Health Insurance Co-Payment: हेल्थ इन्शुरेंस को पेमेंट म्हणजे काय?

Health Insurance Co-Payment in Marathi: हेल्थ इन्शुरेंस हे एक महत्त्वपूर्ण सुरक्षा कवच आहे. जे मेडिकल एमर्जन्सिच्या वेळी आर्थिक संरक्षण प्रदान करते. आपण हेल्थ इन्शुरेंसच्या गुंतागुंतीच्या जगाला समजून घेताना, तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम कव्हरेज कस मिळेल याची खात्री करताना योग्य निर्णय घेणे खूप गरजेच आहे. बचतीचा एक उपाय म्हणून अनेकदा ओळखल्या जाणाऱ्या पैलूंपैकी एक म्हणजे को-पेमेंट क्लॉज (co-payment clause).

या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण या को-पेमेंट क्लॉजला खऱ्या आयुष्यातील एक उदाहरणाचा वापर करून नीट समजून घेण्याचा प्रयत्न करू. चला तर सुरुवात करूया!

Co-Payment म्हणजे नक्की काय? 

Co-Payment या शब्दावरूनच आपल्याला समजत की जर एखाद मेडिकल बिल भरण्याची वेळ आली तर थोडे पैसे तुम्ही तुमच्या खिशातून देणार आणि बाकीचे पैसे तुमची हेल्थ इन्शुरेंस कंपनी देणार. आता कोणी किती पैसे द्यायचे हे पॉलिसी घेताना ठरवल जात.

अनेक इन्शुरेंस कंपन्या आणि खास करून त्यांचे एजेंट हे Co-Payment हा ऑप्शन घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करतात आणि अनेक जाण थोडे पैसे वाचवण्यासाठी हा ऑप्शन निवडतात. पण हा ऑप्शन घेणे का चुकीच आहे हे आपण एक सिम्पल एक्झॅम्पलने समजून घेऊ.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Best Health Insurance Policy कशी निवडाल? (marathifinance.net)

एक मोहक ऑफर तुम्हाला दिली जाते.

कल्पना करा की तुम्हाला हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी घायची आहे आणि त्यासाठी तुम्ही ऑनलाईन तसेच ऑफलाइन काही चांगले ऑप्शन शोधत आहात. तुमची ओळख एक एजेंटसोबत होते जो तुम्हाला हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी काढण्यासाठी मदत करतो.

त्या एजेंट तुम्हाला 5 लाख एवढ कवर देणारी एक पॉलिसी सांगितली जीच वर्षाला प्रेमींयम होत आहे 7,000 रुपये आणि तुम्हाला ती पॉलिसी चांगली वाटली. तुम्ही ती पॉलिसी घेण्याच ठरवता पण तो एजेंट तुम्हाला एक मस्त ऑफर देतो की जर तुम्ही को – पेमेंट क्लॉज मान्य केल तर तुमच्या पॉलिसीच प्रीमियम 25% म्हणजेच दरवर्षी अंदाजे ₹ 1800 रुपयांनी कमी होईल. तुम्हाला पण ही ऑफर आवडते कारण पैसे वाचलेले कोणाला नाही आवडत. हो की नाही?

पण तो एजेंट तुम्हाला सांगतो या को पेमेंट क्लॉजनुसार कोणतेही मेडिकल बिल येउदेत यातील 20% रक्कम ही तुम्हाला भरावी लागेल आणि बाकीचे 80% हेल्थ इन्शुरेंस कंपनी देणार.

इथेच मिस्टेक होते तुम्हा लोकांची 

वर्षाला १८०० रुपयांची बचत करण्याच्या अपेक्षेने तुम्ही को-पेमेंट क्लॉजचा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला. आता कल्पना करा की नऊ महिन्यांनंतर तुमचा  अपघात होतो, तुम्ही बाइकवरुन पडता ज्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल कराव लागत.

सुदैवाने, काही महिन्यात तुम्ही अगदी पूर्ण पणे बरे होता, पण तुमच मेडिकल बिल 2 लाख रुपये येत. हे एकून तुम्ही पुन्हा आजारी पडणार तेवढ्यात तुम्हाला आढवत की माझ्याकडे हेल्थ इन्शुरेंस आहे. तुम्ही अगदी निवांत होता आणि बिल भरता.

आणि तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलवाले सांगतात की को पेमेंट करारानुसार, तुम्ही इन्शुरेंस कंपनी फक्त ₹ 1,60,000 कव्हर देणार आहे आणि बाकीचे 40,000 रुपये तुम्हाला तुमच्या खिशातून भरावे लागणार आहेत.

Co-Payment क्लॉजची खरी किंमत आता कळते.

आता एक छोटस गणित करूया. सुरुवातीला तुम्ही तुमच्या प्रीमियममध्ये 1,800 रुपयांची बचत केली होती, पण आता को-पेमेंट क्लॉजमुळे तुम्हाला 40,000 रुपयांच्या अनपेक्षित खर्चाला सामोरे जावे लागत आहे. यावरून प्रश्न पडतो की, को-पेमेंटचा ऑप्शन निवडण्याचा निर्णय खरोखरच स्मार्ट होता का? हा मोठा 40,000 चा आर्थिक फटका भरून काढण्यासाठी अंदाजे २२ वर्षांची 20% एवढ्या प्रीमियमची बचत करावी लागेल. (1800 रुपये * 22 वर्ष = 40,000 रुपये)

यातून आपण शिकलेला धडा हाच आहे. 

हेल्थ इन्शुरेंस पॉलिसीमध्ये को पेमेंट क्लॉज खूप मोठी किंमत मोजून घ्याव लागते. सुरुवातीला आपल्याला वाटत की माझ्या प्रेमीयमची चांगली बचत होत आहे पण हॉस्पिटलच मोठ बिल आल्यावर तुमच्या खिशातून मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. शक्यतो सामान्य पॉलिसी होल्डरनी या क्लॉजपासून चार हात लांब रहाव कारण ते घेण्यात काहीच अर्थ नाहीये.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Health Insurance in Marathi: हेल्थ इन्शुरेंस काय आहे? फायदे आणि तोटे जाणून घ्या et)

Health Insurance पॉलिसीमध्ये Co-Payment कधी घ्यावं लागतं?

मेडिकल कंडीशन संबधीत Co Payment

जर तुम्हाला एखादा आजार आधीपासून असेल किंवा एखादी क्रिटिकल इलनेस आधीपासून असेल तर अशावेळी इन्शुरन्स कंपनी Co Payment घ्यायला सांगते याचं कारण असं की या आजारांचा खर्च खूप जास्त असतो. याची पुर्ण रिस्क इन्शुरन्स कंपनी घेत नाही. थोडा खर्च तुम्हाला भरावा लागतो.

हॉस्पिटल नेटवर्क संबधीत Co Payment 

जेव्हा तुम्ही एका अशा हॉस्पिटलमध्ये भरती होता जे हॉस्पिटल इन्शुरन्स कंपनीच्या नेटवर्कमध्ये नाहीये अशावेळी तुम्ही कॅशलेस क्लेम घेऊ शकत नाही. तुम्हाला थोडे पैसे तुमच्या खिशातून भरावे लागतात आणि बाकीचे पैसे इन्शुरन्स कंपनी भरते.

वय संबधीत Co Payment 

तुमचं वय जितकं जास्त असेल तितका आजारपणाचा धोका जास्त असतो आणि जसं वय वाढत जात तसं आजारपणाचा खर्च देखील वाढत जातो हे आपल्या सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. त्यामुळे ही रिस्क कमी करण्यासाठी इन्शुरन्स कंपनी पॉलिसीमध्ये Co Payment Clause घ्यायला सांगते. 

लोकेशन संबधीत Co Payment

तुम्ही कोणत्या लोकेशनवरील हॉस्पिटलमध्ये उपचार करत यावरून मेडिकल आणि हॉस्पिटल बिल किती येईल हे ठरतं. काही मोठ्या शहरांमध्ये मेडिकल आणि हॉस्पिटलचे खर्च हे गावी खेडेगावी असलेल्या हॉस्पिटलपेक्षा खूप जास्त असतात. अशा वेळी इन्शुरन्स कंपनी Co Payment Clause घ्यायला सांगते.

Co Payment घेणे Compulsory आहे का? 

काही Health Insurance पॉलिसी अशा असतात ज्यामध्ये Co Payment हे Compulsory असत. तुम्ही कोणती पॉलिसी घेत आहात यावर सगळ अवलंबुन आहे की त्यामध्ये Co Payment Clause आहे की नाही. सहसा Co Payment चा खर्चाचं Percentage 5-20% मध्ये असत. हे देखील तुम्ही जी इन्शुरन्स कंपनी निवडता यावर अवलंबुन आहे. 

Co-Payment घेणे कधी सोयीच ठरत? 

1) जिथे को पेमेंट अनिवार्य आहे 

काही हेल्थ इन्शुरेंस पॉलिसींमध्ये को पेमेंट क्लॉज हे अनिवार्य असतात ज्याना आपण टाळू नाही शकत. अशा वेळी पॉलिसीधारकांना अटी मान्य करण्याशिवाय पर्याय नसतो. पण हे अनिवार्य असलेले को पेमेंट सहसा परवडणारे असतात आणि जास्त आर्थिक बोजा निर्माण करत नाहीत.

2) वृद्ध किंवा आधीपासून अस्तित्वात असलेले आजार 

को पेमेंट क्लॉज अशा व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकते ज्यांचे वय खूप जास्त आहे किंवा आधीपासून काही आजार त्यांना आहेत. अशा परिस्थितीमध्ये इन्शुरेंस  कंपन्या त्यांची रिस्ककमी करण्यासाठी को पेमेंट क्लॉजचा वापर करू शकतात. पण याने पॉलिसीची एकूण किंमत फारशी वाढत नाही.

3) हेल्थ इन्शुरेंस प्रीमियम कमी हवंय

जर तुम्ही वरील निकषांमध्ये बसणाऱ्या एखाद्या व्यक्तीसाठी हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी घेत असाल, जसे की कुटुंबातील वृद्ध सदस्य, अशा वेळी को पेमेंट क्लॉज पॉलिसीच्या  प्रीमियमचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी करू शकते. अशा परिस्थितीत, जर एखाद मेडिकल बिल आल तर स्वताच्या खिशातील पैसे देण्याची वेळ येईल यासाठी तयार रहा.

या पोस्टमधून आपण काय शिकलो?

को-पेमेंट क्लॉजद्वारे कमी प्रीमियमचे आकर्षण मोहक तुम्हाला दिल जाईल पण दीर्घकालीन आर्थिक परिणामांचा विचार करणे आवश्यक आहे. दिलेले उदाहरण असे दर्शविते की जेव्हा मेडिकल खर्च येतो तेव्हा प्रीमियमवरील केलेली छोटीशी बचत स्वताच्या खिशातून द्यावा लागणाऱ्या खर्चापेक्षा कमीच असते.

एक नियम जर पहिल तर को पेमेंट क्लॉज सामान्य पॉलिसीधारकासाठी कधीच कामच नसते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या हेल्थ इन्शुरेंस पॉलिसीच्या अटी आणि शर्ती पूर्णपणे समजून घेणे महत्वाचे आहे. तसेच हेल्थ इन्शुरेंस पॉलिसीमधून मिळणारे कव्हरेज तुमच्या गरजा आणि आर्थिक उद्दीष्टांशी सुसंगत आहे की नाही याचा जाणीवपूर्वक विचार तुम्ही केला पाहिजे.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)