंकवर जावून तुमचा मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी चेक करा. CVL | KRA Verification (cvlindia.com)

Mutual Fund Kyc

जर अपडेट नसेल तर तुम्ही प्रोसेस पूर्ण करून ते अपडेट करू शकता. जर असेल अपडेट तर सबमिट करून मोकळे व्हा. (मग तुम्हाला काही टेंशन घ्यायची गरज नाही)

जर CVL India च्या वेबसाईटवर तुमचे KYC डीटेल्स नसतील तर Karvy KRA च्या वेबसाईट तुम्ही KYC चेक करू शकता. या दोन्हीपैकी एका ठिकाणी KYC असतील तर चालेल. 👉Karvy KRA Link 

आता हे मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी चेक करायची सेबीला गरज काय आहे? 

खर तर हे आपल्या सारख्या सामान्य इनवेस्टरच्या भल्यासाठीच आहे. काही वेळा अस होत की एखादा म्यूचुअल फंड इन्वेस्टर, एखाद्या बँकमधून किंवा एखाद्या एजेंट मार्फत SIP किंवा म्यूचुअल फंडमध्ये एकत्र पैसे इन्वेस्ट करतो.

पण बँक किंवा एजेंट त्यांच काम सोप करण्यासाठी आपला नंबर तिथे टाकतात जेणेकरून OTP वेगेरे पटापट येतील आणि प्रोसेस लगेच होईल.

पण पुढे जावून त्या इन्वेस्टरला ना कसले ईमेल येतात नाही पैसे काढताना OTP येतात. आणि पुन्हा मग सगळी KYC प्रोसेस करावी लागते. आणि जेव्हा गरज असते तेव्हा पैसे काढता येत नाही. आणि म्हणून सेबीने ही RE-KYC चालू केली आहे.

पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. काही Feedback असेल तर कमेन्टमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या पोस्टमध्ये!

ही पोस्ट वाचा :- CIBIL Score: सीबील स्कोर काय आहे? का गरजेच आहे? (marathifinance.net)

1 thought on “Mutual Fund RE-KYC: 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार”

Leave a Comment

आर्थिक स्वातंत्र्य काय आहे? | What is financial freedom in Marathi भारती हेक्साकॉम (Bharti Hexacom) आयपीओची माहिती | Airtel IPO 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार | Mutual Fund RE-KYC चांगला सीबील स्कोर का गरजेच आहे? | Why do you need a CIBIL score?) सीबील स्कोर काय आहे? | What is CIBIL Score?