इंस्टाग्राम पेजवर एका फॉलोवरने असा प्रश्न केला आहे की,
त्याला पुढील 37 वर्षात दहा करोड रुपये जमा करायचे आहेत आणि त्यासाठी तो आत्ता एका फ्लेक्सि कॅप फंडमध्ये 3000 ची SIP करतोय तर ते शक्य आहे का? आणि दुसर म्हणजे त्या 10 करोडची किंमत 37 वर्षानंतर काय असेल? याचे उत्तर आपण आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत. या पोस्टचा फायदा तुम्हाला पण होईल.
फॉलोवर ने त्याच्याबद्दल दिलेली काही बेसिक माहिती
- सध्या तो 21 वर्षाचा आहे
- त्याची चालू सॅलरी 18,000 आहे
- त्याच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू 35000 आहे (जी त्याने आठ महिन्यात थोडे पैसे इन्व्हेस्ट करून बनवली आहे)
- रिटायरमेंटसाठी तो Parag Parikh Flexi Cap फंडमध्ये 3000 ची SIP करत आहे.
- तो थोडेपार पैसे स्टॉकमध्ये सुद्धा इनवेस्ट करतोय
- एकदम जास्त पैसे तो इनवेस्ट करत नाहीये कारण अचानक गरज पडली की सगळे काढावे लागतात
- तो शक्य होईल तेवढीच रिस्क घेत आहे.
पहिला प्रश्न: 3000 ची SIP करून दहा करोड बनवता येतील का?
हो बनवता येईल! पण यासाठी त्याला साधी SIP न करता Step Up SIP करावी लागेल. आता ही Step Up SIP काय आहे हे थोडक्यात समजून घेऊ.
Step Up SIP म्हणजे दर वर्षाला SIPची रक्कम ठराविक टक्क्यांनी किंवा रकमेने वाढविणे. उदाहरणार्थ यावर्षी तो 3000 ची SIP करत आहे तर पुढच्या वर्षी त्यामध्ये 10% क्कम वाढवून म्हणजेच 3300 ची SIP करणे यालाच Step Up SIP असे म्हणतात.
आता Step Up SIP नक्की किती वाढवायची का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल पण तसा काही फिक्स रुल नाहीये. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढ्या रकमेने किंवा टक्क्यांनी Step Up SIP ची रक्कम वाढवू शकता. पण कमीत कमी 10 टक्क्यांनी SIP ची रक्कम वाढवणे चांगलं असतं कारण महागाई दरवर्षाला 6%-7% वाढत असते. आणि जर तुम्हाला महागाईच्या पुढे राहायचं असेल तर कमीत कमी 10% ने तुमच्या SIP रक्कम वाढवा.
3000 च्या Step Up SIP व्हॅल्यू पुढील 37 वर्षात किती होईल हे आपण समजून घेऊया.
लक्षात घ्या त्याने एक Parag Parikh Flexi Cap निवडला आहे ज्याचा सुरुवातीपासूनचा ऍव्हरेज रिटर्न 19.82% आहे पण तरीही आपण कॅल्क्युलेशन करताना रिटर्न हा फक्त 14% पासून घेणार आहोत. कारण मार्केट इंडेक्सचा ऍव्हरेज रिटर्न हा 14% असतो.
या 3000 रूपयाच्या SIP ची वॅल्यू 14% च्या हिशोबाने पुढील 27 वर्षात जवळजवळ 11 करोडच्या आसपास जातेय. आणि लक्षात घ्या आपण रिटर्न फक्त 14% घेतला आहे जर त्याला या SIP वर रिटर्न जास्त मिळाला तर नक्कीच ही रक्कम अजून जास्त असेल.
आणि दुसर म्हणजे आपण फक्त 10% ने Step Up SIP केली आहे. जर त्याने अजून ही टक्के वाढवले तर रक्कम अजून मोठ्या प्रमाणात वाढेल. कारण आता तो फक्त 21 वर्षाचा आहे. येत्या काही वर्षात त्याची इन्कम नक्कीच वाढेल. सॅलरी एवढीच राहणार नाही.
दूसरा प्रश्न: या 10 करोड वॅल्यू 2060 मध्ये किती असेल?
यासाठी आपल्याला इकनॉमिक्समधील एक कन्सेप्ट फ्युचर वॅल्यू ऑफ मनी (Future Value of Money) समजावी लागेल. बघा मित्रांनो मी तुम्हाला याचा फॉर्म्युला देऊन कन्फ्युज करणार नाहीये आणि स्वता होणार पण नाही.
थोडक्यात सांगायच झाल तर फ्युचर वॅल्यू ऑफ मनी म्हणजे आजच्या एका ठराविक रककमेची किंमत भविष्यात किती असेल. उदाहरणार्थ 10 करोडची किंमत 2060 मध्ये किती असेल. म्हणजे 37 वर्षानंतर किती असेल? आता इथे एका पॉईंट्सवर आपण लक्ष दिल पाहिजे म्हणजे आपण 6% चा महागाई रेट घेतला आहे. जो भविष्यात कमी होवू शकतो किंवा वाढू पण शकतो.
तर 10 करोडची 2060 मध्ये वॅल्यू 5,43,92,170 रुपये एवढी असेल. जवळजवळ किंमत अर्धी झाली आहे. आता काहीना वाटेल मग काय फायदा इनवेस्ट करून एवढे पैसे. पण यातूनच समजत की आपल्याला आता जास्त रक्कम इनवेस्ट करावी लागणार आहे.
सध्या सॅलरी कमी असेल म्हणून छोट्या रक्कमेने सुरुवात केली असेल पण जशी सॅलरी वाढेल तशी रक्कम वाढवा. आणि हो काहीजण रक्कम कमी ठेवून जास्त रिटर्न कुठे मिळेल याच्या सोधात असतात तर ते सगळ्यात आधी थांबवा. जास्त रिटर्न एक वर्ष मिळेल, दोन वर्ष मिळेल पण सतत मिळणे शक्य नाही. नको तिथे रिस्क घेऊन हातचे पैसे गमावू नका.
Happy Investing!
2 thoughts on “मला 3000 रुपयाची SIP करून 10 करोड रुपये बनवता येतील का?”