Azad Engineering IPO Grey Market Premium: इन्वेस्टरना 71% प्रॉफिटची अपेक्षा?

Rate this post

Azad Engineering IPO Grey Market Premium: आझाद इंजिनिअरिंग आयपीओ 20 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 22 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. आझाद इंजिनिअरिंग आयपीओची इश्यू प्राइस 740 करोड रुपये होती. आणि या आयपीओची प्राईस बॅंड 499 रुपये ते 524 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता. आझाद इंजिनिअरिंग आईपीओची अलॉटमेंट तारीख 26 डिसेंबर 2023 ही ठरविण्यात आली आहे.

ज्या लोकांना या आयपीओ अलॉट झाला असेल त्यांना 27 डिसेंबर 2023 ला शेअर्स त्यांच्या डिमॅट अकाउंटमध्ये येतील. पण ज्या लोकांनी या आयपीओसाठी अप्लाय केलं होत पण त्यांना शेअर्स अलॉट नाही होणार त्यांचे पैसे रीफंड केले जातील. रीफंडची प्रोसेस 27 डिसेंबर 2023 ला चालू होईल.

Azad Engineering IPO Grey Market Premium Today

बाजार निरीक्षकांनी सांगितले की आझाद इंजिनियरिंग IPO GMP आज (23 डिसेंबर 2023) ₹375 रुपये  आहे.  शुक्रवारी GMP ₹445 रुपये एवढा होता. म्हणजेच आझाद इंजिनियरिंग आयपीओचा Grey Market Premium ₹70 रुपयांनी कमी झाला आहे. आयपीओला इन्वेस्टरकडून जोरदार प्रतिसाद मिळाला असून हा आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर  80.65 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

ग्रे मार्केट प्रीमियम कमी झाल्याच कारण सध्या शेअर मार्केटमध्ये झालेली घसरण असू शकते. त्यामुळे इन्वेस्टरचा कॉन्फिडंस कमी झालेला दिसत आहे.  ( ग्रे मार्केट प्रीमियम कॅलक्युलेशन उदाहरण: आझाद इंजिनिअरिंग आयपीओची जास्त प्राइस + चालू ग्रे मार्केट प्रीमियम = आयपीओची लिस्टिंग प्राइस 👉 524 रुपये + 375 रुपये = 899 रुपये (जवळ जवळ हा आयपीओ लिस्टिंगच्या दिवशी 71% चा प्रॉफिट देईल अशी अपेक्षा आहे)

What is Grey Market Premium 

कोणताही आयपीओ BSE आणि NSE सारख्या मोठ्या स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होण्याआधी Unofficial मार्केटमध्ये त्या आयपीओच्या शेअर्सची खरेदी विक्री होते यालाच ग्रे मार्केट अस म्हणतात. इथे शेअर्सची खरेदी विक्री ही over-the-counter market स्वरूपात केली जाते याचा अर्थ असा की इथे स्टॉक एक्स्चेंजचा काही संबंध येत नाही. ग्रे मार्केटमधील आयपीओची किंमत ही आयपीओच्या किंमतीपेक्षा वेगळी असू शकते. ग्रे मार्केट प्रीमियमवरुन एखादा आयपीओ लिस्ट झाला की प्रॉफिट देईल की लॉस याचा अंदाज लावला जातो.

Azad Engineering IPO Allotment & Listing Dates

Anchor Investors Allotment: December 19, 2023
IPO Open Date: December 20, 2023
IPO Close Date: December 22, 2023
Basis of Allotment: December 26, 2023
Refunds: December 27, 2023
Credit to Demat Account: December 27, 2023
IPO Listing Date: December 28, 2023

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Azad Engineering IPO: फायनल सबस्क्रीप्शन स्टेटस (आयपीओ झाला बंद) 

Happy Forgings IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

2 thoughts on “Azad Engineering IPO Grey Market Premium: इन्वेस्टरना 71% प्रॉफिटची अपेक्षा?”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi