HDFC ERGO Optima Secure Health Insurance Policy: जाणून घ्या संपूर्ण माहिती

HDFC ERGO Optima Secure ही एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे जी HDFC ERGO General Insurance Company Limited या कंपनीकडून ऑफर केली जाते. काय आहेत या पॉलिसीचे फीचर्स आणि बेनिफिट्स हे आपण आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया:

जॉइन टेलीग्राम चॅनल   @marathifinance

HDFC ERGO Insurance Company Limited बद्दल माहिती

HDFC ERGO General Insurance Company Limited चं ऑफिस मुंबईमध्ये स्थित आहे. HDFC ERGO या कंपनीची सुरुवात 2002 मध्ये, भारतातील HDFC Ltd आणि बाहेरील देशातील कंपनी ERGO International AG यांच्या पार्टनरशिपमध्ये झाली आहे. HDFC ERGO कंपनी मार्केटमध्ये विविध प्रकारचे जनरल इन्शुरन्स प्रोडक्ट उपलब्ध करून देते जसे की हेल्थ इन्शुरन्स, मोटर इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, होम इन्शुरन्स इत्यादी.

HDFC ERGO Optima Secure हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे खास फीचर्स

1. Co-Payment चा ताण नाही:

या पॉलिसीमध्ये को-पेमेंटची कोणतीही अट नाहीये. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या खिशातून एकही पैसा आजारपणासाठी खर्च करावा लागणार नाही. को-पेमेंट म्हणजे जिथे थोडे पैसे कंपनी देते आणि थोडे पैसे तुम्हाला तुमच्या खिशातून द्यावे लागतात, पण या पॉलिसीमध्ये असा काही प्रकार नाही.

2. रूमवर कोणतेही बंधन नाही:

हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार हवं ते रूम निवडू शकता. मग ते Shared Room असो की सिंगल रूम, AC रूम असो Deluxe रूम. या पॉलिसीमध्ये रूम घेण्यावर कोणतेही बंधन नाही.

3. कोणताही आजार असो, फुल कव्हर:

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेताना, इन्शुरन्स कंपन्या आधीच सांगतात की त्या कोणत्या आजारांना पैसे देऊ शकत नाहीत किंवा दिले तर अर्धे पैसे देतील, पण या पॉलिसीमध्ये कोणताही आजार असो, तुम्हाला पूर्णपणे कव्हर दिला जाईल. विविध आजारांनुसार कोणतीही सब लिमिट नाही.

4. Pre-Hospitalization आणि post-hospitalization कव्हर:

Pre-Hospitalization म्हणजे हॉस्पिटलमध्ये भरती होण्याआधी झालेला खर्च, जो या पॉलिसीमध्ये 60 दिवसांपर्यंत कव्हर केला जातो. Post-Hospitalization म्हणजे हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर होणारा खर्च, जो जास्तीत जास्त 180 दिवसांसाठी कव्हर केला जातो.

5. Restoration बेनिफिट:

रेस्टोरेशन बेनिफिट म्हणजे तुम्ही एकदा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्यानंतर पाच लाखाचे बिल झालं आणि तुमची पॉलिसी ही पाच लाखाची होती. आता समजा पुन्हा जर तुम्ही आजारी पडलात तर पाच लाखाचा कव्हर पुन्हा मिळतो. यालाच रेस्टोरेशन बेनिफिट म्हटलं जातं.

6. Day Care Treatment कव्हर:

डे केअर ट्रीटमेंट म्हणजे तुम्ही छोट्या मोठ्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला आणि 24 तासाच्या आत डिस्चार्ज मिळाला, अशा वेळी जो खर्च होतो तो सुद्धा या पॉलिसीमध्ये कव्हर केला जातो.

7. No Claim बोनस:

नो क्लेम बोनस म्हणजे तुम्ही यावर्षी पाच लाखाची पॉलिसी घेतली पण काही क्लेम केला नाही, तर पुढच्या वर्षी तुम्हाला पॉलिसी कव्हर 50% ने वाढवून 7.5 लाख केला जाईल.

8. फ्री हेल्थ चेक अपची सुविधा:

दरवर्षी हॉस्पिटलमध्ये जाऊन फुल बॉडी चेक अप केल्यास, त्यासाठी लागणारा खर्चही या पॉलिसीमध्ये कव्हर केला जातो.

9. वेटिंग पिरियड (Pre-Existing Diseases):

Pre-Existing Diseases म्हणजे पॉलिसी घेण्याआधी असलेले आजार. समजा तुम्हाला पॉलिसी घेताना एखादा आजार असेल, जसं की डायबेटीस, तर त्याचा खर्च हा तीन वर्षांनंतर कव्हर केला जाईल. म्हणजे या पॉलिसीमध्ये आधीपासून असलेल्या आजारांसाठी तीन वर्षाचा वेटिंग पिरेड आहे.

ही पोस्ट वाचा  हेल्थ इन्शुरेंस को पेमेंट म्हणजे काय?

HDFC ERGO Optima Secure हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीसाठी क्लेम कस करायच ?

  • मेडिकल एमर्जन्सिच्या वेळी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर 24 तासांच्या आत तुम्हाला इन्शुरेंस कंपनीला कळवायच आहे. शक्य नसल्यास, तुम्ही हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर 48 तासांच्या आत इन्शुरेंस कंपनीला कळविणे आवश्यक आहे. पॉलिसी नंबर, हॉस्पिटलचे नाव, हॉस्पिटलायझेशनच्या तारखेसह  healthclaims@hdfcergo.com / care@hdfcergo.com वर फक्त ईमेल करा.
  • नियोजित उपचारांच्या बाबतीत, हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या 7 दिवस आधी तुम्हाला हेल्थ इन्शुरेंस कंपनीला कळवाव लागेल. पण जर तुम्ही कळवू शकत असल्यास, कारण कदाचित तुमच्या विनंतीच्या सत्यतेची तपासणी करण्यासाठी इन्शुरेंस कंपन्या थोडा वेळ घेऊ शकतात.
  • जर तुम्ही अशा हॉस्पिटलमध्ये Admit झालात जयासोबत HDFC ERGO पार्टनर म्हणून काम करते तर तुम्ही काही पैसे न देता Cashless Claim साठी अप्लाय करू शकता. नेटवर्क हॉस्पिटल संबंधित प्रश्नांसाठी nsp@hdfcergo.com वर ईमेल करा.
  • जर तुम्हाला नेटवर्क हॉस्पिटल सापडले नाही किंवा कॅशलेस क्लेमची सुविधा उपलब्ध नसल्यास, तुम्हाला डिस्चार्ज नंतरचा दावा फॉर्म भरावा लागेल आणि 30 दिवसांच्या आत आवश्यक असलेल्या इतर सर्व हॉस्पिटल रेकॉर्डसह हेल्थ इन्शुरेंस कंपनीकडे पाठवावे लागेल. जस की हॉस्पिटलची bills, मेडिकल bills तेही सगळे original.

HDFC ERGO Optima Secure इन्शुरेंस पॉलिसी क्लेम करताना लागणारे डॉक्युमेंट्स:

  • क्लेम साठी लागणारा फॉर्म
  • Valid फोटो-आयडी
  • वैद्यकीय प्रॅक्टिशनरचे रेफरल लेटर हॉस्पिटलमध्ये दाखल करणारे.
  • वैद्यकीय व्यावसायिकाची प्रिस्क्रिप्शन औषधे/निदान चाचण्या/सल्लामसलत सल्ला देते.
  • आरिजिनल बिले, पावती आणि रुग्णालय/वैद्यकीय व्यावसायिकांकडून डिस्चार्ज कार्ड.
  • फार्मसी/केमिस्टची मूळ बिले.
  • मूळ पॅथॉलॉजिकल/डायग्नोस्टिक चाचण्या अहवाल/रेडिओलॉजी अहवाल आणि देयक पावती.
  • इतर पेपर्स गरज असल्यास
ही पोस्ट वाचा  हेल्थ इन्शुरेंस काय आहे? त्याचे प्रकार जाणून घ्या

HDFC ERGO General Insurance कंपनीची क्लेम प्रोसेस

👉 क्लेमचा स्पीड:

एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने 30 दिवसांपेक्षा कमी कालावधीत 94.61% क्लेम दिले आहेत. हे सूचित करते की क्लेमची रक्कम प्राप्त करण्यात बराच वेळ वाट बघावी लागणार नाही.

👉 क्लेम संबंधित तक्रारी:

एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला इतर विमा कंपन्यांपेक्षा क्लेम विषयी कमी तक्रारी मिळाल्या आहेत.

👉क्लेम सेटलमेंट रेशो:

एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे ​​क्लेम सेटलमेंट रेशो 94.32%आहे. याचा अर्थ असा की जितके लोक क्लेम करतात त्यामधील 94.32% एवढ्या लोकांना कंपनी पैसे देते.

👉 नेटवर्क हॉस्पिटलः

एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडकडे 13,000+ हॉस्पिटल नेटवर्क आहे. हॉस्पिटलचे नेटवर्क मोठे असल्यास टेन्शन न घेता सोयीस्करपणे कॅशलेस ट्रीटमेंट मिळते.

Frequently Asked Questions

1. HDFC ERGO Optima Secure हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये को पेमेंट आहे का?

उत्तर: नाही, HDFC ERGO Optima Secure पॉलिसीमध्ये को पेमेंटची अट नाही. याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या खिशातून कोणताही खर्च करावा लागणार नाही.

2. रूम निवडण्यावर कोणतेही बंधन आहे का?

उत्तर: नाही, हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतेही रूम निवडू शकता. रूम निवडण्यावर कोणतेही बंधन नाहीये.

3. पॉलिसीमध्ये कोणताही आजार कव्हर केला जातो का?

उत्तर: होय, या पॉलिसीमध्ये कोणताही आजार कव्हर केला जातो. कोणत्याही आजारासाठी सब लिमिट लावली गेली नाही.

4. Pre-Hospitalization आणि post-hospitalization खर्च कव्हर होतो का?

उत्तर: होय, हॉस्पिटलमध्ये भरती होण्याआधी 60 दिवसांचा खर्च आणि हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यानंतर 180 दिवसांचा खर्च कव्हर केला जातो.

5. Restoration बेनिफिट म्हणजे काय?

उत्तर: Restoration बेनिफिट म्हणजे पॉलिसीची कव्हर रक्कम वापरून झाल्यानंतर ती पुन्हा पूर्ण केली जाते. यामुळे तुम्हाला पुन्हा कव्हर मिळतो.

6. Day Care Treatment कव्हर केला जातो का?

उत्तर: होय, 24 तासांच्या आत डिस्चार्ज मिळाल्यास झालेला खर्च या पॉलिसीमध्ये कव्हर केला जातो.

7. No Claim बोनस कसा मिळतो?

उत्तर: No Claim बोनस म्हणजे, जर तुम्ही एका वर्षात क्लेम केला नाही, तर पुढच्या वर्षी तुमच्या पॉलिसीचा कव्हर 50% ने वाढवला जातो.

8. फ्री हेल्थ चेक अपची सुविधा उपलब्ध आहे का?

उत्तर: होय, दरवर्षी हॉस्पिटलमध्ये फुल बॉडी चेक अप करण्याचा खर्च कव्हर केला जातो.

9. Pre-Existing Diseases साठी वेटिंग पिरियड किती आहे?

उत्तर: Pre-Existing Diseases साठी तीन वर्षांचा वेटिंग पिरियड आहे.

10. क्लेम कसा करावा?

उत्तर: मेडिकल एमर्जन्सीमध्ये 24 तासांच्या आत किंवा हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर 48 तासांच्या आत इन्शुरेंस कंपनीला कळवावे. नियोजित उपचारांमध्ये हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या 7 दिवस आधी कळवावे.

11. क्लेम करताना लागणारे डॉक्युमेंट्स कोणते आहेत?

उत्तर:

  • क्लेम फॉर्म
  • Valid फोटो-आयडी
  • वैद्यकीय प्रॅक्टिशनरचे रेफरल लेटर
  • वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन
  • ओरिजिनल बिले आणि पावत्या
  • पॅथॉलॉजिकल/डायग्नोस्टिक चाचण्या अहवाल आणि देयक पावत्या

12. HDFC ERGO क्लेम प्रोसेस कशी आहे?

उत्तर:

  • क्लेमचा स्पीड: 30 दिवसांपेक्षा कमी कालावधीत 94.61% क्लेम दिले आहेत.
  • क्लेम संबंधित तक्रारी: कमी तक्रारी आहेत.
  • क्लेम सेटलमेंट रेशो: 94.32%
  • नेटवर्क हॉस्पिटल: 13,000+ हॉस्पिटल नेटवर्क

13. HDFC ERGO Optima Secure हेल्थ इन्शुरेंस पॉलिसीमध्ये Maternity बेनिफिट मिळतात का?

उत्तर: HDFC ERGO Optima Secure हेल्थ इन्शुरेंस पॉलिसीमध्ये Maternity बेनिफिट मिळतात नाही.

Leave a Comment