Health Insurance घ्यायच प्लान करताय? हे 5 बदल जाणून घ्या

5/5 - (1 vote)

IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) ने हेल्थ इन्शुरन्स सेक्टरमध्ये 5 मोठे बदल केले आहेत जे एका सामान्य कस्टमरसाठी खूप महत्वाचे आहेत. ते बदल नक्की काय आहेत हेच आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरवात करूया:

जॉइन टेलीग्राम चॅनल   @marathifinance

1) Health Insurance मिळणे हा सगळ्यांचा अधिकार

IRDAI ने मोठ मोठ्या Health Insurance कंपन्यांना असे आदेश दिले आहेत की तुम्ही प्रत्येक वयोगटासाठी, उत्पन्नासाठी, आजार इ. गोष्टी बघून सर्वांना Health Insurance Policy घेता येईल या हिशोबाने स्वस्त बनवा.

2) Cashless Claim मिळणार 3 तासात

Cashless Claim म्हणजे काय तर तुम्हाला तुमच्या खिशातून हॉस्पिटलचं बिल भरायची गरज नाही लागत. आता हे Cashless Claim देताना 3 तासांच्या आत देण्यात यावे. आधी Health Insurance कंपन्या खूप नाटकी करायच्या. हे नाहीये, ते नाहीये. पण आता असं करता येणार नाही.

जेव्हा हॉस्पिटलमधून क्लेमची Request जाईल, ती 3 तासात Health Insurance कंपनीने मान्य करावी आणि हॉस्पिटलला पैसे देऊन टाकावेत. याचा फायदा नक्कीच एका सामान्य कस्टमरला होणार आहे त्याला स्वताच्या खिशातून पैसे भरावे लागणार नाहीत.

3) Grace Period मध्ये सुद्धा मिळणार कवर

समजा तुम्ही Health Insurance पॉलिसीचं प्रीमियम महिन्याला भरता, तर तुम्हाला 15 दिवस Grace Period म्हणून मिळणार. आणि जर तुम्ही पॉलिसी प्रीमियम दर 3 महिन्यांनी, 6 महिन्यांनी किंवा वर्षाला भरता, तर तुम्हाला 30 दिवस Grace Period म्हणून मिळणार.

आता हे Grace Period नक्की काय आहे? Grace Period म्हणजे एक्स्ट्रा टाइम. Health Insurance पॉलिसी Renew करताना समजा तुमचं राहून गेलं आणि उशीर झाला, पण जोपर्यंत Grace Period चालू आहे, तुम्हाला पॉलिसी कवर मिळणार. आधी Health Insurance जर प्रीमियम भरायचं राहिलं असेल तर Grace Period मध्ये पॉलिसी कवर देत नवते.

ही पोस्ट वाचा  हेल्थ इन्शुरेंस काय आहे? त्याचे प्रकार जाणून घ्या

4) Free Look Period वाढवला 15 दिवसांनी (हे खूप गरजेचं आहे)

सगळयात आधी हे Free Look Period काय आहे? Health Insurance पॉलिसी घेतल्यानंतर (म्हणजे ज्या दिवशी तुमच्या हातात पॉलिसीचे डॉक्युमेंट्स येतील) समजा तुम्हाला ती कॅन्सल करायची आहे, तर तुम्ही ते Free Look Period मध्ये करू शकता. आधी Free Look Period हा फक्त 15 दिवस होता, पण तो आता 30 दिवस करण्यात आला आहे.

5) पॉलिसी कॅन्सल करणे झालंय सोपं

IRDAI च्या नव्या नियमानुसार कस्टमर 7 दिवसांची लेखी नोटिस देऊन तुमची Health Insurance पॉलिसी कॅन्सल करू शकता. तुमची Health Insurance कंपनी तुम्हाला तुमचे प्रीमियमचे पैसे रिफंड करेल. त्यावर थोडेफार चार्जस लावले जातील पण हे Charges आता पहिल्यापेक्षा खूप कमी केले आहेत.

या बदलांमुळे सामान्य कस्टमरसाठी Health Insurance अधिक सुलभ आणि किफायतशीर होणार आहे. IRDAI च्या या सुधारणा कस्टमर्सचे हक्क आणि सोयी यांचा विचार करून केल्या आहेत, ज्यामुळे आरोग्य विमा घेणे आणि वापरणे अधिक सोपे आणि विश्वासार्ह होईल. या सुधारणा कस्टमरसाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.

ही पोस्ट वाचा  हेल्थ इन्शुरेंस को पेमेंट म्हणजे काय?

Frequently Asked Questions

Health Insurance मिळणे हा सगळ्यांचा अधिकार म्हणजे काय?

IRDAI ने Health Insurance कंपन्यांना आदेश दिले आहेत की सर्व वयोगट, उत्पन्न आणि आरोग्य स्थिती लक्षात घेऊन सर्वांना परवडेल अशी Health Insurance Policy बनवावी.

Cashless Claim म्हणजे काय?

Cashless Claim म्हणजे हॉस्पिटलचे बिल तुम्हाला तुमच्या खिशातून भरायची गरज नाही. बिलाची रक्कम थेट Health Insurance कंपनी भरते.

Cashless Claim मिळण्यासाठी किती वेळ लागणार आहे?

नवीन नियमानुसार, हॉस्पिटलमधून क्लेमची Request गेल्यानंतर 3 तासांच्या आत Health Insurance कंपनीने तो क्लेम मान्य करावा आणि हॉस्पिटलला पैसे देऊन टाकावे.

Grace Period म्हणजे काय?

Grace Period म्हणजे प्रीमियम भरण्यासाठी अतिरिक्त वेळ. यामध्ये पॉलिसी Renew करताना उशीर झाल्यासही तुम्हाला कवर मिळतो.

Grace Period किती आहे?

महिन्याला प्रीमियम भरल्यास 15 दिवस आणि 3, 6 किंवा 12 महिन्यांनी प्रीमियम भरल्यास 30 दिवस Grace Period मिळतो.

Free Look Period म्हणजे काय?

Health Insurance पॉलिसी घेतल्यानंतर, जर तुम्हाला ती पॉलिसी कॅन्सल करायची असेल तर तुम्ही ते Free Look Period मध्ये करू शकता. यामध्ये पॉलिसीचे डॉक्युमेंट्स मिळाल्यानंतर 30 दिवसांच्या आत पॉलिसी कॅन्सल करता येते.

Free Look Period किती आहे?

Free Look Period आता 30 दिवसांचा करण्यात आला आहे, जो आधी फक्त 15 दिवसांचा होता.

पॉलिसी कॅन्सल करणे कसे सोपे झाले आहे?

IRDAI च्या नव्या नियमानुसार, कस्टमर 7 दिवसांची लेखी नोटिस देऊन Health Insurance पॉलिसी कॅन्सल करू शकतात आणि प्रीमियमचे पैसे परत मिळवू शकतात, त्यावर थोडेफार कमी केलेले चार्जेस लावले जातील.

या बदलांमुळे कस्टमर्सना काय फायदा होईल?

या बदलांमुळे Health Insurance अधिक सुलभ, किफायतशीर आणि विश्वासार्ह होईल. कस्टमर्सचे हक्क आणि सोयी लक्षात घेऊन केलेल्या या सुधारणा कस्टमरसाठी नक्कीच फायदेशीर ठरतील.

IRDAI ने हे बदल का केले आहेत?

कस्टमर्सचे हक्क, सोयी, आणि Health Insurance घेण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक बनवण्यासाठी हे बदल केले आहेत.

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi