माझ्याकडे सेंसेक्स आणि निफ्टि 50 दोन्ही इंडेक्स फंड्स आहेत? | Sensex Vs Nifty 50 Index Fund in Marathi

Rate this post

Sensex Index Fund Vs Nifty 50 Index Fund: आपल्या इंस्टाग्राम पेजचा एक फॉलोवर आहे करण, त्याने मला असा प्रश्न केला की, माझ्याकडे सेंसेक्स आणि इंडेक्स फंड असे दोन्ही इंडेक्स फंड आहेत. तर मी त्यामध्ये SIP कंटिन्यू करू का?

आजच्या पोस्टचा मेन मुद्दा हाच असेल की 2 इंडेक्स फंड आपल्या पोर्टफोलियोमध्ये असले पाहिजेत का? तुमच्या मनात ही शंका असेल तर या पोस्टमधून ती नक्कीच दूर होईल.

चला तर सुरवात करूया. 

त्या आधी इंडेक्स फंड काय ते मी थोडक्यात सांगतो.

इंडेक्स फंड असा फंड जो एखाद्या ठराविक इंडेक्सला कॉपी करतो. जस की सेंसेक्स किंवा निफ्टि 50. इंडेक्स फंडमध्ये फंड मॅनेजरला कसली रिसर्च करावी लागत नाही. ज्या कंपन्या इंडेक्समध्ये दिसत आहेत त्यावर पैसे लावायचे आणि त्या इंडेक्स एवढा रिटर्न घेऊन यायचा. बस एवढ काम असत.

आणि म्हणून इंडेक्स फंड खूप स्वस्त असतात. यांची फी खूप कमी असते. 

करणकडे टोटल 6 म्यूचुअल फंड्स आहेत आणि ते खालीलप्रमाणे 

  1. HDFC Index S&P Sensex Plan Direct Growth
  2. Nifty 50 Index Fund Direct Growth 
  3. Axis Small Cap Fund Direct Growth
  4. ICICI Prudential NASDAQ 100 Index Fund
  5. Parag Parikh Flexi Cap Direct Growth
  6. ICICI Prudential Technology Fund Direct Growth 

सगळ्यात आधी आपण 2 इंडेक्स फंड घ्यायचे की नाहीत यावर चर्चा करू

आता करणकडे HDFC Index S&P Sensex Plan Direct Growth हा इंडेक्स फंड आहे. आता तुम्ही सेंसेक्सच नाव तर एकल असेलच. ही बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची मार्केट इंडेक्स आहे. ज्यामध्ये भारतातील टॉप 30 कंपन्याचा समावेश असतो. जेव्हा तुम्ही असा एखादा फंड घेता तेव्हा तुम्ही डायरेक्ट या टॉप 30 कंपन्यामध्ये पैसे इन्वेस्ट करता असता. 

आता करणकडे दूसरा इंडेक्स फंड आहे तो म्हणजे Nifty 50 Index Fund Direct Growth. आता या फंडच काम सेमच आहे फरक फक्त हाच आहे की हा फंड सेंसेक्सला कॉपी न करता निफ्टि 50 या इंडेक्सला कॉपी करत आहे. निफ्टि 50 ही नॅशनल स्टॉक एक्स्चेंजची मार्केट इंडेक्स आहे ज्यामध्ये भारताच्या टॉप 50 कंपन्या असतात. जेव्हा यामध्ये फंडमध्ये इन्वेस्ट करता तेव्हा डायरेक्ट तुम्ही या टॉप 50 कंपन्यामध्ये इन्वेस्ट करता. 

2 इंडेक्स फंड आहेत तर प्रॉब्लेम काय आहे? 

प्रॉब्लेम आहे तोही 60% एवढा मोठा. 60% का? असा प्रश्न पडला असेल ना. कारण या दोन्ही फंडमध्ये पोर्टफोलियो Overlapping चा प्रॉब्लेम आहे. आता हे Overlapping काय? समजा फंड A मध्ये काही स्टॉक्स आहेत आणि तेच स्टॉक्स फंड B मध्ये सुद्धा आहेत तर याला Overlapping अस म्हणतात. दोन्ही फंडसमध्ये स्टॉक्स तेच असणार तर रिटर्न वेगळा मिळणार नाही. उगाच एक्सपेंस रेशियो भरावा लागेल.

ज्या कंपन्या निफ्टि 50 या इंडेक्समध्ये आहेत अगदी त्याच कंपन्या सेंसेक्स या इंडेक्समध्ये आहेत. आणि नुसत 10-15% ची Overlapping नाही तर चक्क 60% टक्के आहे. तुम्ही या दोन्ही फंडसना जरा चेक करून बघा. या दोन्ही फंडचा रिटर्न हा जवळजवळ सेम असेल. फारसा फरक दिसत नाही. 

आता अशा वेळी मी काय केल असत ते सांगतो. मी यापैकी फक्त एक फंड माझ्या म्यूचुअल फंड पोर्टफोलियोमध्ये ठेवला असता. आणि ठेवला असता काय, माझ्या पोर्टफोलियोमध्ये Nifty 50 Index Fund Direct Growth हा फंड आहे. आता काहीना प्रश्न पडेल मग सेंसेक्स वाला घेऊ की निफ्टि 50? तुम्हाला जो हवा तो घ्या निफ्टि 50 वाला फंड असेल तर इन्वेस्ट करण्यासाठी जास्त कंपन्या भेटतील बस हाच फरक आहे. 

आता आपण करणच्या बाकीच्या फंड्स बद्दल चर्चा करू!

Axis Small Cap Fund Direct Growth: हा एक चांगला स्मॉल कॅप फंड आहे. याचा ट्रॅक रेकॉर्ड पण चांगला आहे. चालू झाल्यापासून आतापर्यन्त या फंडने 25.23% चा रिटर्न दिला आहे. या फंडचा Expense रेशियो 0.55% आहे जो एका Active फंडच्या हिशोबाने ठीक आहे. जर करणने हा फंड लॉन्ग टर्मसाठी घेतला आहे तर हा फंड पोर्टफोलियोमध्ये असावा. (इथे लॉन्ग टर्म म्हणजे 7+ वर्षे) 

ICICI Prudential NASDAQ 100 Index Fund: हा सुद्धा एक इंडेक्स फंड आहे, फरक फक्त एवढाच आहे की हा आपल्या भारतीय शेअर मार्केटमधील इंडेक्स जस की सेंसेक्स आणि निफ्टि 50 ला कॉपी न करता अमेरिकेतील NASDAQ या इंडेक्सला कॉपी करतो. या इंडेक्स फंड Apple, गूगल, मायक्रोसॉफ्ट इ बाहेर देशातील कंपन्यांचे शेअर्स असतात. करणला जर बाहेर देशातील कंपन्यांमध्ये पैसे इन्वेस्ट करायचे आहेत तर हा फंड कंटिन्यू करू शकतो. 

Parag Parikh Flexi Cap Direct Growth: हा तर माझा फेवरेट फंड आहे आणि फलेक्सि कॅप कॅटेगरी पण. यावर जास्त न बोलता मी एवढंच सांगेन की एक फलेक्सि कॅप फंड म्यूचुअल फंड पोर्टफोलियोमध्ये असावा. ( अधिक माहितीसाठी 👉Parag Parikh Flexi Cap Fund: 48,000 करोडपेक्षा जास्त AUM असलेला फंड (काय आता रिटर्न कमी होणार?)

ICICI Prudential Technology Fund Direct Growth: हा एक सेक्टर फंड आहे. सेक्टर फंड म्हणजे असा फंड जो फक्त एकाच सेक्टरमधील कंपन्यांमध्ये पैसे इन्वेस्ट करतो. जस या फंडमध्ये सगळे पैसे हे फक्त आयटी सेक्टरमधील कंपन्यांमध्ये लावले जातात जस की TCS, Infosys, Wipro इ. सेक्टर फंड हा स्मॉल कॅप फंडपेक्षा प्रचंड Risky असतात. त्या सेक्टरमध्ये काही बदल झाले तर खूप लॉस होण्याची शक्यता असते. (मी स्वता सेक्टर फंडला माझ्या म्यूचुअल फंड पोर्टफोलियोपासून 4-5-10 हात लांब ठेवतो. कितीही चांगले रिटर्न दिसत असले तरीही मी सेक्टर फंड कधीच घेणार नाही. अधिक माहितीसाठी 👉सेक्टर फंड काय आहे? | Sector Fund in Marathi)

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

1 thought on “माझ्याकडे सेंसेक्स आणि निफ्टि 50 दोन्ही इंडेक्स फंड्स आहेत? | Sensex Vs Nifty 50 Index Fund in Marathi”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi