Jana Small Finance Bank IPO: काय तुम्ही अप्लाय करणार आहात? आधी ही माहिती वाचा

Rate this post

Jana Small Finance Bank IPO Date, Review, Price: शेअर मार्केटमधील एक नवीन दिवस आणि एक नवीन आयपीओ आणि तो म्हणजे जना स्मॉल फायनान्स बँक आयपीओ. हा आयपीओ (आज म्हणजेच) 7 फेब्रुवारी 2024 ला लॉन्च होणार आहे आणि 9 फेब्रुवारी 2024 रोजी बंद होणार आहे.

जना स्मॉल फायनान्स बँक आयपीओची  इश्यू साइज ₹570 कोटी आहे. या आयपीओची प्राइस बँड प्रति शेअर ₹393 ते ₹414 निश्चित करण्यात आला  आहे. आयपीओसाठी अर्ज करताना, तुम्ही एका लॉटमध्ये किमान 36 शेअर्ससाठी अर्ज करू शकता, ज्याची किंमत ₹14,904 रुपये असेल.

Jana Small Finance Bank IPO Details

Fitch च्या अहवालानुसार, 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट (AUM) आणि ठेवींच्या आकारात जना स्मॉल फायनान्स बँक ही चौथी सर्वात मोठी स्मॉल फायनान्स बँक आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, त्यांनी 22 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये 771 बँकिंग आउटलेट ओपन केले आहेत.

2006 मध्ये जना स्मॉल फायनान्स बँकची स्थापना झाल्यापासून, त्यांनी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 4.87 दशलक्ष सक्रिय ग्राहकांसह सुमारे 12 दशलक्ष ग्राहकांना सेवा दिली आहे. त्यांची 4 मार्च 2008 रोजी नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (“NBFC”) म्हणून नोंदणी झाली.

जना स्मॉल फायनान्स बँकला5 सप्टेंबर 2013 रोजी नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी-मायक्रोफायनान्स संस्था (“NBFC-MFI”) चा दर्जा देण्यात आला. पुढे जावून स्मॉल फायनान्स बँकेत बदल करून, त्यांनी 28 मार्च 2018 रोजी एक बँक म्हणून कामकाज सुरू केले आणि 16 जुलै 2019 रोजी शेड्युल्ड कमर्शियल बँकेचा दर्जा प्राप्त केला.

जना स्मॉल फायनान्स बँकने 16 वर्षांमध्ये कमी बँकिंग आणि बँकची सेवा नसलेल्या ग्राहकांच्या आर्थिक गरजांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
ग्राहकांचा अनुभव वाढवण्यासाठी, त्यांनी डिजिटल पद्धतीने अकाऊंट ओपन करणे आणि कर्ज वितरणासह विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
Jana Small Finance Bank IPO Funds

या आयपीओमधून मिळालेले पैसे Tier 1 शहरात बँकेचा पाया मजबूत करण्यासाठी वापरणार आहेत. यासोबतच बँकच्या वर्किंग कॅपिटलची गरज या आयपीओच्या पैशातून भागवली जाईल. आणि बँक हे पैसे काही जनरल कॉर्पोरेट कारणांसाठी वापरेल.

Jana Small Finance Bank IPO Market Lot
Application Lot Size Shares Amount
Retail Minimum 1 36 ₹14,904
Retail Maximum 13 468 ₹193,752
S-HNI Minimum 14 504 ₹208,656
B-HNI Minimum 68 2448 ₹1,013,472
Jana Small Finance Bank IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: February 6, 2024
IPO Open Date: February 7, 2024
IPO Close Date: February 9, 2024
Basis of Allotment: February 12, 2024
Refunds: February 13, 2024
Credit to Demat Account: February 13, 2024
IPO Listing Date: February 14, 2024
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
Jana Small Finance Bank Company Financial Report
  ₹ in Crores
Year Revenue Expense PAT
2021 ₹2720.74 ₹2648.48 ₹72.26
2022 ₹3062.37 ₹3044.89 ₹17.47
2023 ₹3699.88 ₹3443.90 ₹255.97
Sep 2023 ₹2215.57 ₹2002.35 ₹213.22
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Rashi Peripherals IPO: आज आयपीओ सुरू होणार, अप्लाय करण्याआधी संपूर्ण माहिती वाचा (marathifinance.net)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi