Zerodha सह-संस्थापक नितीन कामथ यांनी X पोस्टमध्ये 30 मे रोजी सांगितले की, ब्रोकरेज फर्म Zerodha ने त्यांच्या ॲपवर झटपट पैसे काढण्याचे फीचर लॉंच केले आहे. जे वापरकर्त्यांना दररोज ₹1,00,000 पर्यंत लगेच पैसे काढण्याची परवानगी देईल.
नितीन कामथ यांनी वापरकर्त्यांना पुढे सांगितले की, पैसे काढण्याची विंडो संपूर्ण आठवडाभर सकाळी 9:00 ते दुपारी 4:00 पर्यंत उघडेल. लगेच पैसे काढण्याच्या फीचरसह, वापरकर्ते त्यांच्या Zerodha अकाऊंटमधून त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये त्वरित पैसे ट्रान्सफर करू शकतात.
जॉइन टेलीग्राम चॅनल @marathifinance
Zerodha Kite App वरून पैसे काढताना पुढील गोष्टी ध्यानात ठेवा
झटपट पैसे काढण्याच्या Requests आठवड्याच्या शेवटी, सकाळी 9:00 ते संध्याकाळी 4:00 दरम्यान दररोज एकदा सबमिट केल्या जाऊ शकतात. सध्या चालू असलेल्या पैसे काढण्याच्या Requests ना कोणतेही बंधन नसते. याचा अर्थ तुम्ही कधी पैसे काढण्याची Request टाकू शकता, पण Instant Withdrawal करताना एक ठराविक टाइमिंग दिल आहे.
पैसे काढण्याच्या Request कमीत कमी ₹100 रुपयाची असणे आवश्यक आहे आणि दररोज जास्तीत जास्त ₹1,00,000 पर्यन्त तुम्ही पैसे काढू शकता. Zerodha Instant Withdrawal ची सुविधा वापरुन पैसे काढताना त्याच वेळी Zerodha App मध्ये कोणते इतर व्यवहार चालू नसले पाहिजेत. जस की आजच नवीन शेअर घेतले, आज काही शेअर विकले.
समजा तुम्ही एखाद्या दिवशी आजच पैसे Zerodha App मध्ये भरले. पण ते पैसे तुम्ही लगेच काढू शकत नाही. आदल्या दिवशी होल्डिंग्सच्या विक्रीतून आलेले पैसे सेटलमेंट दिवस, ट्रेडिंग सुट्ट्या आणि आठवड्याच्या शेवटी काढता येणाऱ्या शिल्लक पैशामद्धे मोजल जाणार नाही. थोडक्यात काय तर तुम्ही काल काही शेअर विकले तर आज लगेच पैसे नाही काढता येणार.
जर तुम्ही पेटीएम पेमेंट्स बँकेमध्ये अकाऊंट असेल तर तुम्ही Zerodha Zerodha Instant Withdrawal हा फीचर नाही वापरू शकत.
ही पोस्ट वाचा तुमच्या वीकेंडचा वापर आर्थिक स्वातंत्र्यासाठी कसा कराल?
Zerodha Kite App वरून पैसे कसे काढावे? | How to place an instant withdrawal on Zerodha?
- तुमच्या User ID वर क्लीक करा
- त्यानंतर Funds वर क्लीक करा
- त्यानंत Withdraw या ऑप्शनवर क्लिक करा
- हवी ती रक्कम टाका (100 ते 1,00,000 मध्ये)
- कंटिन्यू करा आणि कन्फर्म करा (बस झाल काम)
Frequently Asked Questions
Zerodha च्या झटपट पैसे काढण्याच्या फीचरविषयी काय विशेष आहे?
Zerodha ने झटपट पैसे काढण्याचे फीचर लॉंच केले आहे, ज्यामुळे वापरकर्ते दररोज ₹1,00,000 पर्यंत लगेच पैसे काढू शकतात. ही सुविधा सकाळी 9:00 ते दुपारी 4:00 दरम्यान, आठवड्याच्या सर्व दिवसांत उपलब्ध आहे.
Zerodha मधून पैसे काढण्याची विंडो कधी खुली असेल?
पैसे काढण्याची विंडो आठवड्याच्या सर्व दिवसांत सकाळी 9:00 ते दुपारी 4:00 दरम्यान खुली असेल.
Zerodha मधून पैसे काढण्यासाठी किमान आणि कमाल रक्कम किती आहे?
पैसे काढण्यासाठी किमान रक्कम ₹100 आहे आणि दररोज जास्तीत जास्त ₹1,00,000 पर्यंत पैसे काढता येतात.
Zerodha App वरून Instant Withdrawal करताना कोणते नियम लक्षात घ्यावे लागतील?
Instant Withdrawal करताना Zerodha App मध्ये कोणतेही इतर व्यवहार चालू नसले पाहिजेत. आजच नवीन शेअर घेतले किंवा विकले असल्यास झटपट पैसे काढता येणार नाहीत.
Zerodha Kite App वरून झटपट पैसे काढण्यासाठी काय प्रक्रिया आहे?
- तुमच्या User ID वर क्लिक करा.
- त्यानंतर Funds वर क्लिक करा.
- Withdraw या ऑप्शनवर क्लिक करा.
- हवी ती रक्कम टाका (₹100 ते ₹1,00,000 मध्ये).
- कंटिन्यू करा आणि कन्फर्म करा.