Zerodha Brother’s Salary: – झीरोधा फाऊंडर्सची सॅलरी 200 करोडवर पोचली

नितिन आणि निखिल कामथ या दोन भावांनी स्थापन केलेल्या झेरोधा या स्टॉकब्रोकिंग प्लॅटफॉर्मने 2022-23 (FY23) या आर्थिक वर्षात तिच्या फाऊंडर्सना एकत्रितपणे ₹195.4 कोटी सॅलरी दिली आहे. Entracker.com च्या मते, फाऊंडर्स आणि संचालकांना प्रत्येकी ₹72 कोटी वार्षिक मानधन म्हणून मिळाले. FY23 मध्ये, कंपनीने फाऊंडर्ससह त्यांच्या एम्प्लॉइजना एकूण ₹380 कोटींची सॅलरी देण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, ₹623 कोटींच्या एकूण खर्चापैकी, ₹236 कोटी एम्प्लॉइज स्टॉक ओनरशिप प्लॅन्स (ESOPs) सेटल करण्यासाठी वाटप करण्यात आले.

अलीकडे, फाऊंडर नितीन कामथ यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर 6 नोव्हेंबर आणि 4 डिसेंबर रोजी झालेल्या तांत्रिक समस्यांसाठी माफी मागितली, ज्यामुळे Users ची  गैरसोय झाली. कंपनीने गेल्या दोन महिन्यांत दोन वेळा अशा अडचणींचा सामना केला आहे, ज्याचा 5 ते 20 टक्के कस्टमरवर परिणाम झाला.

Zerodha चे वॅल्यूएशन  $3.6 अब्ज किंवा ₹30,000 कोटी झाले आहे, जे 2021 मध्ये $2 अब्ज मूल्यापेक्षा 80 टक्के वाढले आहे. कंपनीने 2021 मध्ये ₹200 कोटी एम्प्लॉइज स्टॉक ओनरशिप प्लॅन (ESOP) बायबॅक योजना जाहीर केली होती.

या वर्षी Acticve Users च्या बाबतीत Groww ने Zerodha ला मागे टाकल्याने कंपनीला मोठा धक्का बसला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) च्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर 2023 पर्यंत, Zerodha च्या 6.48 दशलक्षांच्या तुलनेत Groww ने 6.63 दशलक्ष Acticve Users आहेत. स्पर्धा असूनही, झिरोधा स्टॉकब्रोकिंग बिझनेसमधील एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे.

थोडक्यात काय तर झेरोधाच्या फाऊंडर्सना आर्थिक वर्ष 23 मध्ये मोठी सॅलरी मिळाली, पण कंपनीला सतत येणाऱ्या तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागला. वॅल्यूएशनमध्ये  लक्षणीय वाढ असूनही, Zerodha ला Groww कडून स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance) 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇

Atal Pension Yojana: – काय आहे आणि तुम्ही घेतली पाहिजे का?

1 thought on “Zerodha Brother’s Salary: – झीरोधा फाऊंडर्सची सॅलरी 200 करोडवर पोचली”

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi