डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy in Marathi

Rate this post

HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy in Marathi: एचडीएफसी एर्गो ऑप्टिमा सिक्योर ही एक हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी आहे जी एचडीएफसी एर्गो जनरल इंश्योरेंस कंपनी लिमिटेड (HDFC ERGO General Insurance Company Limited) कडून ऑफर केली जाते.

हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी म्हणजे अशी पॉलिसी जी तुमच्या आजारपणाचे सगळे खर्च कवर करते. तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे द्यायची गरज लागत नाही. (यावर डीटेल माहितीसाठी ही पोस्ट वाचा 👉 Best Health Insurance Policy कशी निवडाल?)

एचडीएफसी एर्गो ऑप्टिमा सिक्योर ही एक अशी पॉलिसी आहे जी जवजवळ सगळे बेनिफिट आणि चांगले Features उपलब्ध करून देते.  आजच्या पोस्टमध्ये आपण या पॉलिसीबद्दल डीटेल माहिती मसजून घेणार आहोत जेणेकरून तूनच्यासाठी ही पॉलिसी चांगली आहे की नाही, घेतली पाहिजे की नाही हे तुम्ही ठरवू शकता.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

HDFC Ergo Optima Secure Pros (फायदे)

2x Cover: समजा तुम्ही 5 लाखची पॉलिसी घेत आहात तर पहिल्या दिवसापासून तुमच्या पॉलिसीचा कवर डबल होते म्हणजे 5 लाख + 5 लाख = 10 लाख

No Room Limit: तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती झालात तर तुम्हाला हवी ती रूम निवडू शकता. त्यावर काही लिमिट नाहीये.

No Co Payment: हॉस्पिटलच बिल कितीही येऊदेत तुम्हाला काही भराव लागणार नाही. (तुमच्या पॉलिसी कवर पर्यन्त) पण तुमची पॉलिसी 5 लाख + 5 लाख = 10 लाखची आहे आणि बिल 11 लाख आल तर मात्र वरचे 1 लाख तुम्हाला भरावे लागतील. (अधिक माहितीसाठी 👉 हेल्थ इन्शुरेंस Co-Payment म्हणजे काय?)

Pre-hospitalization Expenses: एखाद्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापूर्वी 60 दिवसांचे खर्च या पॉलिसीमध्ये कवर केले जातात.

Post hospitalization Expenses: समजा तुम्हाला हॉस्पिटलमधून Discharge मिळाला आणि घरी आराम करायला सांगितला तर त्यासाठी लागणारे 180 दिवसानंतरचे खर्च कवर केले जातात.

Restoration Benefit: समजा तुम्ही हॉस्पिटलमध्ये भरती झालात आणि बिल आल 4 लाख रुपये पण तुमची पॉलिसी फक्त 5 लाखची आहे. आणि जर पुन्हा काही महिन्यांनी आजारी पडलात आणि मोठ बिल आल तर कस भरणार? टेंशन घेऊ नका. एकदा का पॉलिसी कवर संपला तरी तो पुन्हा Restore केला जातो. (5 लाख संपले तरी पुन्हा 5 लाखच कवर मिळत यालाच Restoration Benefit बोलतात)

No Claim Bonus: समजा तुम्ही पॉलिसी घेतली आणि या वर्षी आजारी पडला नाहीत तर पॉलिसीसाठी भरलेले प्रीमियम तर वाया गेल अस तुम्हाला वाटत असेल तर तस नाही. ज्या वर्षी तुम्ही क्लेम करणार नाही त्या वर्षाची क्लेमची रक्कम बोनस स्वरूपात पुढच्या वर्षीच्या कवरमध्ये जमा केली जाते. नो क्लेम बोनसची रक्कम 50% ने वाढवली जाते मग तुम्ही क्लेम करा की नका करू.

Day Care treatments: समजा तुम्ही फक्त 24 तासांसाठी हॉस्पिटलमध्ये भरती झालात तर त्याचे खर्च पण या पॉलिसीमध्ये कवर केले जातात.  

HDFC Ergo Optima Secure Cons (तोटे)

Waiting period for pre-existing diseases: जर तुम्हाला काही आजार आधीपासून आहेत तर जस की diabetes वेगेरे तर त्याचा कवर या पॉलिसीमध्ये 3 वर्षानंतर दिला जातो. पॉलिसी घेताना कोण कोणते pre-existing diseases दिले आहेत ते चेक करा.

 Maternity Benefits: जर तुम्ही ही पॉलिसी Maternity Benefit साठी घेत असाल तर तो बेनिफिट या पॉलिसीमध्ये मिळत नाही.

Policy Cost: HDFC ब्रॅंडची पॉलिसी आहे त्यामुळे इतर कंपन्याच्या तुलनेत जरा महाग आहे.

HDFC Ergo Optima Secure Cons Add-ons (एक्स्ट्रा बेनिफिट) 

Add-on म्हणजे एक्स्ट्रा बेनिफिट जे तुम्ही तुमच्या हिशोबाने पॉलिसी घेताना Add करू शकता. काही महत्वाचे Add ons जे तुम्ही या पॉलिसीमध्ये Add करू शकता पुढीलप्रमाणे आहेत.

Hospital Daily Cash: हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळायच्या आधी काही छोटे मोठे खर्च होत असतात त्यासाठी हेल्थ इन्शुरेंस कंपनी तुम्हाला काही रक्कम देते. पण यासाठी तुम्हाला काही डॉक्युमेंट्स आणि बिल सबमिट करावे लागतात. (तुम्ही हे Add on नाही घेतल तरी चालेल कारण एवढा फारसा फायदा याचा होत नाही पण पॉलिसी प्रीमियम उगाच वाढत)

Critical Illness:  काही मोठे आजार क्रिटिकल इलनेस म्हणून ओळखले जातात त्यांच्यासाठी लागणारा खर्च तुम्ही या Add on माध्यमातून कवर करू शकता. काही क्रिटिकल इलनेसची नावे पुढीलप्रमाणे

  • Cancer (except for initial stages, HIV-related, and skin cancer)
  • Heart attack
  • Stroke
  • Kidney failure
  • Multiple sclerosis
  • Benign tumour of the brain or spinal cord
  • Coma
  • Dementia including Alzheimer’s disease.

Aggregate Deductible: इन्शुरेंस कंपनीकडून क्लेमचे पैसे येण्यापूर्वी तुमच्या खिशातून काही पैसे भरावे लागतात. जर तुम्ही हे Deductible जास्त ठेवलेत तर प्रीमियम कमी भराव लागत पण (माझ्या मते इथे पैसे वाचवण्यात काही अर्थ नाही) हे Add on नाही घेतल तरी चालेल.

Individual Personal Accident: जर accident मध्ये काही दुखापत झाली तर तुम्हाला या Add on चा फायदा होतो.

एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जेवढे Add ons तुमच्या पॉलिसीमध्ये Add करणार तेवढा पॉलिसी प्रीमियम वाढणार. त्यामुळे जे गरजेचे  आहेत तेच Add Ons पॉलिसीमध्ये Add करा.

या पॉलिसीसाठी किती प्रीमियम भराव लागेल? 

आता हे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळ असू शकते. त्यामुळे तुम्ही कुठे राहता (शहरात की गावी), तुम्हाला आधीपासून कोणता आजार आहे की नाही, तुम्ही दारू, तंबाखू किंवा सिगरेट ओढता की नाही तसेच तुमच्या मेडिकल चेकअपवरुन ठरवल जात.

ही हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी कुठून घेता येईल? 

ही पॉलिसी तुम्ही जवळच्या HDFC बँकच्या ब्रांचमध्ये जावून घेऊ शकता. किंवा तुम्ही जिथे राहता तिथे एखादा एजेंट असेल तर त्याच्या मदतीने घेऊ शकता. आजकाल सगळ ऑनलाइन झाल आहे त्यामुएल HDFC Ergo App किंवा वेबसाइटवर जावून तुम्ही ही पॉलिसी घेऊ शकता.

फक्त पॉलिसी घेताना सगळ नीट वाचा आणि तुम्हाला जे बेनिफिट हवेत तेवढेच त्या पॉलिसीमध्ये Add करा. (कारण इन्शुरेंस घेताना खूप चुकीची सेलिंग केली जाते त्यामुमुळे जरा सावध रहा)

तुमच्या मित्रांसोबत ही पोस्ट शेअर करा ज्याना हेल्थ इन्शुरेंस पॉलिसी घ्यायची आहे. या ब्लॉगवर आम्ही तुम्हाला योग्य माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत तुम्ही पण पोस्ट शेअर करून सपोर्ट करत रहा.

Thank You!

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 हेल्थ इन्शुरेंस काय आहे? फायदे आणि तोटे जाणून घ्या (Health Insurance in Marathi) (marathifinance.net)

2 thoughts on “डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy in Marathi”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi