SIP Rs.250: कमीत कमी Rs. 250 रुपयांची SIP करण्यावर सेबीचा फोकस

SEBI’s Vision for Financial Inclusion

SEBI चेअरपर्सन माधबी पुरी बुच यांनी म्युच्युअल फंडांमध्ये आर्थिक समावेश वाढवण्यासाठी आणि भारतीय इक्विटी मार्केटमधील भविष्यातील वाढीचा पाया मजबूत करण्यासाठी म्युच्युअल फंडातील छोट्या Systematic Investment Plans (SIPs) च्या क्षमतेवर भर दिला.

SEBI म्युच्युअल फंड कंपन्यांसोबत सक्रियपणे काम करत आहे ज्यामुळे मार्केटमध्ये रु. 250 SIP करणे शक्य होईल, ज्याचा उद्देश Mutual Fund मध्ये Invest करण्याचा खर्च कमी करणे आणि एसआयपी सगळ्यांना परवडणारी बनविणे हा आहे.

SIPs: एक सिम्पल इनवेस्टिंग स्ट्रॅटजी 

एसआयपी नियमित, लहान गुंतवणुकीच्या तत्त्वावर चालतात, जसे बँकमध्ये Recurring Deposit असतात जिथे व्यक्ती दर महिन्याला एक ठरावीक रक्कम Invest करतो. एसआयपी एक साधी आणि प्रभावी गुंतवणूक धोरण पध्दत आहे.

भारतीय म्युच्युअल फंड बिझनेसमधील एकूण मालमत्तेचा आकडा रु. 50 ट्रिलियनचा आकडा गाठत असताना, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया (AMFI) च्या डेटावरून असे दिसून आले आहे की नोव्हेंबरमध्ये Asset Under Management (AUM) 49.04 ट्रिलियन रुपयांवर पोहोचली आहे

छोट्या SIPs च महत्व 

SEBI चेअरपर्सन माधबी पुरी बुच हे स्पष्ट करतात की कमी एसआयपीची रक्कम भारतीय इक्विटी मार्केटची लवचिकता वाढवू शकते आणि जागतिक धक्क्यांपासून मार्केटचे संरक्षण करण्यासाठी देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या भूमिकेकडे लक्ष देणे आवश्यक आहे. जर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात लोकं एसआयपीच्या मदतीने पैसे Invest करतील तर भारताची अर्थव्यवस्था नक्कीच मजबुत होईल.

SEBI चेअरपर्सन माधबी पुरी बुच SEBI मधील त्यांच्या उर्वरित कार्यकाळात रु. 250 SIP शक्य बनविण्यावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्याची लिमिट ही 500 रूपये आहे आणि काही इंडेक्स फंड आजकाल 10 किंवा 100 रुपयांपासून सुरुवात करण्याची संधी देतात.

या न्यूजवर मराठी फायनॅन्सचे विचार 

अस कधी आपल्यासोबत होत की, आपण एखादा चांगला फंड निवडतो पण त्यांची कमीत कमी SIP रक्कम 1000 रूपये असते. जर प्रत्येक Mutual Fund मध्ये कमीत कमी रक्कम ₹250 झाली तर प्रत्येकाला हव्या त्या फंडमध्ये SIP करता येईल.

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Atal Pension Yojana: – काय आहे आणि तुम्ही घेतली पाहिजे का?

Zerodha Brother’s Salary: -झीरोधा फाऊंडर्सची सॅलरी 200 करोडच्या पार

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi