Bonus Share in Marathi: – तुम्हाला कधी तुमच्या मित्राने किंवा फॅमिलीपैकी कोणी गिफ्ट दिल आहे? मी पण काय विचारतोय, आपल्या संगळ्याना कधी ना कधी काही गिफ्ट तर नक्कीच मिळालं असेल.
बोनस शेअर (Bonus Share) पण असच एक गिफ्ट आहे. फक्तं ते तुमच्या फॅमिलीकडून न येता, एखाद्या कंपनीकडून तुमच्यासाठी येत ज्यामध्ये तुम्ही पैसे Invest केले आहेत.
बोनस शेअर नक्की आहे तरी काय? | What is Bonus Share in Marathi
अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर, बोनस शेअर म्हणजे एक्सट्रा शेअर असतात जे कंपनीच्या शेअरहोल्डर्सना दिले जातात. यासाठी त्यांच्याकडून काही Extra पैसे घेतले जात नाहीत.
कंपनी बोनस शेअर तिच्या Retained Earning किंवा Share Premium Account मधून दिले जातात. जेव्हा कंपनीला जास्त प्रॉफिट होतो तेव्हा थोडे पैसे कंपनी बाजूला काढून ठेवते यालाच Retained Earning किंवा Share Premium Account अस म्हणतात.
जरा विचार करा: कंपनी खूप चांगल काम करत आहे. कंपनीला चांगला प्रॉफिट पण होत आहे. पण तो सगळा प्रॉफिट डिविडेंड (Dividend) स्वरूपात न देता, कंपनी हा प्रॉफिट त्यांच्या प्रामाणिक शेअरहोल्डरना बोनस शेअर म्हणून देतात.
बोनस शेअर कशाप्रकारे काम करतात? | How Do Bonus Shares Work?
बोनस शेअर इश्यू करण्याचा रेशियो: कंपन्या विशिष्ट प्रमाणात बोनस शेअर्सची घोषणा करतात, उदाहरणार्थ, 1:1 बोनस. याचा अर्थ असा की तुमच्याकडे आता असलेल्या प्रत्येक 1 शेअरसाठी तुम्हाला 1 बोनस शेअर मिळणार.
शेअरच्या किंमतीवर फरक: बोनस शेअर्स जारी केल्यानंतर कंपनीचे एकूण मूल्य समान राहते. कंपनीचे मार्केटमध्ये असलेल्या टोटल शेअर्सची संख्या जसजशी वाढत जाते, तसतसे समान बाजार भांडवल (Market Cap) राखण्यासाठी प्रत्येक शेअरची किंमत कमी केली जाते.
एक साध उदाहरण घेऊन आणि समजू: एक कंपनी आहे. तिचे मार्केटमध्ये टोटल शेअर्स आहेत 100, एका शेअरची किंमत आहे 10 रुपये. त्या हिशोबाने कंपनीची टोटल मार्केट वॅल्यू होते 100 शेअर्स * 10 रुपये = 1000 रुपये.
आता कंपनी बोनस शेअर घोषित करते ते पण 1:1 या रेशियोमध्ये (म्हणजे एका शेअरमागे एक शेअर फ्री)
आता समजा तुमच्याकडे हे 100 शेअर्स आहेत. पण आता तुम्हाला प्रत्येक शेअरमागे अजून एक शेअर मिळेल. म्हणजे तुमच्याकडे आता 100 शेअर्स नाही तर टोटल 200 शेअर्स झाले आहेत.
पण कंपनीच्या शेअरची किंमत मात्र 10 रुपये एवजी 5 रुपये करण्यात येते कारण कंपनीच बाजार भांडवल (Market Cap) तेवढंच राहील पाहिजे.
शेअर्सची संख्या | किंमत प्रति शेअर | एकूण किंमत |
---|---|---|
आधी: 100 शेअर्स | ₹10 रुपये | ₹1000 रुपये |
नंतर: 200 शेअर्स | ₹5 रुपये | ₹1000 रुपये |
(आणि हो कोणत्याच कंपनीच मार्केट कॅप 1000 रुपये नसत. कन्सेप्ट समजवण्यासाठी दिलेल उदाहरण आहे.)
बोनस शेअरचा शेअरहोल्डर म्हणून तुम्हाला काय फायदा होतो? | What Benefits Do You Get as a Shareholder of Bonus Share?
कंपनीवर मालकी हक्क वाढतो: तुमच्याकडे आधी कमी शेअर्स असतात पण बोनस शेअर्स मिळाले की तुमच्याकडे कंपनीचे जास्त शेअर जमा होतात.
भविष्यात ग्रोथ होण्याची शक्यता: जर पुढे जावून कंपनी चांगला बिझनेस करते, चांगला प्रॉफिट कमविते तर तुमच्या शेअर्सची किंमत वाढू शकते. शेअर्सची किंमत वाढणार म्हणजे तुम्हाला जास्त रिटर्न मिळणार.
कंपनीच्या शेअर्सची Liquidity वाढते: बोनस शेअर्समुळे कंपनीचे खूप सारे शेअर्स मार्केटमध्ये उपलब्ध होतात. सोबत त्यांची किंमत पण कमी होते. त्यामुळे शेअर्स सहज खरेदी विक्री करता येतात.
थोडक्यात संगायच झाल तर, बोनस शेअर्स हा कंपन्यांसाठी त्यांच्या शेअरहोल्डरना बक्षीस देण्याचा आणि त्यांच्या गुंतवणूकीचा अनुभव वाढवण्याचा एक मार्ग आहे. बोनस शेअर लगेच आर्थिक फायद्यांची हमी देत नसले तरी, ते कंपनीच्या भविष्यातील वाढीकडे विश्वासाचे सकारात्मक चिन्ह असू शकतात.
पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. Keep Learning & Keep Investing
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर पोस्ट वाचा 👉Market Capitalization: – कंपनीच बाजार भांडवल म्हणजे काय? (marathifinance.net)
5 thoughts on “बोनस शेअर काय आहे? काय फायदा होतो? | What is Bonus Share in Marathi”