Nova Agri Tech IPO: एक नवीन आयपीओ शेअर मार्केटमध्ये एंट्री घ्यायला तयार आहे. नोव्हा अँग्री टेक आयपीओची सुरुवात 23 जानेवारी 2024 रोजी होणार आहे आणि हा आयपीओ 25 जानेवारी 2024 रोजी बंद होणार आहे.
नोव्हा अँग्री टेक आयपीओची इश्यू साइज ₹143.81 करोड एवढी आहे. या आयपीओचा प्राइज बॅन्ड ₹39 ते ₹41 रुपये प्रति शेअर ठरविण्यात आला आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही एका लॉटमध्ये कमीत कमी 365 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची किंमत ₹14,965 रुपये एवढी असेल.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
Nova Agri Tech Company Details
नोव्हा अँग्री टेक ही एक कृषी-इनपुट उत्पादक कंपनी आहे जी मातीचे आरोग्य व्यवस्थापन, पीक पोषण आणि पीक संरक्षण उत्पादने पुरवते.
नोव्हा अँग्री टेक लेटेस्ट टेक्नॉलजीचा वापर करून हे विविध प्रॉडक्ट बनविते ज्याना शेतकरी कम्यूनिटीमध्ये मोठी मागणी आहे. पुढील काही कॅटेगरीजमध्ये नोव्हा अँग्री टेक उत्पादने बनविते. 1) माती आरोग्य व्यवस्थापन उत्पादने 2) पीक पोषण उत्पादने 3) जैव कीटकनाशक उत्पादने 4) एकात्मिक कीटक व्यवस्थापन उत्पादने 5) पीक संरक्षण उत्पादने.
नोव्हा अँग्री टेक भरतामध्ये 16 राज्यामध्ये काम करत आहे तसेच बंगलादेश, श्री लंका आणि व्हिएतनाम इ. देशांमध्ये बिझनेस वाढवण्यासाठी परवानगीसाठी अप्लाय केल आहे.
नोव्हा अँग्री टेक कंपनीकडे 629 विविध प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. कंपनीकडे 10,900 डीलर्स आहेत ज्यांच्या मदतीने ही उत्पादने मार्केटमध्ये पोचवली जातात.
Nova Agri Tech IPO Funds
या आयपीओमधून जमा केलेल्या पैशाचा वापर नोव्हा अँग्री टेक तिची Subsidiary कंपनी Nova Agri Sciences Private Limited मध्ये नवीन प्लांट उभ करण्यासाठी करणार आहे. तसेच आयपीओमधील काही रक्कम जुन्या प्लांटना वाढवण्यासाठी केला जाईल.
दैनदीन खर्चासाठी लागणारा पैसा या आयपीओच्या माध्यमातून कंपनी मिळवणार आहे. आणि इतर जनरल कॉर्पोरेट खर्चासाठी हा पैसा वापरला जाईल.
Nova Agri Tech Company Financial Report
₹ in Crores | |||
Year | Revenue | Expense | PAT |
2020 | ₹126.67 | ₹121.81 | ₹2.98 |
2021 | ₹160.92 | ₹152.26 | ₹6.30 |
2022 | ₹185.61 | ₹167.17 | ₹13.69 |
2023 6M | ₹81.98 | ₹73.21 | ₹6.86 |
Nova Agritech IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: | January 19, 2024 |
IPO Open Date: | January 23, 2024 |
IPO Close Date: | January 25, 2024 |
Basis of Allotment: | January 29, 2024 |
Refunds: | January 30, 2024 |
Credit to Demat Account: | January 30, 2024 |
IPO Listing Date: | January 31, 2024 |