फोनपे ॲपवर एसआयपी नॉमिनेशन कसं करायचं? | How to Add Nominee in PhonePe App

Rate this post

How to Add Nominee in PhonePe App: सेबीच्या नियमानुसार 31 डिसेंबर 2023 च्या अगोदर म्युच्युअल फंड इन्वेस्टर आणि डिमॅट अकाउंट होल्डर यांनी नॉमिनेशन करणं गरजेचं आहे. आणि नॉमिनेशन करायचं नसेल तर Opt Out असा फॉर्म भरणे गरजेचे आहे. Opt Out म्हणजे तुम्हाला कोणाला तुमच्या अकाउंटला नॉमिनी ठेवायचं नाही. 

नॉमिनी न ठेवल्यास सेबी तुमच अकाउंट फ्रिज करू शकते आणि दुसर म्हणजे त्यानंतर एसआयपी मधून पैसे काढणे किंवा स्टॉक मधून पैसे काढणे कठीण होऊन जाईल. ज्या इन्व्हेस्टरनी आधीच नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये.

आजच्या पोस्टमध्ये आपण PhonePe App वर नॉमिनेशन कस करायच याची प्रोसेस समजून घेऊ.  PhonePe App मी चेक करून पाहिल तिथे डायरेक्ट नॉमिनी Add करायचा मार्ग नाहीये. फोनपेच्या वेबसाइटवर फक्त नॉमिनी वेरीफाय आणि चेंज करायची प्रोसेस दिली आहे पण नवीन नॉमिनी ठेवायचा असेल तर त्याची प्रोसेस तुम्हाला CAMS किंवा KFintech च्या वेबसाइटवर जावून करावी लागेल. (एडयाचा बाजार सगळा)  

How to Verify or Add Nominee on PhonePe App 

स्टेप 1:  फोनपे ॲपवरील होम स्क्रीन वर जा आणि Wealth या ऑप्शन क्लिक करा. 

स्टेप 2: My Portfolio हा ऑप्शन निवडा 

स्टेप 3: टॉप राईट कॉर्नरवरील अकाउंट आयकॉनवर क्लिक करा

स्टेप 4: तुम्ही ज्या व्यक्तीला आधीपासून नॉमिनी केला आहे त्याच नाव तुम्हाला दिसेल आता तुम्हाला ते नाव व्हेरिफाय करायच आहे

स्टेप 5: Verify Nominee वर क्लिक कर आणि मोबाईल नंबर टाका त्यावर एक ओटीपी येईल

स्टेप 6: ओटीपी टाकून तुमचं नॉमिनी व्हेरिफाय करा

जर तुमच्या नॉमिनीचं नाव दिसत नसेल याचा अर्थ तुम्ही नॉमिनी ठेवलं नाहीये आणि ते करण्यासाठी तुम्हाला दुसरी प्रोसेस करावी लागेल पण ती फोनपे ॲपवर नाही मिळणार, तर त्यासाठी तुम्हाला खालील प्रोसेस करावी लागेल. 

फोनपेने त्यांच्या वेबसाईटवर स्वतः सांगितला आहे की फोनपे ॲपमध्ये नवीन नोमिनी ऍड करता येत नाही तर त्यासाठी तुम्हाला ज्या म्युच्युअल फंड कंपनीमध्ये तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले आहेत त्यांच्या साइटवर जाऊन करावा लागेल किंवा ट्रान्सफर एजंट जसे की CAMS किंवा KFintech यांच्यामार्फत करावा लागेल. त्यांच्याकडून तुम्हाला एक लिंक येईल त्याने तुम्ही नॉमिनी व्हेरिफाय करू नये ऍड करता येईल. 

वेबसाइट लिंक → CAMS

वेबसाइट लिंक → KFintech 

(आणि एक गोष्ट लक्षात घ्या, शक्य झाल तर PhonePe सारख्या App वरुण SIP, इन्शुरेंस इ. गोष्टी करू नका. कारण करताना पटापट करता येत पान गरज लागली की तशी सर्विस मिळत नाही. तुम्ही SIP किंवा स्टॉक Investing साठी खास बनविलेले Apps जस की Zerodha, Groww, Angel One किंवा इतर एखादा चांगला App वापरा. बाकी निर्णय तुमचा असेल पान पैशाच मॅटर आहे म्हणून काळजी घ्या)

इतर पोस्ट वाचा👉 मला 3000 रुपयाची SIP करून 10 करोड रुपये बनवता येतील का? 

फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)

1 thought on “फोनपे ॲपवर एसआयपी नॉमिनेशन कसं करायचं? | How to Add Nominee in PhonePe App”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi