PhonePe App News: पेमेंट्स आणि फिनान्शिअल सर्विस कंपनी फोन पे (PhonePe) ने नुकताच त्यांच्या ॲपमध्ये “क्रेडिट” हा नवीन सेक्शन सुरू केला आहे. या नवीन सेक्शनचा वापर करून कस्टमर त्यांचे क्रेडिट स्कोर चेक करू शकतात. कस्टमरला क्रेडिट स्कोर चेक करण्यासाठी कोणतेही एक्स्ट्रा चार्ज द्यावं लागणार नाही.
त्यासोबत कस्टमर या सेक्शनमध्ये त्यांचे क्रेडिट कार्ड तसेच Rupay कार्ड, लोन पेमेंट, क्रेडिट कार्ड बिल्स इत्यादी गोष्टी मॅनेज करू शकतात. भविष्यात फोन पे कंपनी त्यांच्याॲपद्वारे कंजूमर लोन त्यांच्या कस्टमरसाठी ऑफर करणार आहेत ज्यातून कस्टमरला लोन घेण्याची सुविधा सहज उपलब्ध होईल.