Financial Freedom in Marathi: काल मी X (ट्वीटर) वर टाइमपास करता करता एक सुंदर Quote वाचला त्याने मला फोन खाली ठेवून विचार करायला भाग पाडल. हा Quote खालीलप्रमाणे
Financial freedom is the process of turning time into money, money into time, and time into whatever you want.
तुम्ही जर नीट वाचलत तर या Quote मागे खूप मोठा विचार दडला आहे आणि आपण त्यावर चर्चा करणार आहोत. पण त्या आधी
तुमच्यासाठी Financial Freedom काय आहे?
Financial Freedom ची साधी आणि सोपी व्याख्या अशी की तुमच्याकडे इतका पैसा आहे की तुम्हाला जॉब करायची गरज नाही. तुम्ही इन्वेस्ट किंवा सेव केलेल्या पैशातून तुमची लाइफ अगदी आरामात जगू शकता.
आता वर दिलेल्या Quote मध्ये सुद्धा Financial Freedom ची व्याख्या दिली आहे ती समजून घेण्यासाठी आपण या Quote ला तीन भागात वाटून देऊ.
1) Turning Time into Money:
रोहित एक ग्राफिक डिजायनर आहे आणि या स्किलच्या माध्यमातून तो पैसे कमवत आहे. पण इथे तो नक्की काय करतोय? त्याच्याकडे टाइम आहे आणि त्या टाइमचा वापर करून तो पैसे कमवत आहे.
तुम्ही पण जॉब करत असाल किंवा बिझनेस. याचा अर्थ असा की तुमच्याकडे टाइम आहे आणि या टाइमचा वापर करून तुम्ही पैसे कमवत आहात. आणि हीच Financial Freedom ची पहिली पायरी आहे. त्यामुळे सगळ्यात आधी एक इन्कम सोर्स बनवा ज्यातून तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होईल.
Turning Time into Money म्हणजे तुमच्याकडे असलेला टाइमचा वापर पैसा कमविण्यासाठी करायचा. पण अशाप्रकारे पैसे कमविण्यात एक प्रॉब्लेम आहे तो म्हणजे की तुमच्याकडे टाइम हा लिमिटेड आहे. कधी ना कधी हा टाइम संपेल.
मग यावर उपाय काय? तुम्ही Financial फ्रीडम ची पहिली पायरी पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या पायरीवर जायचं आहे. आणि ती पायरी पुढीलप्रमाणे
2) Turning Money into Time:
जर आपण रोहितच उदाहरण घेऊन समजल तर तो आता ग्राफिक डिजायनिंगच काम करून पैसे कमवत आहे. त्याच्याकडे आता एक इन्कम सोर्स आहे आणि त्यातून तो दर महिन्याला एक ठराविक रक्कम कमवत आहे. पण त्याने त्याच्या इन्कममधील काही रक्कम इन्वेस्ट करण्यासाठी सुरुवात केली आहे. त्याने काही म्यूचुअल फंडमध्ये SIP चालू केली आहे.
आता इथे रोहित नक्की काय करतोय? तो त्याचा टाइम देऊन कमविलेल्या पैशाच उपयोग टाइम बनविण्यासाठी करत आहे. आता ते कस? जेव्हा तो पैसा नीट इन्वेस्ट करेल आणि तो पैसा वाढेल तेव्हा त्याच्याकडे एक ऑप्शन असेल, तो म्हणजे जॉब करायचा की आराम. त्याने जर जॉब सोडला तर त्याच्याकडे त्याचा पूर्ण टाइम असेल.
तुम्हाला जर आर्थिक स्वातंत्र्य हवय तर तुम्हाला देखील हेच करायच आहे. जितके पैसे तुम्ही कमवत आहात त्यातील काही रक्कम चांगल्या Assets मध्ये इन्वेस्ट कशी करता येईल याचा विचार तुम्ही केला पाहिजे. तुमच्याकडे पुरेसे Assets असतील ज्यातून तुम्हाला इन्कम मिळेल तर तुम्ही सुद्धा जॉब सोडून तुमचा टाइम फ्री करू शकता यालाच म्हणतात Turning Money into Time.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
3. Turning Time into Whatever You Want:
रोहितसोबत आपण सगळे जण या तिसऱ्या पायरीवर पोचण्यासाठी धडपड करत आहोत. ही आर्थिक स्वातंत्र्याची शेवटची पायरी आहे. तुम्ही पहिल्या दोन पायऱ्या पूर्ण केल्यात तरच तुम्ही इथे पोहचु शकता.
या स्टेपला तुमच्याकडे पुरेसा पैसा असेल, पुरेसा फ्री टाइम असेल आणि जेव्हा तुमच्याकडे या दोन्ही गोष्टी असतील तेव्हा तुम्ही काय कराल? जे तुम्हाला नेहमीच करायच आहे. कोणाला ट्रॅवल करायच असेल तर कोणाला बॉडी बनवायची असेल किंवा इतर गोष्टी.
यालाच म्हणतात Turning Time into Whatever You Want. तुम्हाला हव ते करायच फ्रीडम तुमच्याकडे असेल तेही तुमच्या टाइमनुसार.
Conclusion
एक गोष्ट लक्षात घ्या. Financial Freedom हे काय एकदा केल आणि काम झाल अस नाहीये. ही एक लॉन्ग टर्म प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये तुम्हाला पैसे कमवायचे आहेत, ते नीट इन्वेस्ट करायचे आहेत आणि तुमचा टाइम फ्री करायचा आहे जेणेकरून तो टाइम तुम्ही तुमच्या हिशोबाने वापरू शकता. त्यामुळे कमवा, इन्वेस्ट करा आणि फ्री व्हा!
Keep Earning, Keep Investing & Be Free!
3 thoughts on “Financial Freedom in Marathi: तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? (प्रोसेस समजून घ्या)”