20s हे लाइफच अस टाइम आहे जिथे तुम्ही सगळ्यात जास्त Active असता, खूप साऱ्या गोष्टी शिकायच्या असतात आणि खूप सारी स्वप्ने.
पण याच वयात जर तुम्ही तुमच्या Financial लाइफवर नीट लक्ष नाही दिलत तर पुढील लाइफ खूप कठीण होवू शकते. कारण 20s मध्ये तुमच्या आर्थिक शिक्षणाचा पाया रचला जातो. खूप सारी तरुण मंडळी याच वयात काही चुका करतात ज्यामुळे पूर्ण लाइफभर त्यांना पश्चात्ताप करावा लागतो.
या ब्लॉग पोस्टमध्ये आपण 5 Money Mistakes ना नीट समजून घेऊत आणि त्यांना तुम्ही कस टाळू शकता यावर डीटेलमध्ये चर्चा करुयात.
चला तर सुरुवात करूया.
MONEY MISTAKE 1: – पुरेशी बचत न करणे
20s मध्ये सगळ्यात मोठी Financial Mistake लोक करतात ती म्हणजे पुरेशी बचत न करणे.
20s मध्ये तुम्ही तुमच कॉलेज पूर्ण करता आणि पहिला जॉब करायला सुरुवात करता. जॉबमधून जी इन्कम येते त्यातून सगळ्यात आधी आपल्या इच्छा पूर्ण कराव्या अस तुम्हाला वाटत हो की नाही? मोबाइल घेणे, बाहेर फिरायला जाणे, बाइक घेणे इ. गोष्टी आपल्याला करायच्या असतात. अस करुन सगळे पैसे खर्च करणे सोप आहे पण स्वतासाठी एक Emergency फंड तयार करणे गरजेच आहे.
आणि 20s बचत करण्यासाठी एक बेस्ट टाइम आहे कारण तुमच्याकडे पुरेसा वेळ असतो या पैशाला Compound व्हायला. जरी छोटी रक्कम तुम्ही Save केलीत तर पुढे जाऊन ती मोठी रक्कम बनते.
फक्त emergency fund साठी बचत न करता तुमचे विविध Goals ना ठरवा जस की घर घेणे, बाहेर फिरायला जाणे, बिझनेस करणे इ. साठी छोट्या रककमेची बचत आतापासून करा. बचत करणे ही एक सवय झाली पाहिजे आणि यासाठी एक चांगली टेक्निक म्हणजे की Saving ना ऑटोमॅटिक करणे.
MONEY MISTAKE 2: – Entertainment वर अति खर्च करणे
Entertainment हा आपल्या लाइफचा एक महत्वाचा पार्ट आहे.
पण यावर प्रमाणापेक्षा जास्त खर्च करणे तुमच्या पैशासाठी खूप धोकादायक ठरू शकत. मित्रांसोबत बाहेर फिरायला जाणे, तुमच्या Hobbies साठी खर्च करणे आणि खास आजकाल जे नवीन OTT प्लॅटफॉर्म येत आहेत त्यांना Subscribe करणे जसे की Amazon Prime, Hotstar, Zee5 इ. पण हे सगळ खूप विचार करून केल पाहिजे.
मी आजकाल एक प्रॉब्लेम पाहतो ते म्हणजे एखादी नवीन Web Series येते आणि ती असते Amazon Prime वर लॉंच होते, ते बघायला तुम्हाला Amazon Prime घ्याव लागत. तसेच काही वेळाने एखादी नवीन Web Series येते आणि ती लॉंच होते Hotstar वर आणि मग त्यासाठी अजून एक Subscription घ्याव लागत.
या संगळ्यावर होणारा अति खर्च टाळायचा असेल तर Entertainment साठी एक बजेट बनवा आणि त्या बजेटनुसार खर्च करण्याचा प्रयत्न करा. याचा फायदा असा होईल की पैशाची बचत तर होईलच पण त्यासोबत तुम्हाला Entertainment मन मारता नाही येणार.
MONEY MISTAKE 3: – खर्च ट्रक न करणे
क यशस्वी Financial Management ची सुरुवात तुमचा पैसा नककी कुठे खर्च होतं आहे हे समजून घेणे यात आहे.
आणि यासाठी सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे तुमचे खर्च ट्रॅक करणे. जेव्हा तुम्ही तुमचे खरचं ट्रॅक करायला सुरुवात कराल तेव्हां नक्की तुमचा पैसा कुठे खर्च होत आहे याची पूर्ण माहिती तुम्हाला असेल. आणि जेव्हा तुम्हाला वायफळ होणाऱ्या खर्चाची माहिती होईल तुम्ही तो खर्च जाणीवपूर्वक कमी करू शकता.
आणि यासाठी तुम्हाला Google Play Store वर खूप सारे फ्री ॲप्स मिळतील. मी स्वतः Notion या ॲपमध्ये एक Template बनवल आहे. त्यामध्ये मी माझे सगळे खर्च ट्रॅक करत असतो.
खर्च ट्रॅक करण्याचा सगळ्यात मोठा फायदा हाच आहे की तुम्हाला तुमच्या खर्च करण्याच्या सवयींमध्ये एक पॅटर्न दिसायला सुरुवात होते. तुम्ही महिन्याला किती खर्च करता, कोणत्या महिन्यात जास्त खर्च होतो, वर्षभर किती खर्च झाला? इ. जेव्हा तुमच्याकडे ही माहिती असेल, हा महत्त्वपूर्ण Data असेल तर फ्युचरसाठी लागणारा खर्च, तुमचे Financial Goals साठी लागणारा खर्च या सगळ्यासाठी तूम्ही योग्य ती तयारी करू शकता.
आणि म्हणून खर्च ट्रॅक करणे गरजेचं आहे. आणि खर बोलू तर जास्त वेळ नाही लागतं फक्तं दिवसातून ५-७ मिनिटे पुरेशी आहेत. एकदा का सवय झाली की तुझी आपोआप खर्च ट्रॅक करायला सुरुवात कराल.
MONEY MISTAKE: – महागडं रहाणीमान
आजकाल सोशल मीडियावर अनेकजण त्यांची बेस्ट लाइफस्टाइल इतरांना दाखविण्याच्या नादात असतात. महागडे कपडे, आयफोन, कार आणि अस बरच काही.
आणि हे सगळ बघून आपल्याला पण कधी ना कधी अस वाटत की, यार माझ्याकडे पण या सगळया गोष्टी असायला हव्यात. आणि याच नादात अनेकजण क्रेडिट कार्डचा वापर करून महागडे कपडे आणि वस्तू विकत घेतात. गरजेपेक्षा मोठ घर घायच्या नादात मोठ लोन काढतात आणि आयुष्यभर त्या लोनच्या ओझाखाली जगत असतात.
हे सगळ का? फक्तं इतरांना इंप्रेस करण्यासाठी न परवडणारे खर्च करून बसतात.
जर तुमची सध्याची लाईफस्टाईल तुमच्या चालू इन्कमला परवडणारी नसेल तर त्यामध्ये आताच बदल करायची गरज आहे. जेव्हा तुझी तुम्हाला परवडणारी लाईफस्टाईल जगता तेव्हा नको ते आर्थिक टेन्शन तुम्हाला येत नाही.
याचा फायदा असा होतो की तुम्ही तुमचे Financial Goals एका शांत डोक्याने आणि उत्तम प्रकारे प्लॅनिंग करून पूर्ण करता.
MONEY MISTAKE 5: – Investing ला सुरुवात न करणे
तुमच्या 20s मध्ये पैसै Invest न करणे ही तुमची सगळ्यात मोठी चूक असू शकते.
कारण 20s मध्ये जरी तुमची इन्कम कमी असली तुमच्याकडे त्या छोट्या रक्कमेला मोठ करण्यासाठी पुरेसा वेळ असतो. या वेळेचा वापर तुम्ही योग्यरित्या केला पाहिजे.
Investing करून तुम्ही तुमच्या पैशाला मोठ्या प्रमाणात वाढवू शकता. Saving करणे गरजेचं आहे पण तेवढंच महत्त्वाचं आहे की Save केलेला पैसा स्टोक्स, Mutual Funds, Gold इ. मध्ये तुमच्या रिस्कनुसार Invest करणे. Investing हे एक लाँग टर्मसाठी केलं जाणार काम आहे त्यामुळे शॉर्टमधील चढ उतार तुम्हाला सहन करावे लागतील याची तयारी ठेवा.
Financial Success साठी काही बोनस टिप्स
वरील 5 Money Mistakes तुम्ही काहीही करुन टाळल्या पाहिजेत पण तुमच्या 20s मध्ये पैसे योग्यरित्या मॅनेज करता असताना काही इतर टिप्स तुमची नक्कीच हेल्प करतील त्या पुढीलप्रमाणे
1. Financial Goals स्पष्ठ करा
एखादी परीक्षेची तयारी करत असताना तुम्हाला किती टक्के मिळवायचे आहेत हे तुम्हाला स्पष्ठ नसेल तर त्यासाठी तयारी करत असताना फोकस राहणे जरा कठीणच आहे.
अगदी तसचं तुमच्या आर्थिक परीक्षेच्या बाबतीत आहे. जर Goal स्पष्ठ नसेल तर तयारी कसली करणारं? म्हणून सगळ्यात आधी Financial Goals ठरवा जस की घर घेणे, गाडी घेणे, बाहेर फिरायला जाणे, बिझीनेससाठी पैसे जमा करणे इ.
Goal स्पष्ठ असेल तर तुम्ही आर्थिक स्वातंत्र्याच्या प्रवासात Motivated राहाल आणि त्यासाठी नियमितपणे Save आणि Invest करू शकाल.
2. Emergency Fund बनवा
लाइफचा काही भरवसा नसतो. कधी कोणता खर्च येईल काही सांगता येत नाही.
घरी कोणी आजारी पडल, बाईक खराब झाली, घराची दुरुस्ती इ. आणि या सगळ्यासाठी जर तुमच्याकडे Emergency Fund तयार असेल तर तुम्हाला तुमच्या चालू Investments तोडाव्या लागणार नाहीत.
कारण एकदा का त्या तोडल्या की मग पुन्हा झीरोपासून सुरुवात करणे खूप कठीण म्हणून Emergency Fund तयार ठेवा.
इमर्जन्सी फंड तयार करा (Step by Step)
— मराठी फायनान्स (@marathi_finance) July 9, 2023
1st टार्गेट – 10k
2nd टार्गेट – 25k
3rd टार्गेट – 50k
4th टार्गेट – 1lakh
अगदी असच चालू ठेवा….
इमर्जन्सी फंड कमीत कमी 6 महिन्यांचा खर्च भागेल एवढा असावा.
प्रत्येक वर्षी ही रक्कम वाढवत रहा.
3. क्रेडिट स्कोर चांगला ठेवा
कधी तुम्ही लोन कसं घ्यायचं याची चौकशी करायला एखादया बँकमध्ये जा.
सगळ्यात आधी तुम्हाला विचारतील तुमचा क्रेडिट स्कोर किती आहे. Credit Score वरून तुम्ही उधार घेतलेले पैसै परत करणार की नाही याचा अंदाज लावला जातो. जितका जास्त क्रेडिट स्कोर लोन मिळण्याचे Chances जास्त होतात.
Credit Score खराब कधी होत जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्डचा बिल वेळेवर भरत नाही किंवा Due Date नंतर भरता. एखादं लोन घेतल होत त्याचे EMI सतत चुकवत आहात.
4. खूप व्याजदर असलेलं खर्ज घेऊ नका.
मी एका को ऑपरटिव्ह बँकमध्ये जॉब करत आहे. बँकेमध्ये अनेक जण पर्सनल लोन घ्यायला येतात ज्याचा व्याजदर 13-14% असतो. 13-14% एवढा रिटर्न तुमची आर्थिक गाडीला पटरीवरून खाली न्यायला पुरेसा आहे.
आजकाल लोक लोन काढून आयफोन घेत आहेत, महागड्या वस्तू घेत आहे. काही लोकं तर चक्क ट्रेडिंगसाठी लोन काढत आहेत. कर्जाच्या जाळ्यात एकदा का अडकत गेलो की बाहेर पडणे खूप कठीण होवून बसते.
म्हणून खूप व्याजदर असलेलं लोन टाळा.
(मी जेव्हा ही पोस्ट लिहीत आहे तेव्हा आलेली न्यूज बघा)
Post by @marathifinanceView on Threads
5. नेहमी नवीन गोष्टी शिकत रहा.
आपल्याला Financial Knowledge शाळा कॉलेजमध्ये शिकवलं गेलं नाही.
आता यासाठी सतत शाळा कॉलेजना दोष देऊन काही साध्य होणार नाही. त्यामुळे स्वतः पैशाबदल शिकायला सुरुवात करा. YouTube, Blogs, Finance वरील चांगली पुस्तके, फ्री कोर्सेस इ. चा वापर तुम्ही करू शकता.
आपण या पोस्टमध्ये काय शिकलो?
20s हे अस वय आहे जिथे तुमच्या लाइफचा पाया भक्कम करता येतो नाहीतर पूर्णपणे बिघडवता येतो. आणि आपण फक्त आर्थिक पाया बद्दल बोलू तर तुम्ही तो पक्का करू शकता योग्य ते निर्णय घेऊन जस की छोटी का होईना पण पैसे इनवेस्ट करणे, संयम बाळगणे आणि नेहमी लॉग टर्मचा विचार करणे.
या ब्लॉग पोस्टमध्ये दिलेल्या 5 Money Mistakes तुम्ही टाळून तुमचे Financial Goals पूर्ण करण्या च्या दिशेने तुम्ही पावल उचलत आहात.त्यामुळे 20s मध्ये योग्य ते निर्णय घेऊन, योग्य त्या सवयी विकसित करून जस की Saving आणि Investing. तुम्ही एका उज्वल भविष्याकडे वाटचाल करीत आहात.
इतर महत्वाच्या पोस्ट नक्की वाचा
- Emergency Fund नेमकं आहे तरी काय?
- आर्थिक स्वातंत्र्याबद्दलचे 5 गैरसमज | FIRE
- म्यूचुअल फंड कोणता घेऊ? कमी NAV vs जास्त NAV
All The BEST
4 thoughts on “20s मध्ये 5 MONEY MISTAKES टाळा | Marathi Finance”