Indegene IPO Review in Marathi: इंडिजेन आयपीओ 6 मे 2024 रोजी सुरू होणार आहे. इंडिजेन आयपीओ 8 मे 2024 रोजी बंद होणार आहे. इंडिजेन आयपीओची इश्यू साइज ₹1841.76 करोड एवढी आहे. इंडिजेन आयपीओची किंमत ₹430 ते ₹452 रुपये प्रती शेअर ठरविण्यात आली आहे.
आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही कमीत कमी 33 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची टोटल किंमत ₹14,916 रुपये असेल. इंडिजेन आयपीओची अलॉटमेंट 9 मे 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे. इंडिजेन आयपीओची लिस्टिंग 13 मे 2024 रोजी केली जाईल.
जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance
इंडिजन कंपनीबद्दल माहिती | Indegene IPO Company Details
इंडिजेन ही एक डिजिटल हेल्थकेअर कंपनी आहे जी एखाद प्रॉडक्ट बनविण्याच्या Life Cycle मध्ये विविध Life Science बिझनेसना हेल्प करते. Life Science बिझनेस म्हणजे Biopharmaceutical, Biotech आणि Medical devices बनविणाऱ्या कंपन्या.
इंडिजेन कंपनी एखाद प्रॉडक्ट डेवलप करणे, त्याची क्लिनिकल ट्रायल, मग Approvl आणि मार्केटिंग अशा अनेक कामांमध्ये मोठ मोठ्या कंपन्याना हेल्प करते. इंडिजेन कंपनीच्या टेक्नॉलजी आणि Expertise मुळे अनेक कंपन्याना त्यांचे प्रॉडक्ट लवकरात लवकर मार्केटमध्ये घेऊन येण्यास मदत मिळते.
इंडिजेन कंपनीने जगभरातील 20 मोठ्या Biopharmaceutical कंपन्यासोबत हात मिळवणी करून त्यांचा क्लाईंट बेस मजबूत केला आहे. या क्लाईंट बेसमधून इंडिजेन कंपनीचा जवळजवळ 69% रेविन्यू येतो. बाकी इंडिजेन कंपनीकडे टोटल 65 क्लाईंट आहेत. त्यामध्ये छोट्या 30 कंपन्या असून त्यामधून कंपनीला बऱ्यापैकी रेविन्यू मिळत आहे.
इंडिजेन आयपीओ फंड कुठे वापरणार? | Indegene IPO Fund
- इंडिजेन आयपीओमधून जमा केलेला पैसा Subsidiaries कंपन्याच्या कर्जाची परतफेड किंवा पूर्व-पेमेंट करणे यासाठी वापरला जाईल
- तसेच कंपनीच्या दैनंदिन कामासाठी लागणारा पैसा म्हणजे Working Capital साठी हा आयपीओचा पैसा वापरला जाईल.
- इतर कॉर्पोरेट कामांसाठी हा पैसा वापरला जाईल.
इंडिजेन कंपनीचा आर्थिक अहवाल | Indegene Company Financial Report
₹ करोडमध्ये | |||
वर्ष | रेविन्यू | खर्च | PAT (प्रॉफिट आफ्टर टॅक्स) |
2021 | ₹996.92 | ₹768.25 | ₹149.41 |
2022 | ₹1690.50 | ₹1417.10 | ₹162.82 |
2023 | ₹2364.10 | ₹2001.05 | ₹266.10 |
डिसेंबर 2023 | ₹1969.75 | ₹1644.64 | ₹241.90 |
इंडिजेन आयपीओच्या महत्वाच्या तारखा | Indegene IPO Important Dates
इंडिजेन आयपीओची सुरवात 6 मे 2024 रोजी सुरू होणार आहे आणि हा आयपीओ 8 मे 2024 रोजी बंद होणार आहे. इंडिजेन आयपीओची अलॉटमेंट9 मे 2024 रोजी फिक्स करण्यात आली आहे. या आयपीओची लिस्टिंग 13 मे 2024 रोजी केली जाईल.
Anchor Investors Date: | 5 मे 2024 |
आयपीओ सुरू होणार | 6 मे 2024 |
आयपीओ बंद होणार | 8 मे 2024 |
आयपीओची अलॉटमेंट | 9 मे 2024 |
रिफंड मिळणार | 10 मे 2024 |
Demat Account मध्ये शेअर मिळणार | 10 मे 2024 |
आयपीओची लिस्टिंग होणार | 13 मे 2024 |
इंडिजेन आयपीओबद्दल सतत विचारले जाणारे प्रश्न | Indegene IPO FAQs
Question 1) इंडिजेन आयपीओची अलॉटमेंट तारीख काय आहे?
Answer: इंडिजेन आयपीओची अलॉटमेंट तारीख 9 मे 2024 आहे.
Question 2) इंडिजेन आयपीओची रिफंड तारीख काय आहे?
Answer: इंडिजेन आयपीओची रिफंड तारीख 10 मे 2024 आहे.
Question 3) इंडिजेन आयपीओ स्टॉक एक्सचेंजवर कधी लिस्ट होणार आहे?
Answer: इंडिजेन आयपीओ 13 मे 2024 रोजी BSE आणि NSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर लिस्ट होईल.