सेन्सेक्स आणि निफ्टी काय आहे? | What is Sensex & Nifty in Marathi

Sensex and Nifty In Marathi

सेन्सेक्स आणि निफ्टी या भारतातील दोन सर्वात लोकप्रिय शेअर बाजार निर्देशांक म्हणजेच स्टॉक मार्केट इंडेक्स आहेत. आपल्या सारखे सामान्य गुंतवणूकदार आणि विश्लेषक (Analysts) या इंडेक्सना मोठ्या प्रमाणात फॉलो करतात. या इंडेक्सच्या मदतीने भारतीय शेअर बाजाराच्या कामगिरीचा विस्तृत आढावा आपल्याला घेता येतो.

या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण या दोन इंडेक्सवर बारकाईने नजर टाकू आणि ते काय आहेत, ते कसे काम करतात आणि गुंतवणूकदारांना त्यांचा कसा फायदा होतो, यावर चर्चा करू.

हे नक्की वाचा:- शेअर मार्केट म्हणजे काय? 

 Sensex म्हणजे काय?

सेन्सेक्स, ज्याला एस अँड पी बीएसई सेन्सेक्स (S&P BSE Sensex) म्हणून देखील ओळखले जाते. ही एक शेअर मार्केट इंडेक्स आहे, जी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर (BSE) लीस्टेड असलेल्या टॉप 30 कंपन्यांच्या कामगिरीला ट्रॅक करते. सेन्सेक्सला १९८६ मध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आले होते आणि त्यानंतर ही भारतातील सर्वात जास्त फॉलो केली जाणारी इंडेक्स बनली आहे.

Sensitive + Index = Sensex

सेन्सेक्स हा शब्द सेनसीटीव आणि इंडेक्स या दोन शब्दांना एकत्र करुन बनला आहे आणि यामध्ये भारताच्या टॉप ३० कंपन्यांचा समावेश होतो.

सेन्सेक्समध्ये बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा आणि मॅन्युफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रातील टॉप कंपन्यांचा समावेश केला जातो. त्यांची निवड त्यांच्या बाजार भांडवलाच्या (Market Capitalization)आधारे केली जाते. एखाद्या कंपनीचे बाजार भांडवल जितके मोठे असेल तितके तिला इंडेक्समध्ये पहिल स्थान दिल जाते.

Sensex ने आतापर्यन्त किती रिटर्न दिला आहे? 

Sensex ची सुरुवात जानेवारी 1, 1986 मध्ये झाली होती. जेव्हा Sensex सुरू झाल तेव्हा 100 ने सुरू झाल आणि आज (जेव्हा मी हे लिहितोय) तेव्हा Sensex ची वॅल्यू  66,473 आहे. आणि ही वॅल्यू बदलत जाणार जस भारताच शेअर मार्केट वाढत जाईल. 

आता सुरुवातीपासून Sensex ने किती रिटर्न दिला हे सांगणे जरा कठीण आहे कारण तुम्ही कोणत वर्ष Base year म्हणून घेत हे समजणे गरजेच आहे. पण तरीही आपण एकदा पुढील आकड्यांवर नजर टाकुयात.  आता काहीना प्रश्न पडेल की Sensex ची सुरुवात तर 1986 मध्ये झाली मग 1979 का घेतल आहे? कारण ते Sensex च Base Year आहे. (जास्त कन्फ्युज होवू नका) 

Year Sensex Annual Returns
1979  
1980 29%
1981 34%
1982 26%
1983 -3%
1984 16%
1985 44%
1986 62%
1987 -11%
1988 -22%
1989 79%
1990 9%
1991 50%
1992 267%
1993 -47%
1994 66%
1995 -14%
1996 3%
1997 0%
1998 16%
1999 -4%
2000 34%
2001 -28%
2002 -4%
2003 -12%
2004 83%
2005 16%
2006 74%
2007 16%
2008 20%
2009 -38%
2010 81%
2011 11%
2012 -10%
2013 8%
2014 19%
2015 25%
2016 -9%
2017 17%
2018 11%
2019 17%
2020 -24%
2021 68%
2022 18%
2023 1%

आता जर आपण नीट पाहिल तर Sensex ने दर वर्षी वेगवेगळा रिटर्न दिला आहे. कधी कमी तर कधी जास्त आणि कधी कधी तर अगदी नेगेटिव. पण जर आपण लॉन्ग टर्ममध्ये पाहिल तर Sensex ने नेहमीच उत्तम रिटर्न दिले आहे. पुढील टेबलमध्ये Sensex चा मागील 40 वर्षाचा रिटर्न दिला आहे. 

Year Sensex Returns (CAGR) in Last 40 Years
1979-2019 16%
1980-2020 15%
1981-2021 15%
1982-2022 15%
1983-2023 15%

 

याचा अर्थ असा की लॉन्ग टर्ममध्ये तुम्ही Sensex कडून 12 – 15% ची अपेक्षा करू शकता. 

Nifty म्हणजे काय?

निफ्टी, ज्याला निफ्टी ५० किंवा एनएसई निफ्टी (NSE Nifty50) म्हणून देखील ओळखले जाते, ही एक शेअर मार्केट इंडेक्स आहे जी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवरील (National Stock Exchange) लीस्टेड टॉप ५० कंपन्यांच्या कामगिरीला ट्रॅक करते. १९९६ मध्ये ही इंडेक्स सर्वप्रथम सादर करण्यात आली आणि सेन्सेक्सनंतर भारतातील सर्वाधिक फॉलो केली जाणारी इंडेक्स बनली आहे.

National + 50 = Nifty50

निफ्टि५० हा शब्द नॅशनल आणि फिफ्टी या दोन शब्दांना एकत्र करुन बनला आहे. फिफ्टी यासाठी कारण यामध्ये ५० कंपन्या असतात.

आणि सेन्सेक्सप्रमाणे निफ्टीमध्ये बँकिंग, माहिती तंत्रज्ञान, ऊर्जा आणि मॅन्युफॅक्चरिंग अशा विविध क्षेत्रांमधील टॉप कंपन्यांचा समावेश केलेला असतो. सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीमध्ये असलेल्या कंपन्यांची निवड फ्री-फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन वेटेड मेथडॉलॉजीचा वापर करून केली जाते.

Nifty ने आतापर्यन्त किती रिटर्न दिला आहे? 

निफ्टी या इंडेक्सची सुरुवात 1996 मध्ये झाली हे आपण जाणून घेतल आहे. पण गेल्या 20 वर्षात निफ्टीने किती रिटर्न दिला आहे हे तुम्ही खाली दिलेल्या टेबलमध्ये बघू शकता. 

Year Nifty 50 Returns (CAGR) in the Last 20 Years
1996-2016 11%
1997-2017 12%
1998-2018 11%
1999-2019 13%
2000-2020 9%
2001-2021 14%
2002-2022 15%
2003-2023 15%

 

तसेच निफ्टीचा 25 वर्षाचा CAGR (Compound annual growth rate) तुम्ही बघू शकता. CAGR नाव जरी कठीण वाटल तरी त्याचा अर्थ हाच होतो की निफ्टीने Average रिटर्न किती दिला आहे. 

Year 25 Years Return
1996-2021 11%
1997-2022 12%
1998-2023 11%

 

Nifty ने अगदी सुरू झाल्यापासून Average 14.2% चा रिटर्न दिला आहे.  वरील रिटर्न आपण फक्त 25 वर्षाचे बघतोय म्हणून कदाचित कमी वाटेल पण महत्वाचा मुद्दा असा की, जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये इनवेस्ट करत ते लॉन्ग टर्मसाठीच करतो आणि केल पाहिजे. त्यामुळे लॉन्ग टर्ममध्ये जस आपण Sensex कडून 12 – 15% अपेक्षा केली तेवढीच अपेक्षा करू शकता. काही वर्षी रिटर्न चांगला येईल तर काही वर्षी रिटर्न अगदी चांगला येईल. 

Sensex आणि Nifty चा काय फायदा होतो?

समजा , तुम्हाला कोणी विचारल की आज शेअर मार्केटचा हाल काय आहे? वर गेलय की खाली पडलय? तर तुम्ही काय सांगणार?

आता शेअर मार्केटमध्ये टोटल ७००० पेक्षा जास्त कंपन्या आहेत आणि सगळ्यांना ट्रॅक करणे कोणालाच शक्य होणार नाही आणि अशा वेळी या इंडेक्स कामी येतात. या इंडेक्सकडे पाहून आपण सांगू शकतो की मार्केट वर गेल आहे की खाली पडल आहे.

यासोबत अनेक म्यूचुअल फंड कंपन्या त्यांच्या विविध फंड्सचा परफॉर्मेंसची तुलना या इंडेक्ससोबत करतात. समजा एखाद्या फंडचा रिटर्न सेन्सेक्स किवा निफ्टिपेक्षा जास्त आहे म्हणजे तो फंड चांगल काम करत आहे हे आपल्याला समजते.

तसेच तुम्ही जर डायरेक्ट स्टॉकमध्ये इनवेस्ट करत असाल तर मार्केटमध्ये पैसे इनवेस्ट करायचे की नाही याचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही सेन्सेक्स आणि निफ्टीचा वापर करू शकता. उदाहरणार्थ, सेन्सेक्स किंवा निफ्टी वरच्या दिशेने जात असेल तर शेअर मार्केटमध्ये इनवेस्ट करण्यासाठी चांगली वेळ असू शकते.

दुसरीकडे, जर इंडेक्स खाली जात असतील तर अशा वेळी जास्त रिस्क न घेता आधी इनवेस्ट केलेला पैसा तुम्ही होल्ड करू शकता. आणि थोडीफार रिस्क घ्यायची क्षमता असेल तर अजून पैसा इनवेस्ट करू शकता कारण अशाच वेळी स्वस्त भावात चांगल्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेता येतात.

पण, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की,

सेन्सेक्स आणि निफ्टी या केवळ दोन इंडेक्स आहेत आणि त्या संपूर्ण शेअर मार्केटची माहिती देत नाहीत कारण या इंडेक्समध्ये फक्त टॉप कंपन्या असतात. अस खूप वेळा होत की मार्केट पडत आहे पण काही छोट्या किंवा मीडियम साइजच्या कंपन्या चांगल परफॉर्म करत असतात आणि त्या इंडेक्समध्ये सामील नसतात. म्हणून शेअर मार्केटमध्ये पैसा इनवेस्ट करताना स्वत रिसर्च करा आणि मगच पैसा इनवेस्ट करा.

 

Information Sources: - kunaldesai.com

9 thoughts on “सेन्सेक्स आणि निफ्टी काय आहे? | What is Sensex & Nifty in Marathi”

Leave a Comment