कॅशलेस क्लेमच्या नव्या नियमामुळे हॉस्पिटलचे बिल आता तुमच्या खिशातून नाही जाणार! | IRDAI & Health Insurance News

5/5 - (1 vote)

IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) ने इन्शुरन्स सेक्टरमध्ये या वर्षांत खूप सारे चांगले बदल केले आहेत. त्यापैकी एक मोठा बदल म्हणजे कॅशलेस क्लेम. काय आहे हा बदल? जाणून घ्या.

जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance

कॅशलेस क्लेमची संकल्पना:

तुम्ही किंवा तुमच्या घरातल्यांपैकी कोणी आजारी पडलं आणि हॉस्पिटलमध्ये भरती केलं, तर सगळ्यात आधी ऍडमिशन काउंटरवर फी किती आहे हे सांगितलं जातं. पण तुमच्याकडे मेडिकल पॉलिसी असेल तर तुम्ही कॅशलेस क्लेमची सुविधा घेऊ शकता.

कॅशलेस क्लेम म्हणजे काय?

जेव्हा तुम्ही हॉस्पीटलमध्ये भरती होता तेव्हा हॉस्पिटलची सगळी बिले तुमच्या खिशातून न भरता, इन्शुरन्स कंपनी ती रक्कम थेट हॉस्पीटलला भरते.

पूर्वीची पद्धत

आधी काय व्हायचं ते बघा. समजा, तुम्ही अशा हॉस्पीटलमध्ये भरती झालात जिथे तुमची इन्शुरन्स कंपनी कॅशलेस क्लेम सुविधा देत नसेल, तर सगळी बिले आधी तुम्हालाच भरावी लागायची. मग सगळी ओरिजनल बिले दाखविल्यानंतर इन्शुरन्स कंपनी तुम्हाला पैसे परत देणार.

नवीन नियम

आता IRDAI ने हा नियम बदलला आहे. आता तुम्ही कोणत्याही हॉस्पीटलमध्ये भरती व्हा, तुमची इन्शुरन्स कंपनीच त्या हॉस्पीटलसोबत Tie up असो की नसो, तुम्हाला कॅशलेस क्लेम सुविधा मिळणार. म्हणजे तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे भरावे लागणार नाहीत.

नियमाचा फायदा

IRDAI ने हा नियम लागून करून आपल्या सारख्या सामान्य पॉलिसी होल्डरना नक्कीच दिलासा दिला आहे. त्यामुळे नेक्स्ट टाइम कधी हॉस्पिटलमध्ये भरती झालात आणि तिथे कोणी बोललं की कॅशलेस क्लेम सुविधा उपलब्ध नाही, तेव्हा त्यांना IRDAI चा हा नियम सांगा.

ही पोस्ट वाचा 👉 Health Insurance क्लेमची समस्या? IRDAI चे नवे नियम तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार!

FAQs

कॅशलेस क्लेम म्हणजे काय?

कॅशलेस क्लेम म्हणजे इन्शुरन्स कंपनी तुमच्या हॉस्पिटल बिलांची रक्कम थेट हॉस्पिटलला भरते, त्यामुळे तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे भरावे लागत नाहीत.

कॅशलेस क्लेमची सुविधा कोणत्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे?

IRDAI च्या नवीन नियमानुसार, तुम्ही कोणत्याही हॉस्पिटलमध्ये भरती झाला तरी तुमच्या इन्शुरन्स कंपनीसोबत त्या हॉस्पिटलचे tie up असो की नसो, तुम्हाला कॅशलेस क्लेम सुविधा मिळणार.

माझ्याकडे मेडिकल पॉलिसी आहे, परंतु हॉस्पिटल कॅशलेस क्लेम स्वीकारत नाही. मी काय करू?

तुम्ही हॉस्पिटलला IRDAI च्या नवीन नियमांची माहिती द्या की कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅशलेस क्लेम सुविधा लागू आहे.

कॅशलेस क्लेमसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

सामान्यतः, तुमची मेडिकल पॉलिसी, आधार कार्ड, आणि हॉस्पिटलमधील कागदपत्रांची प्रत आवश्यक असते. तपशीलवार माहितीसाठी तुमच्या इन्शुरन्स कंपनीशी संपर्क साधा.

कॅशलेस क्लेमसाठी कोणत्या पद्धतीने अर्ज करावा?

कॅशलेस क्लेमसाठी, हॉस्पिटलच्या इन्शुरन्स डेस्कवर जाऊन अर्ज करा. तिथे आवश्यक कागदपत्रे आणि माहिती दिल्यानंतर प्रक्रिया सुरू होईल.

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi