Kotak Mahindra Mutual Fund कंपनीने एक नवीन म्यूच्युअल फंड NFO (New Fund Offer) मार्केटमध्ये लॉन्च केला आहे ज्याचे नाव आहे Kotak Special Opportunities Fund. या नवीन फंडचा NFO 10 जून 2024 रोजी सुरू झाला असून 24 जून 2024 रोजी बंद होणार आहे. या फंडची अलॉटमेंट तारीख 1 जुलै 2024 ठरवली आहे. Kotak Special Opportunities Fund ची सुरुवातीची NAV (Net Asset Value) 10 रुपये असेल. (कोणताही नवीन फंड लॉन्च होताना त्याची NAV नेहमी 10 रुपये असते.)
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance
Special Opportunities Fund म्हणजे नक्की काय असतं?
हा फंड मार्केटमध्ये होणाऱ्या स्पेशल इव्हेंट्स आणि त्यातून मिळणाऱ्या गुंतवणुकीच्या संधींमध्ये पैसे इन्वेस्ट करणार आहे. आता ते कसे ते समजून घ्या. जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये काही नवीन डेवलपमेंट होते, कॉर्पोरेट रीस्ट्रक्चरिंग होते, सरकारची एखादी नवीन पॉलिसी येते ज्यातून काही कंपन्यांना फायदा होतो, किंवा टेक्नॉलजीमध्ये झालेल्या बदलांमुळे काही कंपन्यांचे स्टॉक वाढतात, अशा स्टॉकमध्ये इन्वेस्ट करण्याकडे या फंडचा फोकस असेल.
लक्षात घ्या हा एक Thematic फंड आहे जो विशिष्ट थीम फॉलो करणार आहे, म्हणजे की मार्केटमधील स्पेशल इव्हेंट्समधून फायदा मिळणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करणे आणि या फंडमध्ये इन्वेस्ट करणाऱ्या इन्वेस्टर्सना जबरदस्त रिटर्न देणे.
ही पोस्ट वाचा 👉 सेक्टर फंड काय आहे? इनवेस्ट कराव की नाही?
Kotak Special Opportunities Fund बद्दल माहिती:
Benchmark Index: या फंडच्या रिटर्नची तुलना NIFTY 500 Total Return Index सोबत केली जाईल. थोडक्यात, जेवढा रिटर्न या इंडेक्समध्ये मिळेल, कमीत कमी तेवढा रिटर्न या फंडने दिला पाहिजे.
Investment Amount: तुम्ही कमीत कमी 100 रुपयांपासून SIP ची सुरुवात करू शकता, तसेच जर एकत्र पैसे इन्वेस्ट करायचे असतील तर कमीत कमी 100 रुपये इन्वेस्ट करावे लागतील.
Exit Load: एक्जिट लोड म्हणजे जेव्हा तुम्ही या फंडमधून पैसे काढाल तेव्हा किती फी तुमच्याकडून घेतली जाईल. या फंडमध्ये 1 वर्षाच्या आत पैसे काढल्यास 1% एवढा एक्जिट लोड घेतला जाईल.
Fund Risk: हा फंड एक thematic फंड आहे, त्यामुळे यामध्ये रिस्क खूप जास्त आहे. यामध्ये तुम्ही तेव्हाच इन्वेस्ट करा जर तुम्ही खूप रिस्क घेऊ शकता किंवा 5 पेक्षा जास्त वर्षांसाठी पैसे इन्वेस्ट करू शकता.
Kotak Mahindra Mutual Fund कंपनीबद्दल माहिती:
Kotak Mahindra Mutual Fund कंपनीची सुरुवात 5 ऑगस्ट 1994 मध्ये झाली आहे. ही कंपनी आजच्या तारखेला 4,17,984 कोटी एवढे पैसे मॅनेज करते. कोटक महिंद्रा बँक या म्यूच्युअल फंड कंपनीला स्पॉन्सर करते तसेच Kotak Mahindra Trustee Co. Ltd ही कंपनी या म्यूच्युअल फंडचे ट्रस्टी आहेत.
ही पोस्ट वाचा 👉 Navi Mutual Fund ची रिसर्च: तरुणांच्या म्यूचुअल फंड इन्वेस्टिंगमधील चुकांचा पर्दाफाश
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
Kotak Special Opportunities Fund म्हणजे काय?
हा एक Thematic फंड आहे जो मार्केटमधील स्पेशल इव्हेंट्समधून फायदा मिळणाऱ्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करतो.
Kotak Special Opportunities Fund हा फंड कोणत्या डेटला लॉंच होणार आहे?
Kotak Special Opportunities Fund या फंडचा NFO 10 जून 2024 रोजी सुरू झाला असून 24 जून 2024 रोजी बंद होणार आहे.
Kotak Special Opportunities Fund ची अलॉटमेंट तारीख काय आहे?
Kotak Special Opportunities Fund या फंडची अलॉटमेंट तारीख 1 जुलै 2024 ठरवली आहे.
Kotak Special Opportunities Fund ची सुरुवातीची NAV किती आहे?
Kotak Special Opportunities Fund ची सुरुवातीची NAV 10 रुपये असेल.
Kotak Special Opportunities Fund चा Benchmark Index कोणता आहे?
Kotak Special Opportunities Fund या फंडच्या रिटर्नची तुलना NIFTY 500 Total Return Index सोबत केली जाईल.
Kotak Special Opportunities Fund या फंडमध्ये किती रकमेपासून इन्वेस्टमेंट सुरू करता येईल?
तुम्ही कमीत कमी 100 रुपयांपासून SIP ची सुरुवात करू शकता. तसेच, जर एकत्र पैसे इन्वेस्ट करायचे असतील तर कमीत कमी 100 रुपये इन्वेस्ट करावे लागतील.
Kotak Special Opportunities Fund चा Exit Load किती आहे?
Kotak Special Opportunities Fund या फंडमध्ये 1 वर्षाच्या आत पैसे काढल्यास 1% एवढा एक्जिट लोड घेतला जाईल.
हा फंड कितपत रिस्की आहे?
हा फंड एक Thematic फंड आहे, त्यामुळे यामध्ये रिस्क खूप जास्त आहे. यामध्ये तुम्ही तेव्हाच इन्वेस्ट करा जर तुम्ही खूप रिस्क घेऊ शकता किंवा 5 पेक्षा जास्त वर्षांसाठी पैसे इन्वेस्ट करू शकता.
Kotak Mahindra Mutual Fund कंपनी कधी स्थापन झाली?
Kotak Mahindra Mutual Fund कंपनीची सुरुवात 5 ऑगस्ट 1994 मध्ये झाली आहे.
Kotak Mahindra Mutual Fund कंपनी किती रक्कम मॅनेज करते?
ही कंपनी आजच्या तारखेला 4,17,984 कोटी एवढी रक्कम मॅनेज करते.
Kotak Mahindra Mutual Fund कंपनीचे स्पॉन्सर कोण आहे?
कोटक महिंद्रा बँक या म्यूच्युअल फंड कंपनीला स्पॉन्सर करते.
Kotak Mahindra Mutual Fund चे ट्रस्टी कोण आहेत?
Kotak Mahindra Trustee Co. Ltd ही कंपनी या म्यूच्युअल फंडचे ट्रस्टी आहेत.