सायकोलॉजी ऑफ मनी बूकमधील पैशाचे टॉप 5 धडे | Psychology of Money in Marathi

Rate this post

Psychology of Money in Marathi: फायनान्सच बूक म्हंटल की तुमच्या डोक्यात हेच येतं असेल ना की आकडे, गणित, नियम इ. 

पण Psychology of Money हे बूक या बाबतीत खूपच वेगळं आहे. या बूकमध्ये ऑथर मार्गन हौसेल यांनी तुमचे पैसे आणि तुमचं नात हे आकडे किंवा नंबरच्या माध्यमातून नाही तर तुमच्या भावना, सायकॉलॉजीच्या माध्यमातून समजविल्या आहेत. 

या बूक मधील टॉप ५ महत्वाच्या आयडिया पुढीलप्रमाणे

1. Getting wealthy is not about the size of your paycheck; it’s about your savings rate.

ऑथर मॉर्गन हौसेल Psychology of Money बूकमध्ये  सांगतात की, श्रीमंत होण्यासाठी तुम्ही किती कमविता किंवा तुमच्या हातात किती रक्कम येते हे जास्त महत्त्वाचं नाहिये पण त्या रक्कमेपैकी तुम्ही किती रक्कम वाचवता हे जास्त महत्त्वाचं आहे. 

तुमचा पगार कितीही असुदेत पण तुम्ही त्यातले पैसै Save करत नसाल तर त्या मोठ्या पगाराचा काय उपयोग. तुम्ही स्वतः चेक करा की तुमचा Saving Rate काय आहे. Saving Rate म्हणजे तुम्ही तुमच्या Salary मधील किती टक्के रक्कम वाचवत आहात. 

कमीत कमी तुम्ही २०% रक्कम वाचवली पाहिजेच आणि योग्य रित्या Invest केली पाहिज. तुम्ही या पेक्षा जास्त Save करू शकता तर उत्तमच आहे.

2. Good investing is not necessarily about earning the highest returns; it’s about earning pretty good returns that you can stick with and can be repeated for the longest period.

मॉर्गन हौसेल सांगतात की, Good Investing चा अर्थ हा नाही की जास्तीत जास्त रिटर्न मिळवणे. Good Investing म्हणजे लाँग टर्मसाठी एक बऱ्यापैकी रिटर्न मिळवणे ज्यासोबत तुम्ही लाँग टर्मसाठी टिकून राहू शकता. 

उदाहरण: समजा तुम्हाला एक वर्षी २५% चा रिटर्न मिळाला आणि दुसऱ्या वर्षी १५% वर रिटर्न आला आणि मग ११% 

मॉर्गन हौसेल सांगतात की असा रिटर्न नकोय, त्यापेक्षा दर वर्षी १२-१५% चा रिटर्न मिळेल जो कमी असेल पण लाँग टर्ममध्ये या रिटर्नमधून चांगली Wealth बनवता येते. 

3. The ability to adapt to changing financial circumstances is more important than forecasting future circumstances.

ऑथर मॉर्गन हौसेल Psychology of Money बूकमध्ये सांगतात की फ्युचर कोणी बघितलं नाही, काही ना काही बदल सतत होत असतात. 

इकॉनॉमी असो की Financial सेक्टर यामध्ये बदल होतच राहणार आहेत. त्यासोबत तुमच्या घरी पण बदल होतील जस की लग्न होईल, मुल, आजारपण इ. गोष्टीमुळे खर्च वाढतील. 

या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमचे प्लॅन बदलले पाहिजेत किंवा त्यामध्ये बदल केले पाहिजेत. 

4. You can be a genius and still do foolish things with your money.

ऑथर मॉर्गन हौसेल Psychology of Money बूकमध्ये  स्पष्ट करतात की स्मार्ट व्यक्ती, खूप शिकलेला व्यक्ती आहे म्हणजे तो पैसा चांगले Manage करणार अस होत नाही. खूप वेळा अस होत की ज्या लोकांना फारस नॉलेज नसत ते लाँग टर्ममध्ये चांगली वेल्थ बनवतात. 

न्यूटन यांचं नाव आपण स्कूललाइफपासून एकंत आलो आहे आणि ते किती मोठे सायंटिस्ट होते. पण त्त्यांनीसुद्धा पैसे इन्वेस्ट करताना एक मोठी चूक केली आहे. South Sea कंपनीचे शेअर्स त्यांनी 100% प्रॉफिटसाठी विकले पण नंतर तेच शेअर्स जसे वाढायला लागले तेव्हा जवळजवळ सगळे पैसै देऊन त्यांनी ते शेअर्स पुन्हा विकत घेतले.

पण त्यानंतर जे व्हायचं तेच झालं, शेअर्स मोठ्या प्रमाणात पडले आणि त्यांना लॉस झाला. एवढा मोठा Mathematician, सायंटिस्ट पण पैशाच्या लालचमूळे स्वतःच्या भावणांवर कंट्रोल नाही ठेवता आला.

आणि म्हणून तुम्ही किती स्मार्ट आहात यापेक्षा तुमच्या भावनांवर तुमचा किती कंट्रोल आहे हे जास्त महत्त्वाचं आहे.

5. Comparing yourself to others can lead to financial disaster. The most important financial variable is your own satisfaction, not the satisfaction of your neighbor or coworker.

आजकाल जमाना सोशल मीडियाचा आहे. जो तो सोशल मीडिया इतरांना इंप्रेस करण्यासाठी प्रयत्न करत आहे. गाडी असो, महागडे कपडे असो की लेटेस्ट आयफोन.

पण मॉर्गन हौसेल सांगतात की तुम्ही या जाळ्यात अडकू नका. इतरांना इंप्रेस करण्याच्या नादात कर्जात जावू नका. 

तुम्ही तुमच्या Financial Goals वर फोकस करा. आणि जे आहे त्यात खुश राहायला शिका. 

कधी वेळ मिळाला तर Psychology of Money हे बूक नक्की वाचा. तुम्हाला Financial Behaviour बद्दल शिकायला मिळेल. नाहीतर बूक वाचायच नसेल तर मराठी फायनॅन्स ब्लॉगवरील पोस्ट वाचत जा. आम्ही तुमच्यापर्यंत अशाच महितीशीर पोस्ट घेऊ येऊ. 

Keep Reading, Keep Investing!

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 Rich Dad Poor Dad in Marathi (आर्थिक साक्षरतेचे 8 महत्वाचे धडे) 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance

1 thought on “सायकोलॉजी ऑफ मनी बूकमधील पैशाचे टॉप 5 धडे | Psychology of Money in Marathi”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi