तुम्ही आर्थिकदृष्ट्या योग्य कामे करत आहात जर… (Finance Knowledge)

Rate this post

जेव्हा आपण सोशल मीडियावर कोणाला नवा Iphone 15 घेताना बघतो, नवीन गाडी, कोणी छान छान ठिकाणी फिरायला जात आहे, स्टेटस वर स्टेटस ठेवत आहे आणि अस बरच काही. आता हे सगळ बघून आपण स्वतःला त्यांच्यासोबत नक्कीचं Compare करतो. (थोड का होईना पण करतो) हे सगळ पाहिल्यावर मनात विचार तर येतच असतात की ते किती पुढे गेले आहेत, मीच मागे राहिलो वैगेरे वैगेरे. पण जरा नीट विचार केलात ना तर तुम्ही खर तर खूप चांगल्या Financial Condition मध्ये असता. 

आजच्या पोस्टमध्ये आपण काही गोष्टींवर चर्चा करणार आहोत आणि या गोष्टी जर तुम्ही आता करत असाल तर तुम्ही एका चांगल्या Mindset आणि Financial Condition मध्ये आहात. 

1. स्वतःच्या पायावर उभे आहात

जेव्हा तुम्ही स्वतःची पूर्णेपणे घ्यायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही Self Sufficient झाला अस समजू शकता.  तुम्ही इतके मोठे आणि समजुदार झाला आहात की आता तुमच्या खर्चाचा बोजा आता फॅमिलीवर टाकत नाही. आणि खर बोलू तर जस कॉलेज पूर्ण झालं की फॅमिलीच्या पण अपेक्षा वाढतात की आता आमचा मुलगा/मुलगी आम्हाला थोडा हातभार लावेल. तुम्ही सुद्ध छोटा मोठा जॉब किंवा बिझनेस करून तुमच्या लाईफस्टाईलचा खर्च पूर्ण करत आहात.

2. तुम्ही बिल्स वेळेवर भरता. 

बिल कोणतेही असो मोबाईल, लाईट बिल, क्रेडिट कार्ड किंवा इतर. तुम्हाला बिल वेळेवर भरायची सवय आहे. आणि हे एक उत्तम चिन्ह आहे की तुम्ही Finance च्या बाबतीत एक जबाबदार व्यक्ती आहात. अनेक जण बिल कोणतेही असो आज भरेन, उद्या भरेन अस करत नुसती टाळाटाळ करत असतात. आणि याचा परीणाम काय होतो, अनेकवेळा एस्ट्रा पैसे भरावे लागतात.

3. तुम्ही कर्ज फेडत आहात (जर असेल तर) 

मला माहित आहे की या ब्लॉगचे खूप सारे वाचक एकदम Young आहेत त्यामुळे सगळ्यांनी काही लोन वैगेरे घेतले नसतील. पण एकदा का एका ठराविक वयात आपण आलो की लोन हे घ्यावच लागतं. खास करून होम लोन. आणि अजून कोणत्या प्रकारचं लोन तुम्ही घेतलं असेल तर तुम्ही ते लवकरात लवकर कसं फेडत येईल या उद्देशाने मेहनत घेत आहात.

4. 50,000 ची बचत

आता इथे काही जण confuse होतील कारण 50,000 ची बचत म्हणजे असे पैसे जे तुम्ही तुमच्या महिन्याभराच्या खर्चा व्यतिरिक्त जमा केले आहेत.  Saving चा असा पैसा जो तुमच्या दररोजच्या खर्चामध्ये सामील होईल. नाहीतर ज्या दिवशी Salary होईल आणि तेव्हा तुम्ही तुमचं बँक अकाऊंट चेक केलत तर त्या मध्ये नक्कीच एक चांगली रक्कम दिसणार. पण पुढील 2-3 दिवसात सगळे खर्च करून झाले की तुमच्या हातात नक्की किती राहतात हीच तुमची खरी Saving असते. जर तुम्ही आतापर्यंत एक चांगला Saving Rate ने पैशाची बचत करत अलात आहात तर तुम्ही इतरांपेक्षा नक्कीचं 1 पाऊल (चला २ पाऊल घेऊ) पुढे आहात.

हे नक्की वाचा:- भविष्यासाठी बचत आणि गुंतवणूक का करावी?

5. उगाच Show Off करायच्या भानगडीत न पडणे.

आजकाल मला खूप जणांच्या हातात iPhones बघायला मिळतात. तुम्ही पण ही गोष्ट नोटीस केली असेल. पण नुकतीच एक न्यूज वाचली त्यामध्ये अस सागितलं आहे की भारतामध्ये खरेदी केल्या जाणाऱ्या 10 पैकी 7 iPhones हे EMI वर घेतेले जातात. म्हणजे असे लोक iPhone च्या मागे धावत आहेत जे खर त्यांना Afford करू शकत नाही. आणि हे सगळ कशासाठी तर iPhone चा लोगो कॉलवर बोलताना दिसला पाहिजे. अनेक जण फक्त इतरांना दाखविण्याच्या नादात नको ते खर्च करत आहेत. आणि या Show Off मूळे EMI आणि कर्जाच्या जाळ्यात अडकत आहे. आणि तुम्ही या सगळ्यापासून दूर राहून पैसे कसे वाचवायचे याचा विचार करत आहात तर तुम्ही स्वतःला शाबाशी नक्कीचं दिली पाहिजे. ( आणि हो मी iPhone घेऊ नका अस अजिबात बोलत नाही, पण तेव्हा घ्या जेव्हा तुम्ही खरंच त्याला Afford करू शकता) 

6. तुम्ही स्वतःमध्ये Invest करत आहात

कधी नोटीस केलत तर तुम्हाला समजून येईल की एखादं टेस्टी फास्टफुड खाताना आपण कधीच विचार नाही करत पण तेच Gym ची मेंबरशिपचे पैसे भरताना, मी जाईन ना? एक वर्षाचं नाही एका महिन्याची घेतो, अस करत असतो. खर तर त्या Gym मधून तुम्हाला जास्त फायदा होणार असतो. कॉलेज संपल की कोणी बुक्स वाचायला म्हणतच नाही कारण ते म्हणतात आता एवढी स्टडी केली आता अजून नको. पण बुक्स वाचून तुम्ही सतत स्वतःला Upgrade करत असता. नवीन विचार तुमच्या Mind ला चालना देत असतात. त्यामुळे बुक्स, चांगले वेबिनार, सेमिनार इ. मध्ये थोडे पैसे Invest करा कारण या मधून मिळणारा रिटर्न हा नंबरमध्ये मोजता आला नाही तर खूप असतो. 

7. क्रेडिट कार्ड लोन नाही 

आजकाल खूप सारे क्रेडिट कार्ड आले आहेत. या क्रेडिट कार्ड कंपन्या कॅशबॅक, विविध ऑफर, Zero Cost EMI इ सुविधा देऊन आपण जास्तीत जास्त कसा खर्च करून याकडे लक्ष देत असतात. क्रेडिट कार्ड वापरणे म्हणजे कंपनीचे पैसे उधार घेऊन वापरणे. यासाठी कंपनी तुम्हाला Free Credit Period देते जो सहसा 35-40 दिवसांचा असतो. पण  त्यानंतर जर तुम्ही वेळेवर पेमेंट केलं नाही तर खूप मोठ्या प्रमाणत व्याज घेतला जातो. आणि हे सगळ झाल्यावर तुमचा क्रेडिट स्कोर पण खराब होतों. त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरा त्यात काही चुकीचं नाही पण नीट समजून आणि वेळेवर पेमेंट करायला विसरू नका. कोणत्याही प्रकारची थकबाकी क्रेडिट कार्ड कंपनीकडे ठेऊ नका.

8. तुम्ही तुमच्या टाईमची कदर करत.

आपल्या सगळ्यांकडे फक्त 24 तास असतात. पण कोणी श्रीमंत होतो तर कोणी नाही. जर तुम्हाला Wealthy बनायचं आहे तर तुम्हाला टाईमची कदर करावीच लागेल. कारण हे एकच असे Asset आहे जे गेलं की पुन्हा येत नाही. जेव्हा तुम्ही Financially Free होता तेव्हा तुमच्याकडे खूप सारा टाईम वाचतो जो तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला हवं तिथे वापरू शकता. 

9. तुम्ही Cash Flow इन्कमवर फोकस करत आहात.

सगळ्यात आधी हे Cash Flow काय ते थोडक्यात सांगतो. Cash Flow म्हणजे की एखादं अस Asset जे तुम्ही घेतलं आहे पण काही न करता त्यातून तुम्हाला इन्कम येत आहे. जस की स्टॉक, तुम्ही एकदा का स्टॉक घेतलात की त्यावर रिटर्न मिळतो आणि त्याचा फायदा तुम्हाला मिळतो. पण अजून एक फायदा त्या स्टॉकमधून होतो तो म्हणजे Dividend. आपण सगळ्यांनी Dividend इन्कमवर फोकस केला पाहिजे जेणेकरून जेव्हा आपला जॉब बंद होईल तेव्हा पण एक चांगला इन्कमचा मार्ग आपल्याकडे तयार असेल.

10. Wealth बनविण्यासाठी नियमित Invest करत आहात 

दर महिन्याला अगदी न चुकता तुम्ही थोडी रक्कम Savings आणि Investing करण्यासाठी वापरत आहात. तुम्ही Mutual Fund SIP चालू केली आहे आणि त्यामध्ये नियमीतपणे पैसे Invest करत आहात. Wealth बनविण्याचा सगळ्यात मोठा हॅक हाच आहे की तुम्ही सातत्याने काही रक्कम Invest करत आहात. याचा फायदा असा होतो की Compounding च्या मदतीने पैसे मोठया प्रमाणात वाढायला सुरुवात होतो. पण अशा वेळी उगाच SIP स्टॉप करू नका.

हे नक्की वाचा:- SIP काय आहे? फायदे आणि तोटे जाणून घ्या. 

11. तुम्ही जबाबदारी घेतली आहे. 

तुमचे goals असो, Health असो की तुमचे रिटायरमेंट प्लॅन. या सगळ्याची पूर्ण जबाबदारी फक्त तुमची आहे. त्यामूळे एक Growth Mindset तुम्ही तयार केला पाहिजे जर Financial Freedom तुम्हाला लवकरात लवकर गाठायच आहे. तुम्ही जसा विचार करणार, ज्या सवयी विकसित करणार आहात त्यांचा परीणाम तुम्हाला पुढील काही वर्षात बघायला मिळेल. जर चांगल्या सवयी असतील तर फ्युचर नक्कीचं चांगल असेल पण वाईट सवयी असतील तर तुम्हाला माहित आहे काय होईल. 

आजची पोस्ट आवडली असेल तर तुमच्या एका खास मित्रासोबत किंवा खास मैत्रिणीसोबत शेअर करा. Happy Investing! 

2 thoughts on “तुम्ही आर्थिकदृष्ट्या योग्य कामे करत आहात जर… (Finance Knowledge)”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi