Epack Durable IPO Subscription Status Day 2: इपॅक ड्यूरेबल आयपीओचा बिड्डिंगसाठी शेअर मार्केटमध्ये आज दूसरा दिवस होता. आजच्या दिवसात इपॅक ड्यूरेबल आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 3.67 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.
रिटेल कॅटेगरीमधून या आयपीओसाठी चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कॅटेगरीमध्ये इपॅक ड्यूरेबल आयपीओ 3.81 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.
NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये आज आयपीओला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे आणि आयपीओ 7.9 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक, NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ.
QIB (Qualified Institutional Buyers) नी या आयपीओसाठी एवढा चांगला प्रतिसाद दिला नाही. या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ फक्त 17% सबस्क्राईब झाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या म्यूचुअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
EPACK Durable IPO Details
इपॅक ड्यूरेबल आयपीओ 19 जानेवारी 2024 रोजी मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू होणार आहे आणि 23 जानेवारी 2024 रोजी बंद होईल. इपॅक ड्यूरेबल आयपीओची इश्यू साइज ₹640 करोड रुपये आहे. आयपीओचा प्राईस बॅंड ₹218 – ₹230 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे.
या आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही एका लॉटमध्ये कमीत कमी 65 शेअर घेऊ शकता ज्याची किंमत ₹14,950 एवढी होते. इपॅक ड्यूरेबल आईपीओची अलॉटमेंट तारीख 24 जानेवारी 2024 असेल आणि आयपीओची लिस्टिंग 29 जानेवारी 2024 ही ठरविण्यात आली आहे.
EPACK Durable IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: | January 18, 2024 |
IPO Open Date: | January 19, 2024 |
IPO Close Date: | January 24, 2024 |
Basis of Allotment: | January 24, 2024 |
Refunds: | January 25, 2024 |
Credit to Demat Account: | January 25, 2024 |
IPO Listing Date: | January 29, 2024 |
1 thought on “Epack Durable IPO: आज होता दूसरा दिवस, आयपीओला मिळतोय जोरदार प्रतिसाद”